- सचिन तेंडुलकरचा १७००० धावांचा विक्रम. १४१ चेंडूत १७५ धावा. सचिनचे अभिनंदन.
- सचिन बाद झाल्यावर भारताचा डाव गडगडला. भारत ३ धावांनी पराभूत. इतिहासाची पुनरावृत्ती.
"असे म्हणतात की ब्रॅडमन तुमच्या संघात असताना अगदी वाईटात वाईट स्वप्न पडले तरी सामना हरल्याचे स्वप्न पडणार नाही . पण सचिनबाबत हे आपण म्हणू शकत नाही."
सचिनच्या खेळीवर माझी टीका नाही. पण संघाची साथ बहुधा मिळत नाही. त्यामुळेच त्या वाक्याची प्रचिती पुन्हा दिसली.
7 प्रतिक्रिया:
आता काय जीव द्यावा का त्याने पिचवर? 175 रन्स 141 बॉल मध्ये. अजून काय करायला हवं? ढोणी का नाही स्टेबल राहु शकला?
सचिन खरं तर ऑसी कडे असता तर त्यांनी सगळॆ वर्ल्डकप जिंकले असते. आणि उलट आपण आहोत. तो खेळला तरच जिंकतो.
साधक ह्यांची "आता काय जीव द्यावा का त्याने पिचवर?" ही प्रतिक्रिया फारंच विनोदी वाटली .. अर्थात त्यांची चुकी नाही .. टिपिकल भारतिय मेंटॅलिटी आहे ही. जो खेळला त्याचं मारे कौतुक .. जो आपटला त्याला पार शिविगाळ !
असो .. भारतानं (सचिन) बिग टार्गेट चेस करताना दाखवलेलं जिगर अप्रतिम होतं .. हल्ली असं जास्त पहायला मिळतंय .. हीच आनंदाची बाब आहे ..
आणि मला तरी ही सेरिज फिक्स वाटतेय ;)
खरं आहे. १९९९ मध्ये देखील पाकिस्तान विरुद्ध जिंकण्यासाठी फक्त १६ धावा कमी असताना सचिन बाद झाला, ३ गडी शिल्लक होते तरीही भारत १२ धावांनी हरला होता. काल पुन्हा तसेच झाले. रिकी पॉंटिंग आणि सचिन तेंडुलकर मध्ये हाच मोठा फरक आहे. रिकी पॉंटिंगला पूर्ण संघाची साथ आहे. सचिन सारखाच ब्रायन लारा देखील एकटाच लढला.
साधक ह्यांस:
सचिन जीव ओतूनच खेळला होता. त्याबाबत माझे काही म्हणणे नाही. पण ते वाक्य आठवले म्हणूनच लिहिले.
टारझन यांचे म्हणणेही पटते.
मीही फक्त सचिनच्या खेळण्याबाबतच खूष होतो.
भारत नेहमी सामना हरला तरी मला आता काही वाटत नाही. फक्त सचिनच्या खेळीनंतरही सामना हरलो हीच खंत आहे.
सिद्धार्थ: सचीनला संघाची साथ मिळत नाही हेच खरे.
बाकी मी कोणाची तुलना करू इच्छित नाही :)
स्टार माझ्याच्या ब्लॉग स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळाल्याबद्द्दल आपलं अभिनंदन!
स्टार माझ्याच्या ब्लॉग स्पर्धेत यश मिळाल्याबद्द्दल मन:पुर्वक – हार्दीक -अभिनंदन – शुभेच्छा!!
स्टार माझ्याच्या ब्लॉग स्पर्धेत यश मिळाल्याबद्द्दल मन:पुर्वक अभिनंदन!!!
टिप्पणी पोस्ट करा