फेब्रुवारी ०३, २०११

गेल्या शनिवारी पुण्याला गेलो होतो, तेव्हा संध्याकाळी शनिवारवाड्यात जाऊन आलो. इतके वर्षे त्याबद्दल ऐकले होते, आत गेलो नव्हतो. पुण्याच्या फेरीत तिकडून जाणेही होत असेल. एक वर्ष पुण्यात राहिलो तेव्हाही वाडा आतून पाहणे झाले नाही.

पण ह्यावेळी आत गेलो. वाटले थोडी नवीन माहिती मिळेल. खालून वाडा पहायला थोडे बरे वाटत होते. मोठ्या मोठ्या पायर्‍यांवरुन पहिल्या मजल्यावर गेलो. त्या पायर्‍या चढताना वाटत होते त्या काळच्या बलाढ्य आणि उंचपुर्‍या माणसांकरीताच ह्या पायर्‍या बनविल्या असतील.

वर जाऊन एका जागेवर सहज एक फोटो काढून घ्यायचा म्हणून उभे राहिलो.
पण सर्व अपेक्षा भंग पावल्या. तिथून खाली पाहिले तर दिसले की त्या जागेचे पूर्णपणे सार्वजनिक उद्यान झाले आहे. महाल/वाड्याबद्दल काही उरले आहे असे वाटतच नव्हते. मग असेच पूर्ण भिंतीवरून एक फेरी मारली. उरलेल्या वाड्याची देखरेख करणे बहुधा महानगरपालिकेला जड जात असावे.

खाली येऊन वाड्याच्या माहितीबद्दल जे काही एक दोन फलक लावले होते तेच वाचून काढले.
ते हे फलक.

फलक वाचताना एक गंमत दिसली ती आताच्या सरकारच्या निष्काळजी कारभाराचेच एक उदाहरण वाटली. एका फलकावर वाड्याचा खर्च दाखवलाय १६११० रुपये तर त्याच्या बाजूच्याच दुसर्‍या फलकावर खर्च दाखवलाय १६१२० रूपये. (तेव्हाच्या नाही म्हणत मी... आताच्या सरकारने इथेही घपला केला? २८० वर्षांपुर्वीचे १० रू म्हणजे आजचे किती? :) )

गंमत सोडा. पण इतर गोष्टीही नीट नाही वाटल्या त्या म्हणजे वाडा तर सोडा पण तिथे लावलेल्या फलकांचीही देखरेख नीट होत नाही असे वाटते. त्यावर लिहिण्यासाठी वापरण्यात आलेला काळा रंग ही उडत चालला आहे. आता ५ रू तिकिटात काय काय करणार असा प्रश्न विचारतील. तिकीटाचा दर वाढवला तर लोक येणे बंद करतील ही भीती ही असेल. पण इतिहासातील काही गोष्टींवर वाद घालून, काही कृती करून जो गोंधळ होतो त्यात जेवढा पैसा खर्च होतो तो इथे वापरा की.

असो. तुम्हाला हे लेखन त्रोटक वाटत असेल पण त्याबद्दल आणखी काही खास लिहिण्यासारखे मला आत्ता तरी वाटले नाही कारण मलाच तो वाडा पाहताना एवढी अपेक्षापूर्ती झाल्यासारखे वाटले नाही. आता मी ही धावती भेटच म्हणेन. कोणी इतिहासाची माहिती सांगत माझ्यासोबत येत असेल तर पुन्हा येईन.

जाता जाता: त्या वाड्याचे जे तिकिट आहे त्यावर सर्व हिंदी आणि इंग्रजीत लिहिले आहे. (चित्र लवकरच स्कॅन करून टाकतो येथे.)

नेहमी मराठी मराठी करण्यार्‍या तसेच इतिहासाचा बाणा सांगणार्‍या
राजकीय पक्षांनी इथेही लक्ष द्यावे की जरा.
Reactions:

4 प्रतिक्रिया:

rajkiranjain म्हणाले...

आता बघण्यासारखं काहीच नाही आहे, थोडीफार कॊलेजची हिरवळ सोडली तर... :(
कुठली गोष्ट कशी जपावी हे आपल्या समाजाला माहिती नाही याचा नमुना म्हणजे शनिवारवाडा !

देवदत्त म्हणाले...

तिकडेही प्रेमींनी आपली चित्रकारी टाकली आहेच. पण त्यावर थोडे चुनाकाम केले गेले आहे.

त्यांचे पुरावे, त्यांची आठवण जपून ठेवावी असे नाहीच. फक्त ह्याने ते म्हटले त्याने ते म्हटले ह्यावरूनच वाद घालत बसतात लोक. :(

अविनाश लिमये म्हणाले...

अहो दगड बसवायला जो खर्च पुरातन वास्तु व मनपा यांना आलाना तो धरून आकडा वाढवला असेल !

देवदत्त म्हणाले...

हा हा अविनाश, हे ही असू शकेल :)

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Subscribe

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter