ऑगस्ट ०५, २०१४


हम आपके हैं कौन?
आजपासून बरोबर २० वर्षांपूर्वी ५ ऑगस्ट १९९४ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला. सुरूवातील लग्नाच्या गाण्यांचे चित्रहार, साडे तीन तासांचा लांबलचक चित्रपट म्हणून टीका झाली. पण चांगला चित्रपट आहे आवडला असेही लोक सांगू लागले. निर्माते बडजात्या यांनी चित्रपटाची व्हिडीयो कॅसेट चित्रपटाच्या प्रदर्शनाच्याच दिवशी बाजारात न आणता, संपूर्ण भारतात फक्त २७ प्रती काढून प्रदर्शित केला आणि त्याची तिकीटही जास्त ठेवली. पण तरीही प्रेक्षकांनी ह्या चित्रपटाला मोठा प्रतिसाद दिला.

घरातील मंडळी चित्रपट पाहून आली. आल्यानंतर काही दिवस ह्याच चित्रपटाची चर्चा. त्यामुळे ह्या चित्रपटाविषयी आकर्षण निर्माण झाले होते. पण मला बारावीचे वर्ष असल्याने चित्रपटगृहात जाण्याची संधी मिळाली नाही.

त्यानंतर १ वर्षांनी म्हणजे जुलै १९९५ मध्ये हा चित्रपट पाहण्याचा योग आला, तोही त्यांच्या मुख्य चित्रपटगृहात 'लिबर्टी चित्रपटगृह'. तेव्हा त्यांनी चित्रपटाला ५० आठवडे पूर्ण झाले म्हणून २ गाणी आणि १० दृश्ये नवीन जोडलीत असे ऐकले होते. ती दोन गाणी म्हणजे चॉकोलेट लाईम ज्यूस.. आणि मुझसे जुदा होकर... दृश्ये नवीन कोणती ते कळण्याचा मार्ग नव्हता, पण ह्या गाण्याच्या आधीचे २-३ तर नक्कीच असतील.
म्हणजेच मी पहिल्यांदा चित्रपट पाहिला तो पूर्ण. आधीच्या लोकांनी पाहीला तसा निर्बंधित नाही. ;)

त्यानंतर पुन्हा १ वर्षांनी महाविद्यालयीन काळात पाहिला लोणी येथील चित्रपटगृहात. पहिल्यांदा पाहिला तेव्हा ८० रू तिकीट होते आणि नंतर पाहिला तेव्हा ५ रू तिकीट. पण दोन्ही वेळेला पूर्ण ३:४० तासांचा, २ इंटर्व्हल सोबत.

चित्रपटाच्या कथा आणि गाण्यांबद्दल बोलायला नकोच सर्वांनाच माहित आहे. पण एवढेच सांगतो की हा चित्रपट तेव्हाही आवडला होता, आताही आवडतो. कधीही दूरदर्शन वाहिन्यांवर लागला तर जमेल तेवढा नक्की पाहतो. 

(प्रकाशचित्रः आंतरजालावरून साभार)


जुलै १३, २०१४


नवीन सरकारचा बहुचर्चित आणि बहुअपेक्षित अर्थसंकल्प गुरूवारी जाहीर झाला. थेट कर आणि सवलतींच्या बाबतीत करतज्ञ, करसल्लागार आणि बहुतेक 'आम आदमी'च्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्या तरी खूप चांगला अर्थसंकल्प असे म्हटले जात आहे. अर्थात सत्ताधारी घटक पक्ष आणि विरूद्ध पक्ष ह्यांचे मत वगळून. कारण ते नेहमीच परस्पर विरोधी आणि पक्षसापेक्षच असेल.


लहानपणी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काय बदल होणार ह्याची संपूर्ण यादी दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात यायची ती मी वाचून काढायचो. (तेव्हा सभागृहाचे थेट प्रक्षेपण आणि वृत्तवाहिन्या दोन्ही नव्हते.) सगळे कळत नसे, पण किरकोळ वस्तू, ज्या नेहमी पाहिल्या जात, जसे की टीव्ही, सिगरेट, घरगुती गॅस. पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वगैरे वगैरे, ह्यांच्या किंमतीत किती फरक पडणार तेच कळायचे. अर्थात आताही त्या गोष्टीच लगेच कळतात. नोकरी लागल्यानंतर मात्र कर, गुंतवणूक ह्यामुळे अर्थसंकल्पातून आपल्याला किती फरक पडणार हे दिसायला लागले. बाजारातील इतर वस्तूंचे भाव असे तसेही बदलत असतात, त्यामुळे त्यावर फक्त अर्थसंकल्पाचा फरक पडत नाही. उरले फक्त कर आणि गुंतवणूक. गेले काही वर्षे मी ह्यात जास्त रस घ्यायला सुरूवात केली. त्याच अनुषंगाने मी माहिती लिहिणेही सुरू केले होते, पण कार्यबाहुल्यामुळे ते सुरू राहिले नाही. असो, पुन्हा ह्या वर्षीच्या अर्थसंकल्पाकडे वळुया. 

निवडणुका झाल्यानंतर करतज्ञ, करसल्लागार आणि वृत्तवाहिन्या ह्यांनी लोकांच्या अपेक्षा खूप वाढवून ठेवल्या होत्या, जसे की करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 
रू.३ लाख किंवा रू.५ लाखही करण्यात येईल. वाहतूक भत्ता रू.२००० प्रति महिना, वैद्यकिय भत्ता रू.५०००० प्रति वर्ष (जे मी माझ्या मागच्या पोस्ट मध्ये लिहिले होते) हे सर्व होण्याची इच्छा होती पण खात्री नव्हतीच. आणि त्याप्रमाणे जास्त काही मिळाले नाही. अर्थात काय चांगले काय वाईट ते न चर्चिता फक्त वैयक्तिक पातळीवर थेट कोणता फरक पडला हेच ह्यात पाहू. 

सर्वात प्रथम पाहू करपात्र उत्पन्नावरील कर संरचना किंवा Income Tax Slabs:
करमुक्त उत्पन्नाची मर्यादा रू.२.० लाखांवरून रू.२.५ लाख करण्यात आली आहे. ६० ते ८० वर्षांच्या वरिष्ठ नागरिकांकरीता हीच मर्यादा रू.२.५ लाखांवरून रू.३ लाखांपर्यंत नेण्यात आली आहे. इतर काही बदल करण्यात आले नाही.
म्हणजेच ह्यावर्षीचा तक्ता असा असेल.

१. वय ६० वर्षांपेक्षा कमी.

एकूण उत्पन्न (रू.)
कर (%)
शिक्षण अधिभार (%)
अधिभार(%)
कर सूट (रू.)
० - २,५०,०००
२,५०,००१ - ५,००,०००
१०
२००० (???)
५,००,००१ - १०,००,०००
२०
१०,००,००१ - १,००,००,०००
३०
१,००,००,००१ पेक्षा जास्त
३०
१०

२. वय ६० वर्ष किंवा जास्त पण ८० वर्षांपेक्षा कमी .

एकूण उत्पन्न (रू.)
कर (%)
शिक्षण अधिभार (%)
अधिभार(%)
कर सूट (रू.)
० - ३,००,०००
-
३,००,००१ - ५,००,०००
१०
२००० (???)
५,००,००१ - १०,००,०००
२०
-
१०,००,००१ - १,००,००,०००
३०
-
१,००,००,००१ पेक्षा जास्त
३०
१०

३. वय ८० वर्ष किंवा जास्त

एकूण उत्पन्न (रू.)
कर (%)
शिक्षण अधिभार(%)
अधिभार(%)
कर सूट (रू.)
० - ३,००,०००
-
३,००,००१ - ५,००,०००
-
५,००,००१ - १०,००,०००
२०
-
१०,००,००१ - १,००,००,०००
३०
-
१,००,००,००१ पेक्षा जास्त
३०
१०
-

अद्ययावत (२५ जुलै):'कर सूट'मध्ये मी '???' ह्याकरीता लिहिले आहे कारण गेल्या वर्षी देण्यात आलेले कलम 87A ह्यावर्षीही आहे की नाही ह्याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही आहे. मी वाचल्याप्रमाणे, जर अर्थसंकल्पात ह्या कलमाबाबत काही म्हटले नाही आहे तर ती सूट ह्यापुढेही लागू असेल. पण कलम 80CCF ची सूट पुढे वाढविली तेव्हा त्याबाबत तसे अर्थसंकल्पात सांगितले गेले होते.जर कलम 87A ह्यावर्षीही लागू असेल तर मग गेल्या वर्षी देण्यात आलेले कलम 87A ह्यावर्षीही लागू असेल. त्यामुळे रू. ५,००,००० खाली करपात्र उत्पन्न असणार्‍यांना ती करमुक्त मर्यादा रू. २,७०,००० असेल तसेच वरिष्ठ नागरिकांना हीच मर्यादा रू. ३,२०,००० असेल.

वरील रू. ५० हजारांच्या करमुक्त उत्पन्नामुळे प्रथमदर्शनी १०% करवाल्यांना रू. ५०००, २०% करवाल्यांना रू. १००००, ३०% करवाल्यांना रू. १५००० असे वाटते. पण ही मर्यादा ५ लाखांच्या खालीच असल्याने सर्वच करदात्यांना रू. ५००० चाच फायदा आहे.

कलम 80Cची मर्यादा:
ह्या अर्थसंकल्पानुसार कलम ८०C ची मर्यादा रू. ५०,००० ने वाढवून रू. १,५०,००० करण्यात आली आहे. त्यामुळे १०% करवाल्यांना रू. ५०००, २०% करवाल्यांना रू. १००००, ३०% करवाल्यांना रू. १५००० ची अतिरिक्त सूट मिळेल.


गृहकर्जावरील व्याजावर सूटः
ह्या अर्थसंकल्पानुसार गृहकर्जावरील व्याजावर सूट वाढवून रू. १,५०,००० वरून रू. २,००,००० पर्यंत वाढविण्यात आली आहे. म्हणजेच १०% करवाल्यांना रू. ५०००, २०% करवाल्यांना रू. १००००, ३०% करवाल्यांना रू. १५००० ची अतिरिक्त सूट मिळेल.


किसान विकास पत्र
 पुन्हा सुरू करण्यात आले आहे. पण ह्याबाबत विस्तृत माहिती उपलब्ध नाही आहे.


सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) 
ची मर्यादा रू. १,००,००० वरुन रू. १,५०,००० करण्यात आली आहे.


डेट फंड च्या नफ्यावरील करः
आत्तापर्यंत डेट फंड मधील गुंतवणूकीवर जो नफा मिळत होता त्याचा लघु किंवा दिर्घमुदत कालावधी १२ महिने होता,  आणि दीर्घमुदत भांडवली नफ्यावर १०% कर लागत होता.

ह्य अर्थसंकल्पानुसार हा कालावधी ३६ महिने करुन कर २०% करण्यात आला आहे.

अद्ययावत (२५ जुलै): 
तसेच हा कर १ एप्रिल २०१४ पासून लागू करण्यात आला आहे. तसेच हा कर ११ जुलै २०१४ पासूनच्या खरेदीवर लागू करण्यात आला आहे.

म्हणजेच ३६ महिन्यांच्या आधी डेट फंड मधील गुंतवणूक ३६ महिन्यांआधी काढल्यास लघुमुदत भांडवली नफा असेल आणि ते एकूण उत्पन्नात गणले जाईल. आणि ३६ महिन्यांनंतर काढल्यास नफा दीर्घमुदत भांडवली नफा असेल व त्यावर २०% कर भरावा लागेल. इंडेक्सेशनच्या पर्यायबद्दल माहिती सध्या उपलब्ध नाही.

जीवन विमा:
जीवन विम्यामधून मिळालेला बोनस आणि इतर रक्कम (कलम १० मध्ये नमूद केलेल्या उत्पन्नाशिवाय इतर) जी रु. १,००,०००/- पेक्षा जास्त आहे यावर २% कर कापून मग विमाधारकाला देण्यात येईल. उरलेला कर भरण्याची जबाबदारी हा विमाधारकाची असेल.

रू ५००००/- पर्यंतच्या विम्यावर सेवा कर लागणार नाही.

डिव्हीडंड:
म्युच्युअल फंड, समभाग (शेअर्स) ह्यांवरील मिळणार्‍या डिव्हीडंडवरील डिव्हीडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स भरल्यानंतर गुंतवणूकदाराच्या हाती करमुक्त असे. परंतु, ह्या अर्थसंकल्पानुसार हा कर ह्यावर केलेल्या बदलानुसार पूर्ण रक्कमेवर कर भरावा लागणार असल्याने गुंतवणूकदाराच्या हाती कमी पैसे पडतील.


रेडिओ टॅक्सी:
रेडिओ टॅक्सी उदा. मेरू, टॅब कॅब ह्यांना सेवा कराच्या यादीत आणल्याने ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

तसेच विदेशांत ३ दिवसांपेक्षा जास्त दिवस राहून परत येणार्‍या नागरिकांकरीता शुल्क मुक्त सामानाची मर्यादा रू. ३५,००० वरून रू. ४५,००० करण्यात आलेली आहे.

वरील सर्व मुद्दयांनुसार आपणांस करातून थोडी सूट मिळत आहे. तरी ह्याचा नीटसा फायदा मिळणार नाही. कारण करमुक्त उत्पन्नावरील मर्यादावाढीमुळे ५००० रू वाढतील पण सर्वत्र वाढलेल्या महागाईमुळे तसेच नुकत्याच झालेल्या  रेल्वेभाड्याच्या वाढीमुळे हे रू. ५००० न आल्यासारखेच आहेत. तसेच बचतीकरीताच पैसे जास्त उरत नसल्यास ८०C मध्ये आणखी गुंतवणूकीला पैसे कुठून आणायचे हा प्रश्न बहुतेकांना पडला असेल.

अर्थात, ज्यांची गुंतवणुकीची रक्कम आधीच रू. १,००,००० च्या वर होती पण करबचत होत नव्हती, तसेच गृहकर्जावरील व्याजावर करबचत कमी होती त्यांच्याकरीता ह्याचा फायदा आहेच. आणि गेल्यावर्षीही तसा काहीच फायदा न झाल्याने ह्यावर्षी मिळालेले थोडेही आनंद मानण्यासारखेच आहे.


(चित्र आंतरजालावरून साभार)


जून २२, २०१४


नवीन सरकार आले आणि माध्यमांनी, विविध करविषयक संकेतस्थळांनी आपापली शक्कल लावून ह्यावेळी थेट करात ही सवलत मिळेल, ही मर्यादा वाढवून मिळेल असे लिहायला, दाखवायला सुरूवात केली आहे. अर्थात हे सगळे अंदाज आणि अपेक्षाच आहेत.

मग मी का नाही माझ्यातर्फे अर्थसंकल्पातील बदल लिहून द्यावेत? :)
१.  ५ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त, ५-१० लाखांवर १०%, १०-२० लाख २०%, २०लाखांच्या वर ३०%
२.  ८०सी मध्ये भरपूर गोष्टी भरल्यात त्या कमी न करता त्याची मर्यादा १ लाखांवरून २ लाख.
३.  वाहतूक भत्ता ८००/- रू प्रतिमहिना वरून २०००/- रू प्रति महिना. म्हणजे वार्षिक २४००० रू.
४.  वैद्यकीय भत्ता रू. १५००० वार्षिक वरून रू ५००००/-.
५.  ज्येष्ठ नागरिकांना TDS रू १००००/- ऐवजी २५०००-३००००/-रू. किंवा मग TDS नाही.
६.  ८०डी ची मर्यादा रू. ५००००/-
७.  अवयस्क मुलांच्या उत्पन्नावर रू. १५००ची सूट आहे ती रू. ५०००/- प्रति मूल.
८.  फूड कुपनची मर्यादा ५०/७५ रू प्रतिदिनावरून १००-१५० रू प्रतिदिन.
९.  गृहकर्जाच्या व्याजावर १,५०,००० च्या ऐवजी ३,००,००० लाखांची मर्यादा.

वगैरे वगैरे....

खरे तर ह्यातील काही गोष्टी गेल्या १-२ वर्षांपासून अपेक्षित आहेत. म्हणजे सर्व अर्थ, कर तज्ञ अशी मागणी आणि अपेक्षा करीत आहेत. पण अर्थमंत्र्यांनी सगळ्यांना ठेंगाच दाखवला. म्हणून बहुधा ह्यावर्षी 'अच्छे दिन'च्या नावाखाली एवढे मोठे बदल सांगितले जात आहेत. पण गेल्या काही दिवसांत जे बदल दिसले त्यावरून तर कितपत मिळेल हीच शंका आहे.

तुमचे काय मत आहे?
X

जानेवारी १९, २०१४

गृहकर्ज:
गृहकर्ज घेतले असल्यास त्याची मूळ रक्कम आणि व्याज ह्यांच्या परतफेडीवर करसवलत मिळते.
मूळ रक्कमेची परतफेड कलम 80C नुसार करसवलतीस पात्र आहेत. ह्याची मर्यादा रू. १,००,०००/- आहे.
स्टँप ड्यूटी आणि नोंदणीच्या खर्चावरही करसवलत मिळते. कर्ज घेतले नसल्यासही ही सवलत मिळते.

गृहकर्जाच्या व्याजाची परतफेड ही कलम 24 नुसार करसवलतीस पात्र आहे. ह्याची मर्यादा प्रतिवर्ष रू. १,५०,०००/- आहे.

२०१३ च्या अर्थसंकल्पातील कलम 80EE  नुसार गृहकर्जावर रू. १,००,०००/- ची अतिरिक्त करसवलत मिळेल. पण ही सवलत फक्त ह्याच वर्षात लागू असेल. ह्यावर पुढील मर्यादा आहेतः
- हे गृहकर्ज आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये ग्राह्य केलेले असावे.
- घराची किंमत रू. ४०,००,०००/- आणि कर्जाची रक्कम रू. २५,००,०००/- पेक्षा जास्त नसावी.
- जर ह्या वर्षात व्याजाची परतफेड रू. १,००,०००-/ पेक्षा कमी असेल, तर पुढील आर्थिक वर्षात उरलेले १,००,००० पर्यंतचे व्याज करमुक्त असेल.

भागीदारीत कर्ज घेताना दोघांना कर्ज मिळू शकते, त्याकरीता सहमालक हा सहअर्जदार असावा. पण सहअर्जदार हा सहमालक असावाच असा बँकेचा नियम नाही. परंतु दोघांनाही करसवलत मिळवायची असल्यास सहअर्जदार हा सहमालक असणे गरजेचे आहे.

टीपः घराचा ताबा घेतल्यावर त्या आर्थिक वर्षापासून ५ वर्षांच्या आत घर विकल्यास, 80C नुसार आधी मिळालेली करसवलत ही रद्द होते, व ती पूर्ण रक्कम घर विकल्याच्या आर्थिक वर्षातील मिळकतीत जोडली जाते.

____________________________________________________________
खाजगी निवृत्ती वेतन योजना (Pension Funds)
विविध निवृत्ती योजनांमध्ये गुंतविलेले पैसे हे कलम 80C नुसार रू. १,००,०००/- च्या मर्यादेपर्यंत करसवलतीस पात्र असतात.

नवीन निवृत्ती वेतन योजना (New Pension Scheme - NPS) मध्ये गुंतविलेले पैसे हे कलम 80CCD मध्ये दर्शविले जातात. पण ते 80C मध्येच असून त्याची मर्यादा एकूण रू. १,००,०००/- एवढीच असते. तसेच एकूण पगाराच्या १०% एवढेच पैसे NPS मध्ये गुंतविले जाऊ शकतात.

वरील दोन्ही योजनांमधून निवृत्तीनंतर मिळालेले पैसे हे त्यावेळी एकूण मिळकतीमध्ये जोडून त्यानुसार कर आकारला जातो.

जानेवारी १८, २०१४


केंद्र सरकारने २०१२ मध्ये घरगुती गॅस सिलेंडरवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ग्राहकांना बाजारभावाप्रमाणे गॅस सिलेंडर घ्यावे लागतील हे समोर आल्यानंतर भरपूर विरोध झाला. मग केंद्र सरकारने त्यावर ६ सिलेंडरची सवलत दिली. पण फक्त काँग्रेसशासित राज्यांमध्येच. मग कालांतराने तो आकडा ९ केला. मला तेव्हाचा सिलेंडरचा बाजार भाव माहित नाही पण जानेवारीआधी तो रू.१०२५ असा काहीसा होता. आणि अनुदानीत सिलेंडरची किंमत रू. ४४५. आता विनाअनुदान सिलेंडरची किंमत आहे रू.१२७५.
ठाणे मुंबई मध्ये डिसेंबरपर्यंत ग्राहकांना आधार संलग्नित बँक खाते क्रमांक गॅस वितरकाकडे देण्यास सांगितले जेणेकरून ग्राहकांना अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात मिळेल. थोडेफार चांगले आहे.

मग गोलमाल कुठे दिसला मला?

सर्वात प्रथम अनुदान बंद करण्याचा निर्णय. गॅस कंपन्यांना त्यांचा लाभ मिळावा व ते त्यांच्या मर्जीप्रमाणे भाव ठरवू शकतील. पण विरोधानंतर त्यात बदल केला. ह्यात विरोध अपेक्षित नव्हता का? होता तरी मग त्यात पूर्ण राजकारणच होते का?

आता ग्राहकांना मिळणारे अनुदान. अनुदानीत सिलेंडरची किंमत ४४५ रू. पण आधार संलग्नित केल्यापासून पहिल्या ९ सिलेंडरची जी काही किंमत असेल ती ग्राहकाने वितरकाला द्यायची. त्याच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा होतील. एक तर आधी जे घोटाळे समोर आलेत त्यामुळे पैशांच्या बाबतीतील सरकारी योजनांबाबत आधीच मी साशंक आहे. त्यामुळे जरी हे पैसे आता खात्यात जमा होत आहेत तरी ते नीट आहे का आणि पुढे नीट चालेल का हा प्रश्न आहे. चालले नीट तर मला आनंदच आहे.

चला खात्यात तर पैसे जमा झाले. पण किती? रू. ४३५. वितरकाला दिले १२७५. म्हणजे आम्हाला द्यावे लागले एकूण रू. ८४०.
अरे हो, एक राहिलेच. खात्यात मिळणारे हे पैसे करमुक्त असतील की ते ही आर्थिक मिळकत म्हणून त्यावर कर लावावा ह्यावर विचार सुरू आहे. म्हणजे सिलेंडर आणखी महाग.

ह्या सर्वामुळे आधार संलग्नित करून सिलेंडरचा दर तर जवळपास दुप्पट झाला. मग ह्यात ९ सिलेंडर अनुदानीत मिळतील हा मुद्दा कुठे येतो?

जानेवारी ०९, २०१४

जानेवारी महिना उजाडला. जानेवारी म्हणजे आर्थिक वर्ष अखेरीची जाणीव होणे सुरू होते. आता विविध कंपन्यांमधून कर मोजणीकरीता त्यांच्या कर्मचार्‍यांकडून त्यांनी  केलेल्या गुंतवणूकीची कागदपत्रे मागण्यास सुरूवात होईल, किंबहुना झालीही असेल. ज्यांनी ती कागदपत्रे तयार ठेवली असतील त्यांच्याकरीता चांगले. पण ज्यांची कागदपत्रे तयार नसतील किंवा गुंतवणूकच केली नसेल त्यांनी आता धावपळ करायला पाहिजे. कारण, उगाच मार्चपर्यंत वाट पाहिली तर कार्यालयातून कर तर कापला जाईलच, परंतु ऐनवेळी आपल्याला पाहिजे असतील त्या योजना उपलब्ध असतीलच असे नाही. तसेच उपलब्ध असतील त्या सर्वच योजना खरोखरच चांगल्या असतील असे नाही.

ह्याच अनुषंगाने माझी अर्धवट राहिलेली ही लेखमालिका ही जमेल तेवढी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. गेल्या महिन्यात जीवन विम्याच्या खूप योजना बंद झाल्यात आणि जानेवारी महिन्यात नवीन योजना आणण्यास सुरूवात झाली आहे. त्याचाही जमल्यास आढावा घेईन.

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter