फेब्रुवारी ०९, २०११


गेले २ दिवस सर्दी खोकला होता. साधारणतः मला सर्दी होत नाही. कितीही थंड पिऊ दे, किंवा थंड वातावरण असू दे. तरी सर्दीचा त्रास होत नाही. खोकला होतो अधेमध्ये. खोकल्यावर घरगुती तात्पुरता उपाय म्हणजे गूळ खाणे (जे मी सहसा झोपेत खोकण्याचा त्रास होत असेल तरच घेतो), सकाळी हळदीचे दूध, किंवा इतर काही औषधं. सर्दीवर तर औषध नाही असे म्हणतात. पण तरी बाजारात त्यावर गोळ्या, बाम मिळत असतात म्हणजे असेल औषध उपलब्ध ;) सहसा मी औषध घ्यायला जात नाही. तसे तर मी डॉक्टरकडे जाणेही टाळतो. काय उठसूट ह्या गोष्टींकरीता डॉक्टरकडे जायचे. प्रकरण हाताबाहेर जात असेल तरच डॉक्टरकडची वारी. त्यामुळे बहुतेक वेळा आपल्याला माहित असलेली, जाहिरातीत पाहिलेली औषधे घेऊन प्रयत्न करतो. आणि उलट प्रकार म्हणजे सर्दी नसताना विक्स, निलगिरी तेल, झंडू बाम वगैरे तीव्र वासांच्या औषधाने मला त्रास व्हायला लागतो. सर्दी, नाक चोंदणे वगैरे. म्हणून मी त्या औषधांपासून दूरच असतो.

पण ह्यावेळी त्रास जास्त वाटला. त्यात गेले २ दिवस उशीरा घरी गेल्याने डॉक्टरकडे जाणेसुद्धा जमले नाही. त्यामुळे मग रात्री औषधांच्या दुकानातून त्यांनाच विचारून सर्दी आणि खोकल्याचे औषध घेतले. (वादाचा मुद्दा: डॉक्टरांचा सल्ला ने घेता थेट दुकानदाराकडून औषध घेणे बरोबर आहे की नाही? तो सध्या मरू दे. सांगितले ना. मी औषधच घ्यायला पाहत नाही तिथे आत्ता ह्या वादात पडायचे नाही) रात्री १-१ (सर्दीची एक, खोकल्याची एक) गोळी घेतली आणि दुपारी १-१. दुपारी ३:३०/३:४५ पासून जाणवायला लागले की खूप झोप येत आहे. ४:३० च्या आसपास लक्षात आले की गोळ्या घेतल्यांचा परिणाम हा. (म्हणूनच सकाळीही खूप झोप येत होती आणि मग कार्यालयात नेहमीपेक्षा उशिरा आलो. ते कारणही तेव्हाच कळले). आता काम संपवून घरी.

तुम्ही म्हणाल, "शीर्षकातील सर्दी झाली, खोकला झाला. दारू कुठेय? " सांगतो.

असाच प्रकार २००३/२००४ मध्ये झाला होता. मला खोकला झाला होता म्हणून रात्री औषध घेतले होतेच. सकाळी ही कार्यालयाकरीता निघताना औषध घेऊन निघालो. साधारण दोन अडीच तासांनी मस्त झोप यायला लागली. नेमके कारण कळेना. सहकार्‍यांना सांगितले की मला आता अर्धा तास काही विचारू नका. मी डुलकी घेतो. तेव्हाही डुलकी घेता घेता आठवले, की सकाळी बेनाड्रिल औषध घेतले होते. त्याने झोप येत आहे. मध्ये कधीतरी वाचले होते की बेनाड्रिल मध्ये १२ टक्के अल्कोहोल असते, बिअरपेक्षाही जास्त. म्हणूनच त्यावर लिहिले असते की हे औषध घेतल्यावर यंत्रावर, किंवा गाडी चालवायचे, किंवा इतर संवेदनशील काम करू नये. म्हणूनच मी आणि माझा एक मित्र बेनाड्रिलला आपली दारू म्हणतो. हाच प्रकार लक्षात ठेवून मी एक दोन सहलींमध्ये गप्पा/ओरड अशा गोष्टी केल्यावर रात्री झोपताना बेनाड्रिलचा डोस घ्यायचा विचार करायचो. घसाही ठिक होईल आणि झोपही मस्त लागेल. पण आता बेनाड्रिल मध्ये ५% अल्कोहोल असते. तेवढा नशा कमी :)



तसेच गेल्या वर्षी जूनमध्ये खोकला झाला होता. १०/१२ दिवसांनीही कमी झाला नाही म्हणून डॉक्टरकडे गेलो. त्यांनी बेनाड्रिल नको घेऊ असे सांगितले. गुळण्या करण्याचे एक औषध दिले, आणि दुसर्‍या त्यांच्या गोळ्या. ते गुळणीचे औषध घेताना त्याला वाईनसारखा वास येतो असे वाटले आणि चवही थोडीशी तशीच लागली. गुळण्या केल्यावर जीभेचा आणि तोंडातील काही भाग बधिर झाला असे जाणवले. पण तेव्हा जास्त लक्ष दिले नाही. नंतर पाहिले तर त्या औषधात १०% अल्कोहोल आहे असे वाचले. म्हणजे मला तो वाईनचा वास बरोबर आला होता. कार्यालयात मित्रांशी ह्याबद्दल बोललो तर ते म्हणाले, "चांगले आहे रे. शनिवार-रविवारच्या दिवशी हे औषध घेऊन टुण्ण होऊन जायचे ;)" डॉक्टरांना त्याबद्दल विचारले तर ते म्हणाले,"चव तशी लागत असेल. पण बधिर नाही होणार" असो. थोडे दिवस औषध घेऊन मग खोकला गेला.

आताही खोकला/सर्दी कमी झाला आहे असे वाटते आहे. जाईल पूर्णपणे १-२ दिवसांत. नाही तर ह्या शनिवार रविवारी पुन्हा ह्या दारूचा उपभोग घेता येईल.

(सर्व चित्रे आंतरजालावरून साभार)

8 प्रतिक्रिया:

Anand Kale म्हणाले...

सर्दीतर माझ्या पाचविलाच पुजलेली आहे...
माझं नाक कित्येकदा भर उन्हातही भळा भळा गळतं. गेली २ वर्षे हा त्रास सुरु आहे.. तेव्हापासुन मी दोन रुमाल बाळगतो.. :)
होमियोपॅथी उपचार करावा म्हणत होतो पण त्यावर ईतकं वाचलय की त्यापेक्षा घरगुती उपाय बरे असं वाटू लागलय...

अनामित म्हणाले...

Font badala rao.

lokana vachata tari yeil.

आनंद पत्रे म्हणाले...

दारू नव्हे अल्कोहोल ;)

देवदत्त म्हणाले...

आ का, नाक गळतंय तर m-seal लावून पहा ;)
गंमत जाऊ दे. पण मग आयुर्वेदिक इलाज ही आहे का?

देवदत्त म्हणाले...

अनामित, टिप्पणी बद्दल धन्यवाद.
नाही तरी थीमच बदलायचा विचार आधीपासून चालू आहे. पाहतो काही तरी :)

देवदत्त म्हणाले...

@आ प(आनंद पत्रे),
आधी शीर्षकात 'औषधे' असेच लिहिणार होतो पण मग तो एखादा उपाय देणारा लेख वाटला असता.
आणि मग 'अल्कोहोल' पेक्षा दारूच लिहिले कारण ती आमच्याकरिता दारूच आहे. आणि 'दारू' आकर्षक वाटले ;)

Unknown म्हणाले...

मला पण असाच त्रास होत असे मी पण खूप उपचार करून पाहिले पण थोडे दिवसच त्रास कमी होत असे नंतर मी जरंडेश्वर हनुमान मंदिर आहे डोंगरावर तिथे दर शनिवारी चालायला सुरवात केली तेव्हा पासून सर्दी बंद झाली तुम्ही 20मिनिटे कोणताही डोंगर टेकडी चढत जावा जेणे करून डोक्यामधून घाम येईल सर्दी आपोआप कमी होईल

अनामित म्हणाले...

Kuf cha tras aahe... Kuf mile khokla hoto...mg to lvkr jat nahi .ky karave

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter