विश्वचषकाकडे दुर्लक्ष करायला मदत करा रे. ह्या लोकांप्रमाणे माझ्याही भावना उतू जात आहेत. म्हणून न लिहायचे, बोलायचे ठरवूनही लिहावे लागतेय.
Either you love it or you hate it. But you can't ignore it. असे झालंय माझं. ;)
द्वारकानाथ संझगिरींचे लेखन म्हणून वाचायला गेलो. त्यांनी लिहिलं चांगलं नेहमीप्रमाणे, वाक्येही मस्त आहेत. पण मूळ मुद्दाच चुकीचा वाटला. १९८३ वर्ल्डकप जिंकला होता तो सावरकरांकरीताही असेलच की.
http://www.saamana.com/2011/February/18/Link/Main1.htm
आणि दुसरे हे.
हिंदुस्थानचेच नाव वर्ल्ड कपवर कोरण्यासाठी देव पाण्यात ठेवायचे की वर्ल्ड कप घेऊन आलेल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी पास कर असे साकडे देवाला घालायचे हेच विद्यार्थ्यांना कळेनासे झाले आहे
http://www.saamana.com/2011/February/18/Link/Main2.htm
काही पण..
त्या विद्यार्थ्यांना म्हणावे, "आता परीक्षा न देता वर्ल्ड कप वर लक्ष द्यावे. वर्ल्ड कप चार वर्षांत एकदा होतो. दहावी-बारावीची परीक्षा काय ६-६ महिन्यांनी होतच असतात."
वृत्तवाहिन्या, क्रिडावाहिन्यांकडे तर मी दुर्लक्ष करू शकतो. पण जे काही आवर्जून पाहतो त्यातही ह्याबाबत काही असले तर आणखी वैताग.
आवडीची मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' पाहतोय तर त्यातही आहेच. बरं असेल तर असू द्या पण कैच्याकै चाललंय. भारत जिंकण्यासाठी होमहवन चाललंय.
इतरही मालिकांमध्ये सुरु होईल, झाले असेलच. :(
Either you love it or you hate it. But you can't ignore it. असे झालंय माझं. ;)
द्वारकानाथ संझगिरींचे लेखन म्हणून वाचायला गेलो. त्यांनी लिहिलं चांगलं नेहमीप्रमाणे, वाक्येही मस्त आहेत. पण मूळ मुद्दाच चुकीचा वाटला. १९८३ वर्ल्डकप जिंकला होता तो सावरकरांकरीताही असेलच की.
http://www.saaman
आणि दुसरे हे.
हिंदुस्थानचेच नाव वर्ल्ड कपवर कोरण्यासाठी देव पाण्यात ठेवायचे की वर्ल्ड कप घेऊन आलेल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी पास कर असे साकडे देवाला घालायचे हेच विद्यार्थ्यांना कळेनासे झाले आहे
http://www.saaman
काही पण..
त्या विद्यार्थ्यांना म्हणावे, "आता परीक्षा न देता वर्ल्ड कप वर लक्ष द्यावे. वर्ल्ड कप चार वर्षांत एकदा होतो. दहावी-बारावीची परीक्षा काय ६-६ महिन्यांनी होतच असतात."
वृत्तवाहिन्या, क्रिडावाहिन्यांकडे तर मी दुर्लक्ष करू शकतो. पण जे काही आवर्जून पाहतो त्यातही ह्याबाबत काही असले तर आणखी वैताग.
आवडीची मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' पाहतोय तर त्यातही आहेच. बरं असेल तर असू द्या पण कैच्याकै चाललंय. भारत जिंकण्यासाठी होमहवन चाललंय.
इतरही मालिकांमध्ये सुरु होईल, झाले असेलच. :(
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा