एप्रिल ११, २०११



आता कोणत्यातरी वाहिनीवर 'प्यार के काबिल' हा चित्रपट सुरू असलेला पाहिला. लहानपणी हा चित्रपट कॅसेट आणून पाहिल्याचे आठवले. तेव्हा भरपूर चित्रपट पाहिलेत. हा चित्रपट पूर्णपणे आठवत नसला तरी त्याची कथा लक्षात होतीच इतके दिवस. नवरा बायको (ऋषी कपूर-पद्मिनी कोल्हापुरे) भांडणानंतर वेगळे राहतात. त्यांच्या जुळ्या मुलींपैकी एक ऋषी कपूर कडे, एक पद्मिनी कोल्हापुरे कडे. थोड्या मोठ्या झाल्यावर एकाच शाळेत असतात. शाळेच्या सहलीमध्ये त्या ठरवून अदलाबदली करून एकमेकींच्या घरी जातात, आईला भेटायला, वडिलांना भेटायला. पुढची कथा सांगण्याची गरज वाटत नाही. :)

मग ह्याच कथेवरचे पाहिलेले इतर चित्रपट लगेच आठवतात.
दो कलियां : विश्वजीत-माला सिन्हा
प्यार के दो पल : मिथुन्-जयाप्रदा
कुछ खट्टी कुछ मिठी : ऋषी कपूर(पुन्हा) - रति अग्निहोत्री

दो कलिया बद्दल माहित नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे इतर तीन तर चालले नाहीत :)

असेच जुळ्या भावांचे किंवा बहिणींचे, थोडेसे वेगळे चित्रपट आठवत असतीलच.
राम और श्याम (दिलीप कुमार)
सीता और गीता (हेमा मालिनी)
चालबाज (श्रीदेवी)
किशन कन्हैया (अनिल कपूर)

वरील चारही चित्रपट एकाच कथेवर. पण चौघांचेही सादरीकरण वेगळ्या धाटणीचे, मस्त. आणि चारही चित्रपट भरपूर चाललेत.

इथे मी फक्त आता आठवणार्‍या हिंदी चित्रपटांचीच नावे दिली आहेत. असेच एकाच कथेवरच्या किंवा प्रेरित (चोरलेल्या?) चित्रपटांबद्दल (जे भरपूर आहेत) पुन्हा लवकरच लिहेन. तसेच मराठी आणि इंग्रजी एकत्र केल्यानंतर लांब यादी तयार होईलच :)

4 प्रतिक्रिया:

आनंद पत्रे म्हणाले...

डुप्लिकेट, जुडवा, गोपी किशन ;)
चिक्कार आहेत सारख्या विषयाचे चित्रपट ...

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

It happened in one night -चोरी चोरी - दिल है के मानता नही - The leap year हे एकाच कथेचे चित्रपट

देवदत्त म्हणाले...

धन्यवाद आनंद.
तू सांगितलेले चित्रपट अर्थात जुळ्या भावांच्या कथेवर आहेत आणि असे भरपूर चित्रपट आहेतच.

पण मी वर सांगितलेले पहिले चार आणि दुसरे चार ह्यांची मूळ कथा पूर्णपणे एकच आहे.

१-४: नवरा-बायको भांडणानंतर वेगळे, एक एक मूल घेउन. नंतर मुले मोठी झाल्यावर भेटतात, कुछ खट्टी..मधील आठवत नाही पण इतर तीन मध्ये शाळेच्या सहलीतच ठरवतात आणि अदलाबदली करतात....

५-८: एका घरात जुळी मुले. त्यांच्या लहानपणी घरातील नोकर एकाला स्वतःसोबत नेतो. श्रीमंत घरातील मुलाचा छळ होत असतो, त्यामुळे घाबरट, लाजाळू. नोकराच्या घरातील मुलगा थोडा गरीब, पण बिनधास्त. मग मोठ्या घरातील मुलगा पळून जातो. (किशन कन्हैय्या मध्ये बहुधा मारायचा प्रयत्न आहे) मग इथे अदलाबदल होते. आणि मग छळ करणार्‍याला वठणीवर आणणे.....

असो. पण ह्याव्यतिरिक्त तुम्ही ही सांगा असे आणखी चित्रपट. यादी बनवून ठेवूया :)

देवदत्त म्हणाले...

धन्यवाद कांचन.

ह्यातील 'चोरी चोरी', 'दिल है के मानता नहीं' माहित होते. इंग्रजीबद्दल पाहिले किंवा ऐकले नव्हते.

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter