नुकतेच श्रीकृष्ण जीवनावरील महानाट्य "संभवामी युगे युगे" पाहून आलो. त्यांच्या जाहिरातीप्रमाणेच ६ मजली रंगमंच, भरपूर नृत्य कलाकार, प्रत्यक्ष घोडे, रथ, गायी, बैलगाड्या, उंट, हत्ती ह्यांचा रंगमंचावर वावर ह्याचा अनुभव घेतला. ह्या आधी शिवाजी महाराजांच्या जीवनावरील 'जाणता राजा' ह्या नाटकात असा उपयोग केला होता. मला ते नाटक अजूनही पाहण्यास मिळाले नाही. त्यामुळे आज प्रथमच मी हे पाहिले. चांगले वाटले.सध्या तरी एवढेच. विस्तृत कथन उद्या लिहित...
डिसेंबर २८, २००९
डिसेंबर २५, २००९
डिसेंबर २५, २००९ १२:२३ AM
देवदत्त
आंतरजाल
0 प्रतिक्रिया
नेटभेट.कॉमच्या प्रणव जोशी आणि सलिल चौधरी ह्यांनी सुरू केलेल्या नेटभेट मासिकाच्या तिसर्या अंकात (डिसें २००९) माझे 'क्यु.पी.एस आणि पी. आय. पी' हे लेखन समाविष्ट केले आहे. त्याबद्दल त्यांचे आभार.माझे लेखन त्यांच्या मासिकात घेण्यासारखे वाटले ह्याचा मला आनंद वाटला. आधी स्टार माझाच्या 'ब्लॉग माझा' स्पर्धेत उल्लेख व आता अशा मासिकात प्रसिद्धी ह्याने प्रोत्साहनच मिळत आहे की मी काही ना काही (काहीही नाही ;) ) चांगले लिहित रहावे.
ह्यापुढेही नेटभेटचा...
डिसेंबर २१, २००९
डिसेंबर २१, २००९ ११:५५ PM
देवदत्त
अनुभव, पुस्तक
0 प्रतिक्रिया
नुकतेच मिलिंद बोकील ह्यांचे 'शाळा' पुस्तक वाचून संपविले. गेल्या आठवड्यापासून सकाळ-संध्याकाळच्या बस प्रवासात वाचत होतो. सुंदर पुस्तक. सुंदर कथानक. मस्त अनुभव. पहिल्यांदा सुरू केल्यावर नीट वाचणे जमत नव्हते. पण नंतर वेळ मिळाला तर वाचत गेलो. हातातून पुस्तक ठेववत नव्हते.अशाच प्रकारचा अनुभव ४ वर्षांपूर्वी 'पार्टनर' व गेल्यावर्षी 'दुनियादारी' वाचताना आला होता. पार्टनर तर एका बैठकीत वाचून काढले होते. अर्थात 'शाळा' आणि 'दुनियादारी' हे समोर घडताना बहुतेक...
डिसेंबर १४, २००९
डिसेंबर १४, २००९ २:३८ AM
देवदत्त
5 प्रतिक्रिया
लोकप्रभामधील अल्केमिस्ट्री सदरात राजू परूळेकरांनी "सचिन (ग्लॅडिएटर) तेंडुलकर" नावाचा लेख लिहिला आणि (त्यांच्या अपेक्षेप्रमाणे) वादळ उठले. त्या लेखाच्या विरोधात भरपूर प्रतिक्रिया उमटल्या. माझीही एक त्यातलीच होती. माझ्या (आणि बहुतेकांच्या) अपेक्षेप्रमाणे, त्यांनी १८ डिसें २००९ च्या लोकप्रभामध्ये पुन्हा त्यावर लेख लिहिला.
ह्या लेखात त्यांनी त्यांच्या विरोधातील दोन प्रातिनिधीक लेखांना उत्तरे लिहिली आहेत. आता त्यावर पुन्हा किती प्रतिक्रिया उठतील...
डिसेंबर १२, २००९
डिसेंबर १२, २००९ २:५४ PM
देवदत्त
अनुभव
2 प्रतिक्रिया
मुंबईतील हॉटेल संघटनेने लागू केलेल्या नव्या नियमापासून ताटात घेतलेले अन्न टाकल्यास पाच रू. दंड आकारण्यात येणार आहे. वाढती महागाई व अन्न धान्याची कमतरता हे मुख्य कारण असल्याचे सांगत आहेत. तसेच ग्लासातील वाढलेल्या पाण्याचाही अपव्यव टा़ळण्यात येणार आहे.
(स्टार माझावरील बातमी येथे वाचा. व्हिडीयोचा नेमका दुवा मिळाला नाही. स्टार माझाच्या संकेतस्थळावर येथे ११/१२/२००९ च्या यादीमध्ये "खाऊन माजा टाकून नको!" व्हिडीयो पहायला मिळेल तसेच...
डिसेंबर ०४, २००९
डिसेंबर ०४, २००९ ११:४० PM
देवदत्त
0 प्रतिक्रिया
२००५ मध्ये आलेल्या 'डोंबिवली फास्ट' चित्रपटात एक प्रसंग आहे. कथानायक माधव आपटे आपल्या सहकार्यासोबत एका दुकानात थंड पेय पिण्यास गेला असतो. तिकडे तो दुकानदाराने घेतलेले जास्त २ रू परत मागतो. ते न दिल्याने माधव त्याच्या दुकानात तोडफोड करून २ रू परत घेतो.
हा झाला चित्रपटातील प्रसंग. प्रत्यक्षात ह्याच्या उलट एक घटना घडली आहे. मटा मध्ये आलेल्या बातमीनुसार परळ रेल्वे स्थानकावर बुकिंग क्लार्कने प्रवाशाला त्याचा उरलेला एक रूपया परत न देता उलट त्या...
१२:१९ AM
देवदत्त
अनुभव, दूरदर्शन
0 प्रतिक्रिया
साधारण २०-२१ वर्षांपूर्वी घेतलेल्या आमच्या कार टेप मध्ये एक बटण होते QPS नावाचे. त्याचे पूर्ण नाव तेव्हा तर माहित नव्हतेच. पण नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याचा उपयोग मी शोधून काढला. एखादे गाणे सुरू असताना हे बटण दाबून ठेवून जर कॅसेट पुढे ढकलली तर त्याचा उपयोग होतो. मला साधा कॅसेट प्लेयर व ह्या कार टेप प्लेयर मधील हा फरक का ते तेव्हापासून अजून नाही कळले. साध्या टेप मध्ये जर आम्ही गाणे वाजत असतानाच कॅसेट पुढे ढकलायचा प्रयत्न केला तर मोठे लोक...
नोव्हेंबर ३०, २००९
नोव्हेंबर ३०, २००९ १२:०७ AM
देवदत्त
अनुभव
0 प्रतिक्रिया

आमच्या घराच्या मागे खरे तर खाडी होती. ती बुजवून त्यावर बांधकाम कधीतरी सुरू होणार हे नक्कीच. ती खाडी कधी बुजविली ते कळले नाही. पण आता तर त्या जागेवर सर्कससुद्धा उभी राहिली. गेल्या दीड महिन्यापासून म्हणजे १६ ऑक्टो. पासून ती सुरू आहे. नेहमी प्राण्यांचा आवाज ऐकू येत असे. दररोज दुपारी १ वाजल्यापासून त्यांचे...
नोव्हेंबर २८, २००९
नोव्हेंबर २८, २००९ १२:४१ PM
देवदत्त
0 प्रतिक्रिया
२६ नोव्हें २००८ ला हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली एवढेच मी म्हणू शकतो. इतर काही परवा लिहू नाही शकलो. खरं तर लिहावे असे वाटलेही नव्हते. पण तरी आताही मनात सारखे येते म्हणून लिहून टाकले.
बाकी, हे का झाले, काय करायला हवे होते, न होण्याकरीता पुढे काय करायला हवे ह्याची चर्चा सर्वत्रच होत असते.
पण नेमकी पावले उचलली गेलीत का हाच प्रश्न आहे? तसेच त्या हल्ल्यातील मृतांच्या/जखमींच्या कुटुंबियांना योग्य मदत मिळाली का? हेच सरकारला विचारू...
