साधारण एप्रिल-मे च्या दरम्यान ठाणे रेल्वे स्थानकावर गेलो होतो. बांधकाम सुरू असलेल्या सॅटीस(SATIS) च्या खालून जाताना वाटले, करत आहेत ते चांगले आहेच. पण दादर रेल्वे स्थानकासमोरील पुलाखाली फेरीवाले ज्याप्रमाणे बाजार मांडून ठेवतात तसे नको व्हायला.
आत पुन्हा ५ महिन्यांनी तिकडे गेलो तर बांधकाम पूर्ण झाले नसले तरी थोडेसे बाकी आहे. रिक्षाने जाण्यासाठी म्हणून स्थानकासमोरील रांगेत जाण्यासाठी निघालो. आत जाता जाता एका खांबावर ठा. म. पा. चा फलक दिसला: "फेरीवाल्यांना प्रवेश नाही". वाटले चांगले आहे.
पण आत गेल्यावर दिसले की फेरीवाले आहेतच.
गेल्या महिन्यात ठिकठिकाणी फलक वाचले होते की रस्त्यावरील सीडी विक्रेत्यांवर कारर्वाई केली आहे आणि त्यास बंदी आहे. तरीही पुन्हा महानगरपालिकेच्या फलकासमोरच हा विक्रेता सीडी विकत होता.
पुढे रिक्षाच्या रांगेत असताना आणखी एक फलक पाहिला. मीटरप्रमाणेच पैसे द्या. खाली हेल्पलाईन क्रमांक दिले होते. ठा. म. पा. चा. मी त्या क्रमांकावर संपर्क करून पाहिला. पण कोणी उचलला नाही. (रात्री ९ आणि रविवार. म्हणून बहुधा उचलला नसेल?)
ह्यावरून काही (पुन्हा तेच) प्रश्न पडले.
सध्या तरी मला ठाणे स्थानकासमोरील पुलाचे भविष्य दादर पुलाप्रमाणेच दिसत आहे.
आत पुन्हा ५ महिन्यांनी तिकडे गेलो तर बांधकाम पूर्ण झाले नसले तरी थोडेसे बाकी आहे. रिक्षाने जाण्यासाठी म्हणून स्थानकासमोरील रांगेत जाण्यासाठी निघालो. आत जाता जाता एका खांबावर ठा. म. पा. चा फलक दिसला: "फेरीवाल्यांना प्रवेश नाही". वाटले चांगले आहे.
पण आत गेल्यावर दिसले की फेरीवाले आहेतच.
पुढे रिक्षाच्या रांगेत असताना आणखी एक फलक पाहिला. मीटरप्रमाणेच पैसे द्या. खाली हेल्पलाईन क्रमांक दिले होते. ठा. म. पा. चा. मी त्या क्रमांकावर संपर्क करून पाहिला. पण कोणी उचलला नाही. (रात्री ९ आणि रविवार. म्हणून बहुधा उचलला नसेल?)
ह्यावरून काही (पुन्हा तेच) प्रश्न पडले.
- ह्या फेरीवाल्यांना काय तात्पुरता प्रवेश दिला होता? की रात्र म्हणून कोणी नसेल?
- की ह्यांनी मागील रस्त्याने प्रवेश केला असेल? की दिवाळी म्हणून सूट आहे?
- आता कोणी म्हणेल, विकू दे ना त्यांना. ते कुठे जातील? मग 'प्रवेश नाही' हा फलक कशाला लावताय?
- मीटरप्रमाणे भाडे घेत नसेल किंवा इतर गरज असेल तेव्हाच आपण फोन करणार ना? मग त्या हेल्पलाईनवर कोणी फोन उचलत नसेल तर काय फायदा? की सर्व गोष्टींची नंतर त्यांच्या वेळात तक्रार करायची?
- मीटरप्रमाणे पैसे घेत नसल्याची तक्रार परिवहन विभागाकडे करायची की ठा.म. पा?
सध्या तरी मला ठाणे स्थानकासमोरील पुलाचे भविष्य दादर पुलाप्रमाणेच दिसत आहे.
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा