गेल्या आठवड्यात मी पाहिलेल्या 'संभवामि युगे युगे' नाटकाबद्दल लिहिणार होतो. मस्तपैकी लिहायला सुरुवातही केली होती. जवळपास ७० /७५ टक्के लिहून ठेवले होते. पण कार्यालयातील कामात वेळ लागल्याने घरी येण्यास उशीर होत गेला आणि नंतर सुट्टीत फक्त आराम करावासा वाटला. तसेच काही लिहिणेही जमले नाही. आज संध्याकाळी पुढे लिहावयास सुरुवात केली. पण संगणकात थोडी अडचण निर्माण झाली, त्यामुळे कित्येक दिवसांपासून लांबविलेले संगणकाचे काम करण्यास घेतलं तर त्याने माझा जुना विदा(डेटा) उडवून टाकला. आणि आता सध्यातरी मला ते पुन्हा लिहायची एवढी इच्छा वाटत नाही :(
चालढकल करत २ आठवडे अनुदिनीवर काहीच लिहिले गेले नाही. असो, पुन्हा नवीन काही लिहिण्याचा प्रयत्न करेन.
जानेवारी ०९, २०१०
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
5 प्रतिक्रिया:
लवकर येऊ देत. आम्ही वाट बघतोय.. आधी चुकून बायकोच्या आय डी वरून कमेंट गेले दोन वेळा. म्हणून डिलीट केले. क्षमस्व... : हेरंब
Mi pan hya natakabaddal bharpur (CHANGALE)aikale. Gadakarila lagale hote tevha pahanar pan hote. Vel zala nahi.
@हेरंब: पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करेन. पण त्या उत्साहात जेवढे लिहिले गेले तेवढे पुन्हा येण्याची शक्यता कमी वाटते :(
@मृदुला: गडकरी मध्ये हे नाटक असण्याची शक्यता मला वाटत नाही. कारण हे नाटक सहा मजली रंगमंच, घोडे, हत्ती वगैरे वापरून केले आहे. आता जेव्हा होते ते कळवा ब्रिजजवळ मैदानात होते.
टिप्पणी पोस्ट करा