गेल्या आठवड्यात मी पाहिलेल्या 'संभवामि युगे युगे' नाटकाबद्दल लिहिणार होतो. मस्तपैकी लिहायला सुरुवातही केली होती. जवळपास ७० /७५ टक्के लिहून ठेवले होते. पण कार्यालयातील कामात वेळ लागल्याने घरी येण्यास उशीर होत गेला आणि नंतर सुट्टीत फक्त आराम करावासा वाटला. तसेच काही लिहिणेही जमले नाही. आज संध्याकाळी पुढे लिहावयास सुरुवात केली. पण संगणकात थोडी अडचण निर्माण झाली, त्यामुळे कित्येक दिवसांपासून लांबविलेले संगणकाचे काम करण्यास घेतलं तर त्याने माझा जुना विदा(डेटा) उडवून टाकला. आणि आता सध्यातरी मला ते पुन्हा लिहायची एवढी इच्छा वाटत नाही :(
चालढकल करत २ आठवडे अनुदिनीवर काहीच लिहिले गेले नाही. असो, पुन्हा नवीन काही लिहिण्याचा प्रयत्न करेन.
जानेवारी ०९, २०१०
जानेवारी ०९, २०१० ९:१४ PM
देवदत्त
5 प्रतिक्रिया
Related Posts:
माझा भ्रमणध्वनी क्रमांक आता बदलणार नाही :) वर्ष २००८. पुण्यात एअरटेलचे प्रिपेड कार्ड घेउन बहिणीला मुंबईत दिले होते. पण काही कारणाने त्यावरून काही संपर्क करीता येत नव्हता. कार्डमध्ये बाकी असलेले पैसे ही पाहता येत नव्हते. कसातरी ग्राहक सेवेचा क्रमांक शोधून काढला. पण का… Read More
भटकंती (शेगाव- मंदिर,नागझरी) ह्या आधी: भटकंती (ठाणे ते शेगाव) भटकंती (शेगाव- आनंदसागर) शनिवारी सकाळी पुन्हा मंदिरात जायचे होते दर्शनाला. साधारण ८ वाजता तयार होऊन आम्ही निघालो. विचार केला होता की दर्शन घेऊन तसेच थेट निघता येईल. म्हणून मग सर्व सामान गाडी… Read More
लघुसंदेशातील संकेताक्षरे गेले काही महिने, खरं तर फेब्रुवारी ०९ पासून, आपल्याला येणार्या बँक किंवा विक्रेत्यांच्या मोबाईल लघु संदेशात पाठवणार्याच्या नावात २ ठराविक प्रकारची अक्षरे देऊन मग पाठवणार्याचे नाव लिहिले असते. एवढा अंदाज होता की TRAI च्या … Read More
दशावतार आज नेहमीप्रमाणे दूरदर्शन(संच) वर वाहिन्यांवरील कार्यक्रम चाळत असताना ४ वाजता दूरदर्शन(आता वाहिनी) च्या राष्ट्रीय वाहिनीवर 'दशावतार' सिनेमा दाखवत असल्याचे लक्षात आले. प्रमाणपत्रावर वर्ष होते २००८. कमल हासनचा 'दशावतारम' लक्षात… Read More
मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोश(सीडी आवृत्ती) : एक अवलोकन गेल्या आठवड्यात लोकप्रभामध्ये मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोशाबद्दल(सीडी आवृत्ती) वाचले. लगेच दुपारी ठाण्यातील दुकानांत फोन फिरविले. पण कुठेही ते उपलब्ध असण्याची शक्यता दिसली नाही. मग माझ्या पुढच्या आशास्थानावर लक्ष्य केंद्र… Read More
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
5 प्रतिक्रिया:
लवकर येऊ देत. आम्ही वाट बघतोय.. आधी चुकून बायकोच्या आय डी वरून कमेंट गेले दोन वेळा. म्हणून डिलीट केले. क्षमस्व... : हेरंब
Mi pan hya natakabaddal bharpur (CHANGALE)aikale. Gadakarila lagale hote tevha pahanar pan hote. Vel zala nahi.
@हेरंब: पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करेन. पण त्या उत्साहात जेवढे लिहिले गेले तेवढे पुन्हा येण्याची शक्यता कमी वाटते :(
@मृदुला: गडकरी मध्ये हे नाटक असण्याची शक्यता मला वाटत नाही. कारण हे नाटक सहा मजली रंगमंच, घोडे, हत्ती वगैरे वापरून केले आहे. आता जेव्हा होते ते कळवा ब्रिजजवळ मैदानात होते.
टिप्पणी पोस्ट करा