दिलेल्या पत्त्यावर नीट पोहोचणे म्हणजे एक कसरतच आहे. तरी अजूनही मोठ्या शहरांतच जाणे झाले आहे. मी इथे आधी सांगितल्याप्रमाणे मला पत्ता लवकर मिळत नसेल :) पण महामार्गावर कुठे वळून कुठे जाता येते याबाबत तरी नीट फलक लावावेत की जाणार्याला रस्ता नीट कळेल.

आज पनवेलच्या पुढे गेलो होतो कर्नाळ्याला. पण पनवेल वरून गोवा महामार्गावर जाण्याकरीता मुख्य रस्त्यावर डोक्यावर फलक लावून ठेवला आहे, पणजीम् ->. तिकडे वळून सरळ गेलो. पुढे गेल्यावर पाहिले तर मुंबईकडे जाणारा रस्ता. मध्ये पेट्रोलपंपावर विचारून परत त्याच रस्त्यावर आलो. पुन्हा उजवीकडे वळून थोडे पुढे गेलो तर डाव्या बाजूला जो रस्ता जातो त्या कोपर्यात डाव्या बाजूला फलकामध्ये लिहून ठेवले आहे, <- पणजीम् (की गोवा?). अरे, गोवा हे किती मोठे/प्रसिद्ध ठिकाण आहे आणि तिकडे जाण्याचा फलक असा लहानसा आणि कोपर्यात? (आधी गेलो होतो त्या रस्त्यावर मुंबई/उरण वगैरे मोठ्या अक्षरात डोक्यावर लिहून ठेवले आहे)
३/४ वर्षांपुर्वी एका हिंदी वृत्तवाहिनीवर दाखवले होते की काही शहरांमध्ये हे असे फलक कसे चुकीने लावले आहेत. उदा. एका ठिकाणी जाण्याचे अंतर जर ५० किमी असेल तर पुढे काही अंतरावर तेच अंतर वाढवून ७० किमी वगैरे दाखवले होते.
तरी बरे, भरपूर ठिकाणी असे चुकलो तर पुढे जाऊन यु टर्न घेऊन परत तरी येता येईल पण काही ठिकाणी ती ही सोय नाही आहे.

0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा