आजही एका मुद्द्यावर संसदेत गोंधळ झाला आणि संसदेचे काम तहकूब करावे लागले. ह्या लोकांना कामे न करता गोंधळ घालणेच माहित आहे. फक्त स्वत:च्या पगारवाढीच्या प्रस्तावाला मात्र बिनविरोध पाठिंबा देतात. आणि आज तर विरोधी नाही तर सत्तेतील स.पा. आणि रा.ज.द. पक्षांनीच गोंधळ घालत विधेयकाची प्रत फाडून टाकली. (चलचित्र आणि बातमी संदर्भ सध्या मटाचा देत आहे.)
नोव्हें ०९ मध्ये ह्याच समाजवादी पार्टीच्या अबू आझमीने मराठीत शपथ नाही घेतली म्हणून गोंधळ घातला तर ४ मनसे आमदारांना निलंबित केले होते. ते विधानसभा आणि आज संसद भवन. काही असले तरी सभागृहाचा अवमान करणे दोन्हीकडे मान्य नाही असे वाटते.
ह्या पार्श्वभूमीवर त्या गोंधळ घालणार्या लोकांवर काँग्रेस सरकार काय कारवाई करते (बहुधा सरकार नाही करू शकत. पण शेवटी त्यांच्या मर्जीनेच सर्व चालत आहे) आणि मनसेचे आमदार ह्याबाबत काही म्हणतात का ह्याकडे सध्या लक्ष द्यावेसे वाटते.
मार्च ०८, २०१०
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
1 प्रतिक्रिया:
केले केले त्या सात खासदारांनाही निलंबित केले असे ऐकले. जास्त माहिती सध्या नाही :)
टिप्पणी पोस्ट करा