सप्टेंबर २९, २०१०

धक्का बसला ना?

गेले काही महिने मटावरील बातम्यांव्यतिरिक्त इतर गोष्टींबद्दल चर्चा होत होत्या. नायिकांचे हॉट फोटो, मसालेदार बातम्या वगैरेंची रेलचेल असते अशा प्रकारे काही काही. आणि ते आहेच. मटाच्या पानावर गेले की रंगीबेरंगी चित्रे दिसतात, आणि भरपूर काही :)

पण आज आणखी काहीतरी जास्त दिसले (अमेरिकेतून पाहिले असताना). मटा वर ब्लू फिल्म ची जाहिरात. अर्थात मटा ने स्वतः ती टाकली नसेल. गूगल च्या अ‍ॅडसेन्सची कृपा ती. गूगलने कोणते निकष लावून ती जाहिरात दाखवली माहित नाही. पानावरील मजकूरावरून म्हणायचे तर मी होतो 'हसा लेको' पानावर. इतर पानांवर नाही. किंवा मग मटा ने काय प्राथामिक माहिती त्यांना दिली त्यांनाच माहिती. (गूगल  अ‍ॅडसेन्स बद्दल माहिती असणार्‍यांनी प्रकाश टाकावा ही विनंती. :)




१ २ महिन्यांपूर्वीच गूगलने, जीमेल मध्ये ज्या जाहिराती दाखवल्या जातात त्यामध्ये सुधारणा केली असे सांगितले होते. आणि आधी माहित असल्याप्रमाणे गूगलने अजून तरी मराठी मजकूराकरीता अ‍ॅडसेन्स बनविला नव्हता. आता आला असेल तर त्यात भरपूर लोचा आहे ;) त्यामुळे माझ्या अनुदिनीकरीता तरी अ‍ॅडसेन्स दूरच राहील. (तसा त्याबद्दल विचारच नाही केला अजून)

असो. मटाची होत असलेली प्रगती आणि आता अशी जाहिरात (चुकून?) आली असली तरी मटावर तसा मजकूर येईल अशी आशा बाळगू नका. भारतातल्या नियमांप्रमाणे त्याला बंदी आहे. ;)

3 प्रतिक्रिया:

देवदत्त म्हणाले...

आज सकाळी पाहिल्याप्रमाणे इसकाळच्या संकेतस्थळावरही तशीच जाहिरात दिसली. म्हणजे हा गूगलचाच प्रताप आहे :)

मी मराठी .... म्हणाले...

मटा एक नावाजलेल वृत्तपत्र , पण मटा नेट मला अजिबात आवडत नाही , ती त्या वरील अश्लील फोटो व बातम्या (आता हा गुगलचा प्रताप वगळून ). मटा तरी आपलं वृत्तपत्र चालवायला याची गरज नसावी. इतर सादर चांगली असली तरी नेटमटा वाचावासा वाटत नाही. इतर नेट वृत्तपत्र मला अशी फुटकळ दिसत नाही. मटा ने जरा याचा विचार करायला हवा.

देवदत्त म्हणाले...

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद मी मराठी.
मटा छापील वृत्तपत्रही आमच्या घरी येते. बाकी इतर मराठी वृत्तपत्र संकेतस्थळांपेक्षा इसकाळ आणि मटा लगेच बातमी देत असतात म्हणून पाहतो.
बाकी त्यांच्या त्या फोटो आणि बातम्या ह्या त्यांच्या मूळ संकेतस्थळ म्हणजेच Indiatimes च्या Framework मुळे दाखवाव्या लागत असतीलच. आणि Indiatimes किंवा Times Of India ह्यांनी तर त्या मर्यादा पाळणे बहुतेक आधीपासूनच बंद केले आहे.

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter