ह्या प्रकारे दुसर्या कंपनीच्या उत्पादनासोबत थेट तुलना, वर्चस्व दाखविण्याचे प्रकार इतर देशांच्या जाहिरातींमध्ये असतात हे आंतरजालावरील विडियो पाहून दिसतच होते. पण भारतात तरी पाहून नव्हते. नाही म्हणायला, कोक आणि पेप्सीच्या स्पर्धेत विडंबनात्मक जाहिराती येत होत्या. किंवा दुसर्या कंपनीच्या टॅग लाईनचा वापर करून तुलना करणे दाखविले जात होते. उदा. व्हील च्या स्पर्धेत चक्र का चक्कर छोड., I wanna Dew च्या तुलनेत डोन्ट डू यहाँ, डू वहॉ. वगैरे ही पाहिले होते.
अरे हो, आत्ताच आंतरजालावर शोधल्याप्रमाणे कॉम्प्लॅन वि. हॉर्लिक्सची जाहिरात दिसली. पण त्यावरही खटला चालू होता असे वाचले.
तर आता भारतातही अशा रंगाच्या जाहिरातीही सुरू झाल्यात असे दिसते. आणि कोणकोणते रंग दिसतात ते पाहूच.
असो, आता एक न मागता दिलेला सल्ला: आजच्या रंगपंचमीनंतर रंगलेले कपडे कोणत्या कपड्यांच्या साबणाने धुवावेत हे आता थेट टीव्हीवरील तुलना पाहूनच ठरवा ;)
ह्यावरूनच आठवले.साधारण १५-१७ वर्षांच्या आधी कॅडबरीने त्यांच्या चॉकोलेटची पाकिटे ठराविक नगात परत करणार्यांना काही बक्षिसे दिली होती. त्यात आम्ही घेतले होते एक साबण. त्या साबणाचा उद्देश हा की एखाद्याला तोंड धुताना हे साबण द्यायचे. ते वापरल्याने त्याच्या तोंडाला काळा रंग लागलेला दिसतो. मुलांना गंमतीकरती हे छान होते. रंगात खेळल्यानंतर आम्ही मुलांनी ह्या साबणाचा वापर केला तेव्हा लक्षात आले की साधारण साबणाने जे रंग निघत नव्हते तेही ह्या साबणाने निघत होते. तेव्हा असेच काही उत्पादन आजच्या दिवसातही उपलब्ध असेल तर पहा. :)
(आज सकाळीच हे लेखन टाकणार होतो. पण माझ्या आंतरजाल सेवा प्रदात्याने काहीतरी अडचणींमुळे संध्याकाळपर्यंत मला आंतरजालावर भटकंती करू दिली नाही. जाता जाता त्याला थोड्याफार शिव्या ;))
4 प्रतिक्रिया:
मलाही टाईड वि. रिनची जाहिरात पाहून आश्चर्य वाटलं! विडंबनात्मक ठिक आहे... पण अशी थेट तुलना केलेली जाहिरात मी तर पहिल्यांदाच पाहिली. अशा थेट तुलनेमागे नक्कीच काहितरी असलं पाहिजे!
डायरेक्ट तुलनेपेक्षा इन्डायरेक्ट आणि थोडीशी जास्त अक्कल लावुन सुद्धा जाहीरात बनविता येते.
उदा. कोकचे एक ऑफिस दुसर्या मजल्यावर होते, त्यांनी त्या इमारतीखाली कोका-कोला दुसरा मजला असे लिहिले होते, त्याच फलकाच्या बाजुला पेप्सीने फलक लावला ’पेप्सी: उप्लब्ध सगळीकडे" :)
@मराठी
मला आश्चर्य नाही वाटले. पण ह्याचीही सुरुवात झाली असे वाटले.
@आनंद पत्रे
तुम्ही सांगितलेल्या जाहिरातीचे फोटो मी आंतरजालावर पाहिले आहेत. चांगला प्रकार वाटला तो. खास काही न करता चांगली जाहिरात करता येते.
असो, सध्या तरी ह्या जाहिरातींवर बंदी येऊ शकते असे मटा वरील बातमीवरून दिसते.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5634927.cms
कोलकाता उच्च न्यायालयाने रिनच्या ह्या जाहिरातीवर बंदी आणली असे गेल्या आठवड्यात वृत्त संकेतस्थळांवर वाचले होते.
टिप्पणी पोस्ट करा