नोव्हेंबर २२, २००९
नोव्हेंबर २२, २००९ ११:५० PM
देवदत्त
क्रिकेट, महाराष्ट्र, सचिन
2 प्रतिक्रिया
लोकप्रभामधील राजू परूळेकरांचे 'अल्केमिस्ट्री' वाचले. नुकत्याच चाललेल्या 'मराठी/महाराष्ट्रीय आणि सचिन' वादात त्यांनीही आपले हात धुवून घेतल्यासारखे वाटले, तेही 'सचिन' हे चलनी नाणे वापरून. वास्तविक मला त्यांचे मुद्देच पटले नाहीत. क्रिकेटविरोधात लिहायचे तर लिहा किंवा माध्यमांनी क्रिकेटला अवास्तव महत्व दिले म्हणून माध्यमांबद्दल लिहा की. उगाच सचिनला का त्यात ओढता? तुम्ही म्हणता तसे त्याने केले नसेल तरी त्याने बिघडवले काय?
असेच विचार मनात येत असताना,...
नोव्हेंबर २१, २००९
नोव्हेंबर २१, २००९ २:५१ PM
देवदत्त
ब्लॉग माझा, वृत्तवाहिनी
9 प्रतिक्रिया
स्टार माझाच्या 'ब्लॉग माझा' स्पर्धेत माझ्या अनुदिनीला उत्तेजनार्थ ब्लॉग म्हणून निवडल्याचे विपत्र काल आले. अपेक्षित नव्हते त्यामुळे आनंद झाला. आणि तो आनंद सर्वांशी वाटून घ्यावा म्हणून हे लेखन.
सर्वप्रथम सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. 'माझी अनुदिनी'ला निवडल्याबद्दल स्टार माझा समूहाचे आणि श्री. अच्युत गोडबोले ह्यांचे आभार.
ज्यांनी मला अभिनंदनाच्या प्रतिक्रिया/खरडी लिहिल्या त्यांनाही धन्यवाद.
माझ्या विचार टंकनाला सुरूवात झाली ती २००५ मध्ये मनोगत.कॉम...
नोव्हेंबर ०५, २००९
नोव्हेंबर ०५, २००९ ११:५३ PM
देवदत्त
क्रिकेट, सचिन
7 प्रतिक्रिया
सचिन तेंडुलकरचा १७००० धावांचा विक्रम. १४१ चेंडूत १७५ धावा. सचिनचे अभिनंदन.
सचिन बाद झाल्यावर भारताचा डाव गडगडला. भारत ३ धावांनी पराभूत. इतिहासाची पुनरावृत्ती.
सचिन तेंडुलकरची तुलना डॉन ब्रॅडमन ह्यांच्याशी केली जाते. हे चांगलेच आहे. दुमत नाही .पण ह्याबाबत काही वर्षांपुर्वी शिरीष कणेकरांनी वृत्तपत्रातील एका लेखात लिहिलेले वाक्य आठवले."असे म्हणतात की ब्रॅडमन तुमच्या संघात असताना अगदी वाईटात वाईट स्वप्न पडले तरी सामना हरल्याचे स्वप्न पडणार...
नोव्हेंबर ०१, २००९
नोव्हेंबर ०१, २००९ १०:१३ PM
देवदत्त
2 प्रतिक्रिया
खरं तर निवडणूका संपल्यानंतर राजकारणावरील माझे विचार लिहायचे नाहीत असे मी ठरवले होते. पण सध्या जे काही चालले आहे त्यावर लिहावेसेच वाटते.२२ ऑक्टो. ०९ ला च काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी ला बहुमत मिळाल्याचे सिद्ध झाले. त्यांनी २ दिवसांत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ह्यांच्या नावाची घोषणा केली.पण आज १० दिवस झालेत तरी शपथविधी काही झाला नाही. दोन पक्षांमध्ये कोणते खाते कोणाला मिळावे (खरं तर जास्त मलई कोणाला मिळावी) ह्यावर त्यांची चर्चा चालू आहे.शपथविधीकरीत...
ऑक्टोबर १३, २००९
ऑक्टोबर १३, २००९ ११:२३ AM
देवदत्त
अनुभव
0 प्रतिक्रिया

साधारण एप्रिल-मे च्या दरम्यान ठाणे रेल्वे स्थानकावर गेलो होतो. बांधकाम सुरू असलेल्या सॅटीस(SATIS) च्या खालून जाताना वाटले, करत आहेत ते चांगले आहेच. पण दादर रेल्वे स्थानकासमोरील पुलाखाली फेरीवाले ज्याप्रमाणे बाजार मांडून ठेवतात तसे नको व्हायला.
आत पुन्हा ५ महिन्यांनी तिकडे गेलो तर बांधकाम पूर्ण झाले...
ऑक्टोबर ०४, २००९
ऑक्टोबर ०४, २००९ १:०८ AM
देवदत्त
मराठी
4 प्रतिक्रिया

गेल्या आठवड्यात लोकप्रभामध्ये मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोशाबद्दल(सीडी आवृत्ती) वाचले. लगेच दुपारी ठाण्यातील दुकानांत फोन फिरविले. पण कुठेही ते उपलब्ध असण्याची शक्यता दिसली नाही. मग माझ्या पुढच्या आशास्थानावर लक्ष्य केंद्रित केले. "दादर मधील आयडियल बुक डेपो". तिकडुन ह्याची सीडी घरी आणण्यात आली.
खरंतर...
सप्टेंबर २८, २००९
सप्टेंबर २८, २००९ ८:०६ PM
देवदत्त
भ्रमणध्वनी, संकेताक्षर
0 प्रतिक्रिया
गेले काही महिने, खरं तर फेब्रुवारी ०९ पासून, आपल्याला येणार्या बँक किंवा विक्रेत्यांच्या मोबाईल लघु संदेशात पाठवणार्याच्या नावात २ ठराविक प्रकारची अक्षरे देऊन मग पाठवणार्याचे नाव लिहिले असते. एवढा अंदाज होता की TRAI च्या आदेशानुसार सर्व कंपन्यांना असे करणे बंधनकारक असेल. पण त्या अक्षरांचे अर्थ कळत नव्हते. मला आलेल्या संदेशांमध्ये मुख्य:त्वे TM, TA असे लिहिलेले असायचे. त्याचा मी लावलेला अर्थ TM=Telemarketing आणि TA=Transaction Alert असा होता....
१२:३८ AM
देवदत्त
चित्रपट, दूरदर्शन
1 प्रतिक्रिया
आज नेहमीप्रमाणे दूरदर्शन(संच) वर वाहिन्यांवरील कार्यक्रम चाळत असताना ४ वाजता दूरदर्शन(आता वाहिनी) च्या राष्ट्रीय वाहिनीवर 'दशावतार' सिनेमा दाखवत असल्याचे लक्षात आले. प्रमाणपत्रावर वर्ष होते २००८. कमल हासनचा 'दशावतारम' लक्षात होता. त्यामुळे पहायचे ठरविले.
सुरूवातीलाच लिहिले होते की त्यातील animation हे पुराणातील कथांवरून घेतलेले आहे. कमल हासनच्या 'अभय' मध्ये असे अॅनिमेशन दाखविल्याचे पाहिले होते. त्यामुळे वाटले की, ते इतिहास/संदर्भ दाखविण्याकरीता...
सप्टेंबर २५, २००९
सप्टेंबर २५, २००९ १२:५९ AM
देवदत्त
भ्रमणध्वनी
0 प्रतिक्रिया
वर्ष २००८. पुण्यात एअरटेलचे प्रिपेड कार्ड घेउन बहिणीला मुंबईत दिले होते. पण काही कारणाने त्यावरून काही संपर्क करीता येत नव्हता. कार्डमध्ये बाकी असलेले पैसे ही पाहता येत नव्हते. कसातरी ग्राहक सेवेचा क्रमांक शोधून काढला. पण कार्ड पुण्याचे, मी ठाणे/मुंबईत. ह्या वरून त्यांनी मला भरपूर फोनाफोनी करावयास लावली. त्यातच एकाने मला ९८२००९८२०० हा नंबर दिला म्हणाला "ह्या क्रमांकावर एअरटेलला संपर्क करा." मला खात्री होती की तो क्रमांक हच/वोडाफोनचा आहे. पण त्यास...
मे १०, २००९
मे १०, २००९ ८:२५ PM
देवदत्त
अनुभव, भटकंती, महाराष्ट्र
0 प्रतिक्रिया
ह्या आधी:
भटकंती (ठाणे ते शेगाव)
भटकंती (शेगाव- आनंदसागर)
शनिवारी सकाळी पुन्हा मंदिरात जायचे होते दर्शनाला. साधारण ८ वाजता तयार होऊन आम्ही निघालो. विचार केला होता की दर्शन घेऊन तसेच थेट निघता येईल. म्हणून मग सर्व सामान गाडीत ठेवले व हॉटेलची खोली सोडून दिली. आम्ही असलेली जागा ही मंदिराच्या पश्चिम द्वारासमोर...
मे ०२, २००९
मे ०२, २००९ १०:४३ PM
देवदत्त
चित्रपट, मराठी
1 प्रतिक्रिया

गेले २ आठवडे 'गल्लीत गोंधळ.. दिल्लीत मुजरा' ह्या चित्रपटाच्या जाहिराती पाहत होतो. काल हा सिनेमा प्रदर्शित झाला. आज वेळ जमून आल्याने हा सिनेमा पहावयाचे ठरविले. आज सकाळी फोनवरून सिनेमाचे तिकीट काढून ठेवले. वाटले आज शनिवार आहे, त्यात नवीन हिंदी चित्रपट आले नाहीत. म्हणून गर्दी असायची. (मराठी सिनेमाला गर्दी...
मे ०१, २००९
मे ०१, २००९ ७:५१ PM
देवदत्त
अनुभव, भ्रमणध्वनी
1 प्रतिक्रिया
गेला महिनाभर निवडणूकीबद्दलचे SMS येत होते. "Save Thane","Vote for XXXXX","Don't vote for XXXXX" वगैरे वगैरे. वैताग आला होता त्या SMS चा. तसेच बाकीचे जाहिरातींचे SMS ही होतेच, ज्याला आपण टेलिमार्केटींग म्हणतो त्या प्रकारचे. Do Not Disturb मध्ये नंबर नोंदवूनही हे SMS येत असल्याने तक्रार करण्यास माझ्या मोबाईल कंपनीच्या ग्राहक केंद्राला संपर्क केला. ते म्हणाले, 'पहिल्यांदा तक्रार करताना तुम्हाला लेखी तक्रार द्यावी लागेल" त्यामुळे मला त्यांच्या कार्यालयात...
एप्रिल ३०, २००९
एप्रिल ३०, २००९ १:४३ PM
देवदत्त
0 प्रतिक्रिया

'जर तुम्ही मतदान केले नसेल तर तुम्हाला सरकारला काही बोलण्याचा हक्क नाही', अशा आशयाचे वाक्य सिनेमात/इतरत्र भरपूर वेळा ऐकले होते, पटतही होते. जरी गेले काही वर्षे मी मतदान करावेच ह्या मतावर होतो तरी सध्याच्या परिस्थितीत वाटत होते की मतदान करावे की नाही? खरंतर ह्याच्या कारणाचाही उहापोह करणे गरजेचे नाही...
एप्रिल २१, २००९
एप्रिल २१, २००९ ८:३४ PM
देवदत्त
अनुभव, भटकंती, महाराष्ट्र
3 प्रतिक्रिया
ह्या आधीचे: भटकंती (ठाणे ते शेगाव)
शेगावला पोहोचल्यानंतर पहिले गेलो ते भक्त निवास क्र. ५ कडे. भक्त निवास क्र. ३ ते ६ हे चार बाजूंना बांधून मध्ये मोकळी जागा ठेवली आहे. तिथूनच आनंद सागर करीता शेगाव संस्थानाचा बस थांबा आहे. त्या थांब्यावर खूप मोठी रांग होती. एकंदरीत अंदाज आला होता की आनंदसागरला काहीतरी...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)