डिसेंबर ०७, २०११

गेल्या आठवड्यात मित्रासोबत 'पिझ्झा हट्' मध्ये खाण्यास गेलो होतो. (साधारणत: चायनीज आणि पिझ्झा मध्ये एक अनुभवतो की खाताना पोट भरल्यासारखे वाटते पण एक दीड तासातच भूक लागते. :) ) असो. तर तिथे बिल मागितल्यावर पाहिले तर खालील प्रमाणे होते. पदार्थः रू. ३२२.०० सेवा (१०%): रू. ३२.२० कर...

डिसेंबर ०४, २०११

तुम्ही बोर्नविटाची नवीन जाहिरात पाहिली आहे का? दूधातून कॅल्शियम खेचण्याकरीता 'ड जीवनसत्व' लागते, जे बोर्नविटा मध्ये आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. http://www.cadburyindia.com/in/en/Brands/Pages/videoplayer.aspx?vid=1734 एक तर त्रासिक जाहिरात, तीन तीन वेळा तिचे विचारणे, "कॅल्शियम करीता काय...

ऑक्टोबर ०७, २०११

काल कोपिणेश्वर मंदिराच्या जवळ एका संस्थेचा देवी महोत्सव संपला, त्यानंतर देवीला घेऊन जाताना जे संगीत लावले होते त्याने छातीही धडकत होती. सुतळी बाँबपेक्षाही जास्त आवाज, म्हणजे किमान १३० डेसिबल्सच्यावरती आवाज असेल. ह्या कार्यक्रमाला बहुधा काही पोलिस अधिकारीही पाहुणे आले होते.  म्हणजे त्यांची उपस्थितीही त्याप्रकारची वाटली. पुढे गोखले रोडवरही देवीची एक मिरवणूक येत होती, त्याचा आवाजही जबरदस्त. आणि गाणे कोणते लावले होते? तर शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला...

सप्टेंबर ०५, २०११

माजिवडा उड्डाणपूलापासून कल्याणकडे जाणारा महा(?)मार्ग. उजवीकडे वळल्यानंतर साधारण २०० मीटर अंतरापासूनच गाड्या खोळंबलेल्या दिसल्या. घरातून निघताना ठरवले होते की जास्त गर्दी असली तर अर्ध्या रस्त्यातूनच परत निघायचे. तसेच काहीतरी होईलसे वाटत होते. कार्यालयाच्या रस्त्यावर, घराच्या आसपास, आणि इतरत्र रस्त्यांची हालत तर पाहूनच आहे, त्यामुळे खोळंब्याचे कारण तर लक्षात आले होतेच. हळू हळू करत (पण किती ते हळू? १ मीटर जाऊन २ मिनिटे थांबायचे?) पुढे जात होतो....

ऑगस्ट ३१, २०११

रिलायंस मार्ट मध्ये पाहिलेली खास किंमत. ६० रु च्या पेनची त्यांची किंमत ७० रु. १२५ रु च्या पेनाची त्यांची किंमत १५०रु. ईद-गणपतीनिमित्त मोठ्ठा सेल? :) ह्याबाबत त्यांना विचारणार होतो.. पण त्यानंतर फिरता फिरता विसरून गेलो.&nbs...

ऑगस्ट १६, २०११

अण्णा हजारे, अरविंद केजरिवाल पोलिसांच्या ताब्यात http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9619057.cms अण्णांना दिल्ली पोलिसांकडून अटक http://www.esakal.com/esakal/20110816/5432610138584984183.htm दडपशाहीचे राजकारण करणार्‍या हुकुमशहा काँग्रेस सरकारचा निषेध... महात्मा गांधींच्या तत्त्वांचे पालन करण्याचा दिखावा करणारे हे लोक स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच गांधींच्या उपोषण ह्या हत्याराच्या विरोधातच बोलतात आणि दुसर्‍याच दिवशी हा प्रकार.... इतर...

ऑगस्ट ०३, २०११

वसंत पुरूषोत्तम काळे उर्फ वपु. ह्यांची पुस्तके कधीपासून वाचायला लागलो आठवत नाही. त्यांच्या कथाकथनाबद्दलही लहानपणी जास्त माहीत नव्हते. पण जेव्हापासुन ऐकले/वाचले, त्यांचे लेखन भरपूर आवडत गेले. वेगवेगळ्या विचारसरणीच्या आपल्यासारख्या सामान्य माणसांचे दर्शन त्यांच्या लेखनातून मिळते गेले. मला...

जुलै २९, २०११

 गेले २ दिवस एवढा पाऊस पडतोय. सकाळी उठलो तेव्हा वाटले नव्हते की जोरात पाऊस पडत आहे. पण कार्यालयात जाता जाता जोरात पाऊस पडत होता. त्यामुळे दुचाकीवरून जातान वेगळा त्रास तर होताच. त्यात महानगरपालिकेच्या कृपेने जागोजागी खड्डे तर आहेतच. दुचाकीवरून जायचे म्हणजे आपण लोक तर डावीकडची बाजू पकडून ...

जुलै २८, २०११

भारतातील पहिले आणि एकमेव मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय लोणावळ्यात आहे आहे असे ऐकले होते. पुण्याला जाताना रस्त्यावरच आहे असेही कळले. रस्त्यातच (म्हणजे एकदम रस्त्यावर नव्हे... मुंबई-पुणे रस्त्यावर. पण हो रस्त्यावरच आहे. जुन्या महामार्गावरून जातानाच दिसते) खास आडवळणात जायची गरज नाही. मुंबई-पुणे...

जुलै १४, २०११

काल मुंबईमध्ये बाँबस्फोट झाले,सरकारने लगेच मोठमोठ्या शहरात हाय अलर्ट घोषित केला. ह्याचा अर्थ काय? माझ्या मते भारतीय हाय अलर्ट म्हणजे, सामान्य माणसाला होणार्‍या त्रासात आणि नेत्यांच्या सुरक्षेत आणखी वाढ . नाही तर काय? बाँबस्फोटानंतर काल रात्री, आज सकाळी, पुन्हा आता रात्री मी तरी काही फरक...

जुलै १२, २०११

गेले काही दिवस पुन्हा तेच. काहीतरी मनात आलेले लगेच लिहायला घेतो, पण लिहिता लिहिता मध्येच काहीतरी काम आल्याने ते लिखाण अर्धवटच राहिले. अशा ४ ५ गोष्टी अजूनही प्रकाशित करायच्या राहिल्यात.  पाहतो किती जमते ते. जाता जाता: भ्रमणध्वनी मधून मराठी लेखन प्रकाशित करण्याचा हा पहिलाच प्रयत्न :...

जून २०, २०११

आपल्यात एक म्हण आहे, 'जिस थाली में खाया उसी में छेद किया' किंवा 'नमक हराम', किंवा 'खाल्ल्या मिठाला जागणे' वगैरे वगैरे. पण उंदरांकरीता ही म्हण/वाक्प्रचार वापरताच येणार नाही. त्यांना कुठे माहित असणार हे सर्व. अर्थात त्यांनी नेमके घरातील मीठ खाल्ले नाही. पण कारच्या खाली त्यांना जागा मिळाली न...

जून १६, २०११

जालरंग प्रकाशनाच्या 'ऋतू हिरवा २०११' ह्या वर्षा विशेषांकाचे आज १५ जून रोजी प्रकाशन झाले. ह्यातील 'शाळा सुरू झाली..' हे जुन्या आठवणींचे पुंजके हे मी गेल्या आठवड्यात लिहून दिले होते. अंक आज प्रकाशित झाला आणि नेमके आजच शाळा सुरू झाल्या असल्याचे पाहिले. त्यामुळे त्या ज्या काही आठवणी लिहिल्या त्याला बरोबर शाळा सुरू होण्याच्याच दिवसाची वेळ जमून आली असेच म्हणता येईल. आज पुन्हा त्या आठवणी समोर आल्या. आणि हो, पहिल्यांदाच मी संपादकीय ही लिहिले...

जून १५, २०११

२ आठवड्यांपूर्वी म्हटल्याप्रमाणे मी DND बद्दल वैतागलो होतो. ते संदेश ही आणि ग्राहक सेवा केंद्रातील लोकांची उत्तरे ऐकूनही. त्याचीच तक्रार शेवटी मोबाईल ग्राहक सेवा केंद्राच्या वरच्या पातळीवरील कार्यालयात केली. ग्राहक सेवा केंद्राने माझ्या विपत्राला उत्तर दिले नाही असेही त्यात म्हटले होते. लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे आज त्यांनीच संपर्क केला व सांगितले की ग्राहक सेवा केंद्रातून मिळालेल्या चुकीच्या उत्तरांबद्दल ते दिलगीर आहेत. तसेच तक्रार करण्याचा कालावधी...

जून ०७, २०११

आज चुकून राजू परूळेकरांचे २२ एप्रिलचे 'डी'टॉक्स वाचले. चुकूनच... कारण गेले कित्येक महिने मी लोकप्रभामध्ये फक्त मेतकूट हे सदरच वाचतोय. इतर एखाद दुसरा वाचा असे कोणी सांगितले तर. :) ह्म्म तर म्हणत होतो, डीटॉक्स बद्दल. क्रिकेट: एक सोशियो पोलिटिकल अ‍ॅनेस्थेशिया. नाही घाबरू नका. इथे मी क्रिकेटबद्दल काही लिहिणार नाही आहे. राजू परूळेकरांनी पुन्हा ग्लॅडियेटर आणि क्रिकेट ह्यांच्यातील साम्याबद्दल थोडेसे लिहिले आहे. पूर्ण लेख वाचता वाचता मला त्यांचे...

जून ०४, २०११

जगभरात विविध दिन साजरे करायची फॅशन आली आहे. फक्त काही दिन थोडे महत्त्वाचे वाटतात उदा. जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन(World Anti Tobacco Day ), वसुंधरा दिन .. अरे हो तो वसुंधरा तास आहे ना? ( World Earth Hour), तत्सम आणि उद्या असलेला जागतिक पर्यावरण दिन. आता थोड्या वेळापूर्वी एक विपत्र आले....

जून ०३, २०११

आज पुन्हा एका नकोशा संदेशाकरीता मोबाईल कंपनीला फोन लावला. संदेश पाठवणार्‍याचे नाव (DZ-CK) असे होते. आज त्या ग्राहक सेवा केंद्राच्या व्यक्तीने सांगितले की, " असा कोणी आमच्या यादीत नाही आहे." मी म्हटले," तो कोण आहे ते तुम्ही शोधा." मग त्याने ६०/७० % संदेश माझ्याकडून वदवून घेतला. नंतर मध्येच...

जून ०२, २०११

छ्या... गप्प रहायचे म्हटले तर हेच लोक छळतात. सरकारने DND अर्थात Do Not Disturb ची सुविधा सुरु केली तेव्हा ग्राहकांना बरे वाटले होते. चला आता ह्या जाचातून सुटका. पण कॉल कमी झाले तरी संदेश येतच असतात. आज स्पॅम मेसेज बद्दल तक्रार करायची होती.. गेल्या शनिवारीही एका संदेशाची तक्रार केली होती. ग्राहक...

जून ०१, २०११

सारेगम, अंताक्षरी सारखे सुंदर कार्यक्रम कधी काळी चालू होते. (आधीचे आठवत नाहीत ;) ) नंतर आले इंडियन आयडॉल. इंडियन आयडॉलचा पहिला भाग थोडासा बघितला होता. चांगले गायक येत होते. नंतर अनु मलिक, फराह खान आणि सोनू निगम यांनी बहुतेक स्पर्धकांची खिल्ली उडविण्यास सुरूवात केली. तो प्रकार आवडला नाही. स्पर्धकांनीही...

मे २९, २०११

नाही, यूट्युब वर उपलब्ध असलेल्या ३डी चित्रफीती बनविण्याच्या कृतीबद्दल म्हणणे नाही हे. तर घरी बसून त्रिमिती (3D) चित्रपटाचा आनंद घेता येईल त्याबद्दल. :) हो, आणि महागडा 3D दूरदर्शन संच ही घ्यायची गरज नाही. त्रिमिती चित्रपट पाहण्याकरीता गरज काय असते? तर 3D प्रक्षेपण आणि त्याचा खास चष्मा. 3D चित्रपट...

मे २८, २०११

कॅडबरी डेअरी मिल्क ची नवीन जाहिरात पाहिलीत? बायको नवर्‍याला विचारते, "तू मला शेवटचे 'आय लव यू' कधी म्हणालास?" तो उठून कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेट घेऊन येतो आणि तिला देतो, "आता".... ज्यांनी पाहिली नसेल ते येथे पाहू शकता. सुंदर जाहिरात. मला आवडली. तसेच ती एक "खाने में क्या है?" पण त्यांनी...

एप्रिल २६, २०११

२६ एप्रिल म्हटले की मला पहिले आठवते ते १९९९ साल. वसतीगृहात आमच्या संगणकाला बंद पाडणार्‍या विषाणूचा पहिल्यांदा सक्रिय होण्याचा दिवस. त्याने जो काही गोंधळ घातला त्यावरून तो दिवस तर लक्षात तर राहिलाच पण संगणकातील विषाणू काय काय करू शकतात ह्याची प्रचिती आली. त्यानंतर जवळपास ४-५ वर्षे तरी एक खबरदारी...

एप्रिल २४, २०११

वार्‍यावरची वरात - पु. ल. देशपांडेंचे हे नाटक कधीतरी दूरदर्शनवर पाहिल्याचे पुसटसे आठवते. पण त्यातील नेमके सर्व आठवत नव्हते. नंतर मग २००३ पासून पुलंच्या एक एक करत सर्व कथाकथनांच्या ध्वनीफीती संग्रहात वाढवत गेलो, त्यात ह्याचीही ध्वनीफीत होती. 'वार्‍यावरची वरात नाटकाची व्हीसीडी बाजारात उपलब्ध आहे...

एप्रिल १२, २०११

रामनवमी म्हटले की मला इतर गोष्टींपेक्षा जास्त आठवते ते गदिमांचे गीत रामायण, सुधीर फडकेंच्या आवाजात. १० ध्वनीफितींचा संच वडिलांनी घेऊन ठेवला होता. दरवर्षी रामनवमीला सकाळी गीत रामायण आमच्या घरी लागायचे. पण आता गेली काही वर्षे नेमाने ऐकणे कमी झाले आहे. त्यांतील सर्व गाणी तर नेमकी तर आठवत नाहीत पण गाणी लावली असली तर आठवतात त्या लयीमध्ये. आता ध्वनीफीती तर जास्त कोणी ऐकत नाही. बाजारात तर मिळणेही बंद झालेय बहुधा. सध्या चलती आहे ती ऑडियो सीडी आणि एमपी३...

एप्रिल ११, २०११

आता कोणत्यातरी वाहिनीवर 'प्यार के काबिल' हा चित्रपट सुरू असलेला पाहिला. लहानपणी हा चित्रपट कॅसेट आणून पाहिल्याचे आठवले. तेव्हा भरपूर चित्रपट पाहिलेत. हा चित्रपट पूर्णपणे आठवत नसला तरी त्याची कथा लक्षात होतीच इतके दिवस. नवरा बायको (ऋषी कपूर-पद्मिनी कोल्हापुरे) भांडणानंतर वेगळे राहतात. त्यांच्या...

एप्रिल १०, २०११

भरपूर रुग्णालयात पाहिले की डॉक्टर रुग्णाच्या खाटेजवळ जाऊन त्याची तपासणी करतात. पण ते त्यांचे दाखल केलेले रूग्ण असतात आणि त्यांची माहिती डॉक्टरांना असते. भरपूर दवाखान्यात, रूग्णालयात रुग्णाच्या नावाचा पुकारा झाला की रूग्ण त्या डॉक्टरच्या केबिनमध्ये जातात. आज वेगळ्या प्रकारचा दवाखाना, डॉक्टर पाहिले जिथे रूग्ण दवाखान्यात वेगवेगळ्या भागात आहेत. डॉक्टरांकडे त्यांच्या नावाची नोंदवही (जी रुग्णाला दिली जाते) जमा असते, रुग्णांच्या त्या दिवसाच्या...

शनिवारी एका कामाकरीता अंधेरी पश्चिमेला गेलो होतो. तिकडे गेलो ३-४ वर्षांनंतर. पण शाळेजवळ गेलो होतो साधारण १४ वर्षांनंतर. सर्व भाग पूर्ण बदललेला. नवीन इमारती, मेट्रोचे पूल वगैरे वगैरे. तिकडूनच मित्रांना फोन केला. दोन मित्र शाळेजवळच भेटले, एक त्याच्या घराजवळ. त्यांच्याशी गप्पा मारताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 'शाळा'  आणि 'दुनियादारी'तील काही भाग समोर आले. :) मित्रांची खबरबात ऐकताना खूप चांगले वाटत होते. हा इकडे काम करतो, तो तिकडे.....

एप्रिल ०८, २०११

आज कार्यालयात धोक्याच्या वेळी (आग वगैरे) घंटा, सूचना कशा पाळायच्या ह्याची एक ओळख झाली. (फायर ड्रिल म्हणतात ते नव्हे) आग लागल्याची घंटा किती वेळा वाजणार, त्याबाबत सूचना स्पीकरवरून झाल्यावर काय करायचे वगैरे वगैरे. अर्थात ह्या गोष्टी बहुतेक सर्वच कार्यालयांत आजकाल होत असतीलच. त्याबाबत हे लेखन नाही. पण...

एप्रिल ०७, २०११

आज संध्याकाळी कार्यालयात चर्चेचा विषय निघाला होता सॅमसंगच्या नवीन वातानूकूल यंत्राबद्दल. त्यांनी 'व्हायरस डॉक्टर' नावाखाली नवीन उत्पादन बाजारात आणले आहे. त्यात H1N1 विषाणूलाही रोखता येते असा दावा केला आहे. तसेच एक पाणी गाळणी यंत्र आले होते, १ करोड विषाणूंना मारण्याचा दावा करणारे. वाटते हे किती खरे...

इंडिब्लॉगर गुण

maajhianudini.blogspot.com
47/100

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

133,766

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया


On Sep 23 Anonymous commented on blog post_09
Kuf cha tras aahe... Kuf mile khokla hoto...mg to lvkr jat nahi .ky karave

On Jul 25 Anonymous commented on blog post_09
मला पण असाच त्रास होत असे मी पण खूप उपचार करून पाहिले पण थोडे दिवसच त्रास कमी होत असे नंतर मी...(more)

On May 13 Announced Marathi Images commented on blog post_25
Very nice

On Jul 23 Sachin Kinare commented on blog post
छान, खूप दिवसांनी शोधत होतो, ह्या ब्लॉग मूळे लगेच मिळाले

On Jul 02 Anonymous commented on blog post
Chhan

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter