बुधवार 7 डिसेंबर 2011

पिझ्झा हट (नव्हे लूट?)



गेल्या आठवड्यात मित्रासोबत 'पिझ्झा हट्' मध्ये खाण्यास गेलो होतो. (साधारणत: चायनीज आणि पिझ्झा मध्ये एक अनुभवतो की खाताना पोट भरल्यासारखे वाटते पण एक दीड तासातच भूक लागते. :) ) असो. तर तिथे बिल मागितल्यावर पाहिले तर खालील प्रमाणे होते.



पदार्थः रू. ३२२.००
सेवा (१०%): रू. ३२.२०
कर (१२.५० %)  : रू १४.०९
कर (२०.० %) : रू. २८.९०
एकूण : रू. ३९७

ह्यात एकतर त्यांनी सेवा मूल्य, मूल्यवर्धित कर आणि नुसताच एक कर असे मिळून ३ प्रकारे जादा पैसे लावले होते. मी त्याबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की सरकारकडून हे कर घेण्यास सांगितले आहे. पण त्याबाबत काही सबळ माहिती त्यांच्याकडे नव्हती. अर्थात ते कमी करणार नाहीतच, आणि माझ्याकडेही जास्त वेळ नव्हता, म्हणून तेवढे पैसे देऊन निघून आलो.

प्रथमदर्शनी ते १०+१२.५+२० = ४२.५% वाटत होते. म्हटले ४०/५० टक्के छुपा अधिभार? चला वॅट काढला, तरी ३०%. म्हणजे लूटालूटच.

आता पुन्हा नीट पाहिले असता, एकूण ४२ टक्के जास्त नाहीत. २३% होतात
तरी त्यांचे गणित मला कळले नाही. कोणी समजावून सांगेल का?

१४.०९ हे ह्यात कशाचे १२.५% होतात?
२८.९० हे ह्यात कशाचे २०% होतात?
आणि सर्वात मोठे गणित..
अशा खाद्यपदार्थांवर नेमके किती टक्के कर द्यायचा असतो आणि ह्यात काय काय ग्राह्य धरावे?
(बोर्नविटा वाले शास्त्रात आणि पिझ्झा हट् वाले गणितात गोंधळवत आहेत.)

5 टिप्पणी(ण्या):

  • सुहास says:
    बुधवार 7 डिसेंबर 2011 10-48-00 pm IST

    चालायचंच ;-)

    हे वाचा देगा :)

    http://wp.me/pq3x8-1Q4

  • देवदत्त says:
    बुधवार 7 डिसेंबर 2011 10-55-00 pm IST

    धन्यवाद सुहास.
    महेंद्र ह्यांना गेल्या वर्षी तर फक्त सर्व्हिस टॅक्स आणि वॅट द्यावा लागला होता. आता तर त्यांनी आणखी एक कर लावण्यास सुरूवात केलेली दिसतेय. :)

    (मी इतरत्र वाचन भरपूर वाढवले पाहिजे असे वाटते, म्हणजे हे प्रश्न भरपूर आधीपासून आहेत हे कळेल ;) )

  • तृप्ती says:
    गुरुवार 8 डिसेंबर 2011 11-46-00 pm IST

    :O

  • देवदत्त says:
    रविवार 11 डिसेंबर 2011 11-27-00 pm IST

    हो तृप्ती...
    अजून भरपूर गोष्टी होत असतील आता :O करीता :)

  • निनाद गायकवाड says:
    रविवार 19 फेब्रुवारी 2012 5-16-00 pm IST

    मी सुद्धा माझ्या घरा जवळ च्या मुलुंड पिझ्झा हट मध्ये गेलेलो.. आम्हाला पण अश्याच प्रकारे अतिशय जास्तीचे बिल दाखवून लुटण्यात आले !