शुक्रवार 10 सप्टेंबर 2010

[खादाडी] झटपट तंदूरी चिकन व चिकन बिर्याणी

गेल्या महिन्यात मी घरच्या घरी झटपट तंदूरी चिकन बनविले ते बझ वर लिहिले तर बहुतेकांच्या शिव्या खाल्ल्या कारण नेमकी त्या दिवशी भारतात आषाढी एकादशी होती. मग नंतर काही दिवसांनी चिकन बिर्याणी (बिर्याणी म्हणण्यापेक्षा कोंबडी घातलेला मसाले भात ;) ) बनविण्याचा प्रयत्न केला. पण श्रावण सुरू झाल्याने त्याचे लिखाणही पुढे ढकलले. आज ते एकत्र पुन्हा लिहित आहे :)

घरच्या घरी झटपट तंदूरी चिकन.

साहित्य: कोंबडीची तंगडी, तिखट, हळद, मीठ आणि तेल.
कृती: तिखट, मीठ, हळद आणि तेलाची एकत्र पेस्ट करून कोंबडीच्या तंगडीवर लावा. ३५० डि.च्या वर ओवन लावून त्यात हे भाजायला ठेवा.
सर्व गोष्टींचे माप आपल्या मर्जीवर ;)





 














झटपट चिकन बिर्यानी(?)
साहित्य: वरीलच आणि आणखी थोडे.. कोंबडीची तंगडी, तिखट, मीठ, हळद, तेल, तांदूळ, कांदा, टोमॅटो, कापलेल्या भाज्या (इथे कापूनच मिळाल्यात स्टर फ्राय वेजिटेबल्स)


कृती: टोमॅटो, कांदा बारीक कापून घ्यावा. (मी जास्त बारीक कापला नाही).




कुकरमध्ये तेल गरम करण्यास ठेवावे. मग त्यात कापलेला कांदा पिवळसर होईपर्यंत तळून घ्यावा. मग तिखट, मीठ, हळद घालून एकत्र चमच्याने हलकेसे शिजेपर्यंत तळावे. 

कोंबडीची तंगडी त्यात घालून पूर्ण मसाला त्यावर नीट लागेल असे तळून घ्यावे. 

नंतर कापलेल्या भाज्या त्यात मिसळून आणखी थोडा वेळ ते मिश्रण चमच्याने हलवावे. 

नंतर त्यात तांदळाच्या दुप्पट एवढे पाणी घालून.उकळी येईपर्यंत गरम करा. कुकरचे झाकण बंद करा. २ ते ३ शिट्ट्या होईपर्यंत भात शिजू द्यावा. 

नंतर प्लेट मध्ये घालून गरम गरम चिकन बिर्याणी खाण्याची मजा घ्यावी. ;)

3 टिप्पणी(ण्या):

  • महेंद्र says:
    शुक्रवार 10 सप्टेंबर 2010 1-00-00 pm IST

    - मस्त :) आणि एखाद्या मित्राला महेंद्र कुलकर्णी सारख्याला बोलावून खाऊ घालावी. अशा रितीने श्रावणाचे उद्यापन करावे :) म्हणजे देव प्रसन्न होतो ( प्रमोद देव नाही - खरोखरचा)
    बाकी तुम्ही फारच कमी लिहिता हो इथे ब्लॉग वर?

  • Mrs. Asha Joglekar says:
    शनिवार 11 सप्टेंबर 2010 12-40-00 am IST

    आज हरतालिका अन् उद्या गणपति, विसरलां वाटतं ?

  • देवदत्त says:
    शनिवार 11 सप्टेंबर 2010 8-51-00 am IST

    महेंद्र दादा, पुढील वेळि नक्की बोलावेन.
    हो, लेखन कमी झाले आहे. गेले ३/४ महिने तर कामामुळे काहीच नाही. पण आता नियमित करायचा विचार आहे.

    आशाजी, एक महिना थांबलो मी. नंतर काल ईद होती आणि गणपतीच्या आधी म्हणून लिहिले. नंतर आठवले हरतालिका ही आहे म्हणून :)