खरं तर निवडणूका संपल्यानंतर राजकारणावरील माझे विचार लिहायचे नाहीत असे मी ठरवले होते. पण सध्या जे काही चालले आहे त्यावर लिहावेसेच वाटते.
२२ ऑक्टो. ०९ ला च काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी ला बहुमत मिळाल्याचे सिद्ध झाले. त्यांनी २ दिवसांत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ह्यांच्या नावाची घोषणा केली.पण आज १० दिवस झालेत तरी शपथविधी काही झाला नाही. दोन पक्षांमध्ये कोणते खाते कोणाला मिळावे (खरं तर जास्त मलई कोणाला मिळावी) ह्यावर त्यांची चर्चा चालू आहे.
शपथविधीकरीत मंडपही बांधून तयार आहे. त्याचे दररोजचे भाडे वाया जात आहे. बहुतेक नेते मुंबई-दिल्ली वार्या करत आहेत.
त्यात सत्यसाईबाबांच्या दर्शनाला मुख्यमंत्री दिल्लीहून परत आलेत. नुसते दर्शन नाहीच तर स्वत:च्या सरकारी निवासस्थानावर सत्य साईबाबांना आमंत्रण (बातमी येथे आणि येथे). सत्य साईबाबांवर त्यांची श्रद्धा ह्यावर आमचा काहीच आक्षेप नाही. तुम्ही तुमच्या स्वत:च्या घरी काय करायचे ते करा. पण सरकारी निवासस्थानावर असे काही करणे चुकीचे आहे.
ह्या अशा जनतेला विचारात न घेता जनतेच्याच पैशावर सर्व काही करून नुसता वेळ आणि पैसा वाया घालवणार्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा निषेध.
ह्याच पार्श्वभूमीवर नुकतेच ऐकल्या/वाचल्यानुसार शिवसेनेने घेतलेली भूमिका योग्यच आहे असे वाटते. माझ्यामते शिवसेना व मनसेने आतापासूनच विरोधी पक्षांचा दणका दाखविला पाहिजे.
2 प्रतिक्रिया:
शपथविधीकरीत मंडपही बांधून तयार आहे. त्याचे दररोजचे भाडे वाया जात आहे.
Worst is that from last one month, there are no state level decisions taken in Maharashtra specially in the field of Agriculture which is a backbone of our economy.
हो, आणि आजही माणिकराव ठाकरे म्हणतात की थोडा वेळ लागला तर काय हरकत आहे? आधीही वेळ लागत होताच की. x-(
टिप्पणी पोस्ट करा