२६ नोव्हें २००८ ला हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली एवढेच मी म्हणू शकतो. इतर काही परवा लिहू नाही शकलो. खरं तर लिहावे असे वाटलेही नव्हते. पण तरी आताही मनात सारखे येते म्हणून लिहून टाकले.
बाकी, हे का झाले, काय करायला हवे होते, न होण्याकरीता पुढे काय करायला हवे ह्याची चर्चा सर्वत्रच होत असते.
पण नेमकी पावले उचलली गेलीत का हाच प्रश्न आहे? तसेच त्या हल्ल्यातील मृतांच्या/जखमींच्या कुटुंबियांना योग्य मदत मिळाली का? हेच सरकारला विचारू शकतो.
कसाबला जिवंत पकडून त्याच्यावर खटला दाखल केला गेला. आणि खरंतर तो खटला अजूनही चालूच आहे, ह्याचे वाईट वाटून घ्यावे की उज्ज्वल निकम ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा खटला इतर खटल्यांपेक्षा लवकर निकालात निघेल ह्याचा आनंद मानावा?
जरी कसाबला फाशीची शिक्षा सुनावली तरी त्याचीही अंमलबजावणी सारखी पुढे ढकलली गेली तर?
त्यामुळे ज्या दिवशी कसाबला फासावर लटकवले जाईल तेव्हाच ह्या हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली वाहिली असे म्हणता येईल.
नोव्हेंबर २८, २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा