कार्यालयात दुपारी जेवताना बोलता बोलता विषय निघाला.
माझा एक मित्र म्हणाला, 'अरे, जपान मध्ये डाटा सेव्ह करण्याकरीता काय काय केले आहे. आता ते लोक दातांमधेही माहिती साठवून ठेवू शकतात.'
दुसरा मित्र म्हणाला ' आता पेपरमध्ये बातमी यायची. एका महिलेचा दात पळवून तिची माहिती चोरली.'
प.मि.: ' किंवा महिलेचे सर्व दात पळवून लाखो रुपयांचा गंडा'.
दु.मि. : 'ती महिला म्हणेल, मी कवळी फक्त धुण्यासाठी बाहेर काढून ठेवली होती.'
मीः'किंवा असेही... महिलेला चाकूचा धाक दाखवून तिचे दात पळवून नेले.'
काय नं?.... आजकाल लोक तंत्रज्ञानात काय काय करतील व इतर लोक त्याचा किती फायदा व गैरफायदाही घेतील व चर्चा ही कशा होतील.
असो... ही फक्त गंमत म्हणून आमचे बोलणे चालले होते. पण प्रत्यक्षात भरपूर काही होऊ शकते.
नोव्हेंबर १७, २००७
नोव्हेंबर १७, २००७ ९:२० PM
देवदत्त
2 प्रतिक्रिया
Related Posts:
मुंबईतील हॉटेलमधील नवीन नियम मुंबईतील हॉटेल संघटनेने लागू केलेल्या नव्या नियमापासून ताटात घेतलेले अन्न टाकल्यास पाच रू. दंड आकारण्यात येणार आहे. वाढती महागाई व अन्न धान्याची कमतरता हे मुख्य कारण असल्याचे सांगत आहेत. तसेच ग्लासातील वाढलेल्या पाण्याच… Read More
सचिन तुफानी खेळला. पण.... सचिन तेंडुलकरचा १७००० धावांचा विक्रम. १४१ चेंडूत १७५ धावा. सचिनचे अभिनंदन. सचिन बाद झाल्यावर भारताचा डाव गडगडला. भारत ३ धावांनी पराभूत. इतिहासाची पुनरावृत्ती. सचिन तेंडुलकरची तुलना डॉन ब्रॅडमन ह्यांच्याशी केली जाते. हे… Read More
क्यू.पी.एस (QPS) आणि पी.आय.पी (PIP) साधारण २०-२१ वर्षांपूर्वी घेतलेल्या आमच्या कार टेप मध्ये एक बटण होते QPS नावाचे. त्याचे पूर्ण नाव तेव्हा तर माहित नव्हतेच. पण नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याचा उपयोग मी शोधून काढला. एखादे गाणे सुरू असताना हे बटण दाबून ठेवू… Read More
'ब्लॉग माझा' मध्ये 'माझी अनुदिनी' स्टार माझाच्या 'ब्लॉग माझा' स्पर्धेत माझ्या अनुदिनीला उत्तेजनार्थ ब्लॉग म्हणून निवडल्याचे विपत्र काल आले. अपेक्षित नव्हते त्यामुळे आनंद झाला. आणि तो आनंद सर्वांशी वाटून घ्यावा म्हणून हे लेखन. सर्वप्रथम सर्व विजेत्यांचे हार्… Read More
शाळेतून बाहेर नुकतेच मिलिंद बोकील ह्यांचे 'शाळा' पुस्तक वाचून संपविले. गेल्या आठवड्यापासून सकाळ-संध्याकाळच्या बस प्रवासात वाचत होतो. सुंदर पुस्तक. सुंदर कथानक. मस्त अनुभव. पहिल्यांदा सुरू केल्यावर नीट वाचणे जमत नव्हते. पण नंतर वेळ मिळाल… Read More
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2 प्रतिक्रिया:
armed to the teeth kinva ekhadyavar 'daat' asaNe, ya vak-pracharanna aata naveen sandarbh yeNaar mhaNaje :)
Good post. :)
tumachya blog var vachala ki tumhi 2007 che aawaaj ani mauj he diwali-ank vachata ahat. bhagyawaan ahat. tyatil kahi awadalela publish kara, amhihi vachu shaku.
टिप्पणी पोस्ट करा