रविवार 29 मे 2011

घरच्या घरी 3D


नाही, यूट्युब वर उपलब्ध असलेल्या ३डी चित्रफीती बनविण्याच्या कृतीबद्दल म्हणणे नाही हे. तर घरी बसून त्रिमिती (3D) चित्रपटाचा आनंद घेता येईल त्याबद्दल. :)
हो, आणि महागडा 3D दूरदर्शन संच ही घ्यायची गरज नाही.

त्रिमिती चित्रपट पाहण्याकरीता गरज काय असते? तर 3D प्रक्षेपण आणि त्याचा खास चष्मा. 3D चित्रपट बनविणार्‍यांनी आधी त्यांचे चित्रपट नेहमीच्या डीव्हीडीच्या प्रकारात देत होते. पण आता त्यांनी 2D आणि 3D अशा दोन्ही प्रकारात डीव्हीडी बनविणे सुरू केले आहे. डीव्हीडी सोबतच दोन चष्मेही मिळतात.

असेच २ चित्रपट मी विकत आणलेत.
  • Ice Age: Dawn of the Dinosaurs 
  • The Final Destination 4 



तिसरा आहे उपलब्ध The Polar Express तो आणेन नंतर कधीतरी :)

दोन्ही चित्रपट २००९ मध्ये चित्रपटगृहात पाहिले होते. आणि आता ह्या डीव्हीडीवर.

दोन्ही डीव्हीडीपैकी Ice Age चा त्रिमिती दर्जा चांगला वाटला. पण Final Desination नाही. बहुधा चष्यांचाही दोष असेल. नीट पहावे लागेल.  

आणि ह्याचे २ आणि त्याचे २ असे मिळून ४ चष्मे असले तरी एकाच चित्रपटाला चारही वापरता येत नाहीत. कारण दोघांच्याही प्रणालीत थोडे वेगळेपण आहे. एकात लाल आणि निळा रंग वापरला आहे, दुसर्‍यात लाल आणि निळा. आणि लाल रंग एकात डाव्या डोळ्याला आहे दुसर्‍यात उजव्या.

हे एक सोडले तर घरी बसून 3D चित्रपट पाहणे सोपे झाले म्हणता येईल.

6 टिप्पणी(ण्या):

  • mynac says:
    सोमवार 30 मे 2011 1-00-00 am IST

    छान नि नवीन माहिती बद्दल धन्यवाद.
    पोस्ट वाचून झाल्यावर पुणेरी भोचक पणा करत परवा लोकमतवाल्यांनी वाटलेला तो कागदी चष्मा थोडा वेळ लाऊन टी.व्ही. मधून सुद्धा काही तसंच पदरात पडतंय का तो प्रयत्न हि करून झाला.:) पण अं..ह नाही ..यश "चोप्रा" झाले.

  • देवदत्त says:
    सोमवार 30 मे 2011 7-44-00 pm IST

    ही ही ही...
    लोकमत वाल्यांनी काय वृत्तपत्र त्रिमितीत दिसावे म्हणून चष्मे वाटले?

    गंमत बाजूला राहू देऊ.
    पण त्याबद्दल काही माहीत नाही म्हणून विचारतोय :)

  • दिलीप बिरुटे says:
    बुधवार 1 जून 2011 5-27-00 pm IST

    अरे वा....! माहिती बद्दल आभारी.

  • mynac says:
    गुरुवार 2 जून 2011 12-54-00 am IST

    हो ! मध्यंतरी लोकमत ने तीन एक आठवड्या पूर्वी फक्त एकाच दिवसा साठी ,पुण्यात प्रथमच अक्खा पेपर थ्री डी मध्ये काढून धमाल उडवून दिली.किमत ३ रु.होती नि प्रत्येक पेपर सोबत थ्री डी. (कागदी)चष्मा पेपर विक्रेता द्यायचा.वर्तमान पत्राच्या दुनिये मध्ये बहुदा हा नि अशा प्रकारचा प्रथम प्रयोग होता.अन तो ही अतिशय यशस्वी.त्यातील त्या दिवसाचे ९५% फोटोग्राफ्स हे रंगीत नि थ्री डी इफेक्टवाले होते.बिल्डर लोकांच्या,बऱ्याचशा कारच्या,मोटार सायकलच्या रंगीत जाहिराती तर अप्रतिम होत्या.प्रयोग नक्कीच यशस्वी झाला.आधीच सुट्टी नि त्यात ही मजा, त्या मुळे लहान मुले तर खुश.

  • देवदत्त says:
    गुरुवार 2 जून 2011 10-30-00 pm IST

    दिबि सर,
    तुम्ही ही घरी 3D पाहून सांगा कसे वाटले ते :)

  • देवदत्त says:
    गुरुवार 2 जून 2011 10-39-00 pm IST

    @mynac
    अरे वा. पूर्ण वृत्तपत्र 3D मध्ये म्हणजे धमाल असणार.

    लहानपणी 3D पुस्तके वाचली होती मी. त्याबद्दल थोडेसे आधी ही लिहिले होते. :)
    http://maajhianudini.blogspot.com/2010/11/blog-post_11.html