२००५ मध्ये आलेल्या 'डोंबिवली फास्ट' चित्रपटात एक प्रसंग आहे. कथानायक माधव आपटे आपल्या सहकार्यासोबत एका दुकानात थंड पेय पिण्यास गेला असतो. तिकडे तो दुकानदाराने घेतलेले जास्त २ रू परत मागतो. ते न दिल्याने माधव त्याच्या दुकानात तोडफोड करून २ रू परत घेतो.
हा झाला चित्रपटातील प्रसंग. प्रत्यक्षात ह्याच्या उलट एक घटना घडली आहे. मटा मध्ये आलेल्या बातमीनुसार परळ रेल्वे स्थानकावर बुकिंग क्लार्कने प्रवाशाला त्याचा उरलेला एक रूपया परत न देता उलट त्या प्रवाशालाच मारहाण केली.
चित्रपटात माधव आपटेनी केलेली मागणी ग्राह्य धरली तरी त्याने अवलंबिलेला मार्ग किती योग्य आहे हा वादाचा प्रश्न आहे. तसेच मटावर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये मराठी विरूद्ध बिहारी हा प्रवाह आहे. मी त्या दोन्ही वादात सध्या शिरत नाही.
पण सध्या तरी ह्या बुकींग क्लार्कने केलेले कृत्य नक्कीच निंदनीय आहे. अशा माणसाला आधी लोकांनी, आणि नंतर कायद्याने शिक्षाच द्यायला पाहिजे.
डिसेंबर ०४, २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा