मार्च ०१, २०१०

परवा रात्री एका वाहिनीवर जाहिरात पाहिली. एक बाई स्वतःच्या पिशवीत 'टाईड' घेऊन आहे. तिच्या बाजूला 'रिन' असलेली पिशवी ठेवून दुसरी एक बाई उभी राहते. त्यांचा नेहमीप्रमाणे संवाद. ह्यात हे आहे, ते आहे. थोड्या वेळाने शाळेच्या बसमधून दोघांची मुले उतरतात. पहिला मुलगा टाईड वालीचा. शर्ट पिवळसर दाखवला आहे. दुसरा मुलगा उतरतो, त्याचा शर्ट एकदम पांदराशुभ्र असतो. पहिल्या मुलाची आई आश्चर्यचकित होते. दुसरा मुलगा म्हणतो, "मम्मी, आँटी क्यों चौंक गयी?" ('टाईड'ची टॅग लाईन 'क्यों? चौंक गये?" आहे :) ) शेवटी सूत्रधार म्हणतो की रिन टाईडपेक्षा कसे जास्त चांगले आहे.

ह्या प्रकारे दुसर्‍या कंपनीच्या उत्पादनासोबत थेट तुलना, वर्चस्व दाखविण्याचे प्रकार इतर देशांच्या जाहिरातींमध्ये असतात हे आंतरजालावरील विडियो पाहून दिसतच होते. पण भारतात तरी पाहून नव्हते. नाही म्हणायला, कोक आणि पेप्सीच्या स्पर्धेत विडंबनात्मक जाहिराती  येत होत्या. किंवा दुसर्‍या कंपनीच्या टॅग लाईनचा वापर करून तुलना करणे दाखविले जात होते. उदा. व्हील च्या स्पर्धेत चक्र का चक्कर छोड., I wanna Dew च्या तुलनेत डोन्ट डू यहाँ, डू वहॉ. वगैरे ही पाहिले होते.
अरे हो, आत्ताच आंतरजालावर शोधल्याप्रमाणे कॉम्प्लॅन वि. हॉर्लिक्सची जाहिरात दिसली. पण त्यावरही खटला चालू होता असे वाचले.

तर आता भारतातही अशा रंगाच्या जाहिरातीही सुरू झाल्यात असे दिसते. आणि कोणकोणते रंग दिसतात ते पाहूच.

असो, आता एक न मागता दिलेला सल्ला: आजच्या रंगपंचमीनंतर रंगलेले कपडे कोणत्या कपड्यांच्या साबणाने धुवावेत हे आता थेट टीव्हीवरील तुलना पाहूनच ठरवा ;)

ह्यावरूनच आठवले.साधारण १५-१७ वर्षांच्या आधी  कॅडबरीने त्यांच्या चॉकोलेटची पाकिटे ठराविक नगात परत करणार्‍यांना काही बक्षिसे दिली होती. त्यात आम्ही घेतले होते एक साबण. त्या साबणाचा उद्देश हा की एखाद्याला तोंड धुताना हे साबण द्यायचे. ते वापरल्याने त्याच्या तोंडाला काळा रंग लागलेला दिसतो. मुलांना गंमतीकरती हे छान होते. रंगात खेळल्यानंतर आम्ही मुलांनी ह्या साबणाचा वापर केला तेव्हा लक्षात आले की साधारण साबणाने जे रंग निघत नव्हते तेही ह्या साबणाने निघत होते. तेव्हा असेच काही उत्पादन आजच्या दिवसातही उपलब्ध असेल तर पहा. :)

(आज सकाळीच हे लेखन टाकणार होतो. पण माझ्या आंतरजाल सेवा प्रदात्याने काहीतरी अडचणींमुळे संध्याकाळपर्यंत मला आंतरजालावर भटकंती करू दिली नाही. जाता जाता त्याला थोड्याफार शिव्या ;))

4 प्रतिक्रिया:

marathi म्हणाले...

मलाही टाईड वि. रिनची जाहिरात पाहून आश्चर्य वाटलं! विडंबनात्मक ठिक आहे... पण अशी थेट तुलना केलेली जाहिरात मी तर पहिल्यांदाच पाहिली. अशा थेट तुलनेमागे नक्कीच काहितरी असलं पाहिजे!

आनंद पत्रे म्हणाले...

डायरेक्ट तुलनेपेक्षा इन्डायरेक्ट आणि थोडीशी जास्त अक्कल लावुन सुद्धा जाहीरात बनविता येते.
उदा. कोकचे एक ऑफिस दुसर्‍या मजल्यावर होते, त्यांनी त्या इमारतीखाली कोका-कोला दुसरा मजला असे लिहिले होते, त्याच फलकाच्या बाजुला पेप्सीने फलक लावला ’पेप्सी: उप्लब्ध सगळीकडे" :)

देवदत्त म्हणाले...

@मराठी
मला आश्चर्य नाही वाटले. पण ह्याचीही सुरुवात झाली असे वाटले.
@आनंद पत्रे
तुम्ही सांगितलेल्या जाहिरातीचे फोटो मी आंतरजालावर पाहिले आहेत. चांगला प्रकार वाटला तो. खास काही न करता चांगली जाहिरात करता येते.

असो, सध्या तरी ह्या जाहिरातींवर बंदी येऊ शकते असे मटा वरील बातमीवरून दिसते.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5634927.cms

देवदत्त म्हणाले...

कोलकाता उच्च न्यायालयाने रिनच्या ह्या जाहिरातीवर बंदी आणली असे गेल्या आठवड्यात वृत्त संकेतस्थळांवर वाचले होते.

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter