फेब्रुवारी २८, २०१०

आत्ताच दूरदर्शनची राष्ट्रीय वाहिनीवर पाहिले की भारत - पाकिस्तानमधील हॉकी सामना दाखवत आहेत आणि दूरदर्शनच्या क्रीडा वाहिनीवर इतर काही कार्यक्रम.

माझ्याकरीता तरी नवलाची गोष्ट, कारण गेल्या काही वर्षात तरी मी असे काही घडलेले पाहिले नाही (चू. भू. द्या. घ्या)

२६ मार्च २००६ ला माझ्या जुन्या एका ब्लॉगवरही हेच नोंदविले होते, की हॉकीपेक्षा क्रिकेटला जास्त महत्व दिले जाते. (हा व्लॉग याहू ३६० वर होता. पण याहू ने ती सुविधा बंद केली तेव्हा ते सर्व ब्लॉग इतरत्र टाकावे लागले)

बहुधा आज क्रिकेट सामना नाही म्हणून हॉकीला हे भाग्य लाभले म्हणायचे. असो, पण सध्या तरी हॉकी दिसत आहे आणि त्यात भारत पुढे आहे हेच चांगले ;)

फेब्रुवारी २४, २०१०

मराठी ब्लॉगविश्चात व्यंगचित्रांवरील एकमेव ब्लॉग चालवणारा व्यंगचित्रकार मीनानाथ धस्के याने माझे व्यंगचित्र काढले.
मला तर ते आवडले आहेच. पण तेच तुम्हाला दाखवण्यासाठी आणि प्रतिक्रिया मिळण्याकरीता म्हणून मी 'माझी अनुदिनीवर'ही टाकत आहे. :)


फेब्रुवारी ११, २०१०

शाहरूख खानने आय पी एल च्या खेळाडूंच्या लिलावानंतर पाकिस्तानी (म्हणत आहेत त्याप्रमाणे तर सर्वच देशांच्या) खेळाडूंना समर्थन दिले. शिवसेनेने त्याविरोधात दंड थोपटले आणि 'माय नेम इज खान' वर बहिष्कार टाकण्यास सांगितले. शाहरूख खान म्हणतो, " मला भारताबद्दल देशप्रेम आहेच. मी त्याविरोधात काही बोललो नाही." (नेमकी त्याची वाक्ये नाहीत पण आशय तोच).

गेले आठवडाभर हो नाही चालत, पुन्हा 'माय नेम इज खान' चा विरोध समोर आला. काँग्रेस सरकारने दुटप्पीपणा करत लगेच ह्या सिनेमाला सुरक्षा देण्याचे ठरवले. इतर वेळी ' सुरक्षा मागाल तर देऊ' ही भूमिका. शाहरूख खानने काही चर्चा करण्यास नकार दिला. आणि आता सिनेमाच्या प्रिमिअरकरिता थेट दुबईला गेलाय.

सर्व वादात शिवसेना, काँग्रेस, शाहरूख खान ह्यात कोण चूक, कोण बरोबर हे नेमके कोणालाच कळत नाही आहे. पण सध्या तरी शाहरूख खान ने एक चूक केली असे वाटते. त्याने म्हटलेल्या वाक्यावर रण माजले आहे. भले तो बरोबर असेल, पण त्याच्या सिनेमाच्या नावावर इथे सुरक्षेला धोका पोहोचत आहे आणि त्याची पर्वा न करता तो त्याच्या 'चाहत्यांना' अशा स्थितीत टाकून देशाबाहेर जाऊन बसलाय आणि सिनेमाची जाहिरात, प्रदर्शन करत आहे हे मला तरी पटत नाही. तो म्हटला त्याप्रमाणे हे देशप्रेम नाही.

फेब्रुवारी ०५, २०१०

ताजी बातमी : रॉकेल ६ रु., गॅस १०० रु. वाढीची शिफारस.
गेल्या कित्येक दिवसांपासून डाळ, तांदूळ, गहू, भाज्या, दूध, साखर ह्या सर्व महाग होत असलेल्या वस्तूंमध्ये आता रॉकेल, गॅसची ही भरती. अर्थात त्यांना भाववाढ करायची असेल ५० रू ची. पण १०० सांगितले तर ५० वर लोक तयार होतील असाच त्यांचा विचार असेल म्हणून १०० रू.ची शिफारस. आणि पुढे डिझेल/पेट्रोल रांगेत आहेतच. थोडक्यात काय, तर मागील वर्षी निवडणूकांच्या आधी पेट्रोल/डिझेल चे भाव कमी करून तसेच इतर काही गोष्टींचेही गाजर दाखवून काँग्रेस-राष्ट्रवादीने फासे टाकले आणि लोकांनी त्यांना निवडून दिले. त्यामुळे त्यांना आता वाटतेय की लोकांना काही फरक पडत नाही आपण काहीही केले तरी. म्हणूनच त्यांचे UPA झाले आहे Uncontrolled Price Alliance.

आपले कृषीमंत्री (नव्हे, महागाई मंत्री) हे तर एकामागोमाग एक परस्परविरोधी विधाने देत असतात. दररोज काय चालते ते आम्हाला नाही सांगितले तरी चालेल हो. पण निदान ज्याकरीता तुम्हाला निवडून दिले ते तर नीट करा. तुम्हाला नाही सांभाळता येत महागाईची परिस्थिती तर ठीक आहे एक वेळ मान्य, पण उगाच ह्याचा भाव वाढेल, त्याचा भाव वाढेल सांगून व्यापार्‍यांना का मोकळे रान देता? साठेबाजांवर, अनियंत्रित भावाने धान्य विकणार्‍यांवर कारर्वाई करा की. कोटला खेळपट्टी खराब निघाली तर एका दिवसात ती समिती विसर्जित केली तीच तत्परता लोकांच्या कल्याणाकरीता असलेल्या कामात दाखवा की.
 

आज ही भाववाढ सांगायची असेल म्हणूनच लोकांचे लक्ष वळविण्यासाठी बहुधा राहूल गांधींकरवी मराठीचा मुद्दा बोलविला गेला असेल असेच वाटते. ह्यावर विरोधी पक्षांनीही तोच मुद्दा पकडला. आणि त्याच्यावरून गदारोळ चालू झाला. गेल्या आठवड्यात शाहरूख खानचा मुद्दा, त्या आधी झेंडा सिनेमाचा मुद्दा, टॅक्सीवाल्यांचा मुद्दा. खरे मुद्दे सोडून दुसर्‍याच मुद्यांवर भांडणे चालू असतात.
आणि आपले मुख्यमंत्री तर नेहमी एकच वाक्य सांगतात, " आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही". एकच वाक्य मराठीत कोणकोणत्या प्रकारे बोलता येईल ह्याची चाचणी घेत असतील बहुधा. अरे, हो त्यांनीही तर मराठीचा मुद्दा घेऊन हातातल्या हातात फिरविला आहे. आज एक उद्या एक.

मनसे ला मराठीच्या मुद्यावर मते मिळाली तर सर्वांचेच लक्ष तिकडे गेले. शिवसेनाही तो आपलाच मुद्दा म्हणून बोलत असते. वास्तविक कधीतरी तो असेल त्यांचा मुद्दा. पण सध्या लोकांनी तो मनसेच्या हाती सोपवला आहे. तोपर्यंत शिवसेनेने हा महागाईचा मुद्दा तसेच इतर मुद्यांवरून सरकारला जेरीस आणले तर लोकांना त्यांच्यावर पुन्हा जुना विश्वास येईल. मग आहेच की मराठीचा मुद्दा. आणि तुमच्याच महानगरपालिकेत जर मराठी फलकांचा कायदा अंमलात आणला जात नसेल आणि मनसे ने त्यावर काही करुन दाखवले तर कोण चूक आणि कोण बरोबर?

आणि मनसे ने ही सध्या फक्त मराठीचा मुद्दा सोडून दुसरे मुद्दे हाती घेतले पाहिजेत असे वाटते. लोकांनी त्याबद्दल तुमच्यावर विश्वास दाखवला आहेच. पण आता लगेच आधी भूमीपुत्र आणि नंतर मराठी लिहिता/वाचता/बोलता येणार्‍यांना नोकरी देणे ह्याऐवजी, फक्त महाराष्ट्रात जन्मलेल्यांनाच नोकरी मिळाली पाहिजे असा पवित्रा घेतला तर लोकांचा नुकताच मिळालेला विश्वास कमी होईल हो. त्यापेक्षा साठेबाजी करणार्‍यांची गोदामे फोडून त्यांचा डाव उघडकीला आणला होता तसेच पुन्हा का नाही करत?  आणखी इतरही मुद्दे आहेतच की.

आत्ताच असे ऐकले की उद्या राहूल गांधी हेलिकॉप्टर ने मुंबईचा दौरा करणार आहे. अरे,  निवडणूकीच्या आधी तर साध्या ट्रेनमध्ये फिरत होते.आता कुठे गेली ती सर्वसामान्य लोकांसोबत फिरण्याची हौस? वास्तविक त्याची गरजच नव्हती. सर्वांनाच जर आपण पैसे वाचवतो हे दाखवायचे असेल तर चर्चेकरीता जे उठसूट ह्या शहरातून त्या शहरात विमानाने वार्‍या करता ते थांबवा की. आपल्या देशाने माहिती तंत्रज्ञानात प्रगती केली आहे, आणखी करत आहे मग त्याने दिलेले व्हिडीयो कॉन्फरंसिंग वापरून करा की चर्चा.

आणि इतर गोष्टीही घडत आहेत. संजय निरूपम म्हणताहेत," भैया लोकांकरीता मोटार वाहन कायद्यात बदल करावा" अरे, काय वाट्टेल ते कराल काय? आणि काय काय.. यादी संपतच नाही.

सर्व पक्षांना /राजकारण्यांना एकच विनंती. तुम्ही म्हणत आहात ते मुद्दे मान्य करू आम्ही. शाहरूख खानने देशविरोधी वाक्य म्हटले असेल तर त्याचा निषेध करू. भैया लोक येऊन मराठीवर वर्चस्व दाखवायचा प्रयत्न करत आहेत त्यांना इंगा दाखवू. एखाद्या सिनेमामध्ये एखाद्या नेत्यासारखे पात्र दाखविले असेल तो सिनेमा नाही पाहू. राहूल गांधीला काळे झेंडे दाखवू. खरं तर मुंबईवरील हल्ल्यातून आम्हाला वाचवले ते मराठी होते की उत्तर प्रदेश/ बिहारचे हे आम्ही नाही पाहत. आमच्या मते ते भारतीय, आणि शूर भारतीय होते/आहेत. त्यांच्यात भेदभाव आम्ही नाही करत.
पण तुम्ही लोक सिनेमाचे पोस्टर जाळताना मॉल मध्ये तोडफोड नका करू. भैयांचा निषेध करताना तोडफोड करू नका. त्यामुळे आम्हालाच त्रास होतो. सिनेमाचा वाद चालू असताना एखाद्य निर्मात्याला मागितले तरच संरक्षण व दुसर्‍याला न मागताच संरक्षण देणे असा दुटप्पीपणा नका करू. उगाच 'भाव नियंत्रणात नाही' असे उठसूट विधान करू नका. त्यामुळे आम्हालाच त्रास होतो.

त्यापेक्षा येणार्‍या ह्या अन्नटंचाईपासून सर्वांना वाचविण्यासाठी पाय उचला. मुंबई हल्ल्यातील कसाब व त्यांना मदत करणारे लोक ह्यांना शिक्षा द्या.  मुख्य मुद्यांना बगल देऊन नेहमी फक्त मराठी कोण, मुंबई कोणाची, स्वतंत्र राज्ये  हेच व असेच मुद्दे मांडण्यापेक्षा आहेत त्या गोष्टींत सुधारणा करा.  लोकांच्या नेमक्या फायद्याकरीता नवीन गोष्टी करा. आम्ही मग तुमच्यासोबतच आहोत.
(चित्रे: डीएनए वरून साभार.)

फेब्रुवारी ०१, २०१०

ब्लॉग माझा स्पर्धेच्या एपिसोडचे व्हिडियो युट्युब वर टाकले आहेत.
FLV
भाग १
भाग २
भाग ३

MPG मधील व्हिडियो जरा जास्त मोठे आहेत.
MPG उच्च दर्जाची ध्वनिचित्रफित:
भाग १
भाग २
भाग ३

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Subscribe

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter