सविस्तर चर्चा/लेख: मनोगत येथे वाचता येईल. दि: २४ मे २००५
"सगळीकडे हे असेच चालते. मग आपण काय करणार?"
हे वाक्य मी जवळपास सगळीकडे ऐकतो.
लोकलमध्ये, मित्रांत बोलताना, कार्यालयात, सगळीकडे...
काय होते?
१."अरे यार, बसमधून येताना जर तिकिट मागितले नाही तर ४ ऐवजी ३ रुपयांत काम होते. १ रु. वाचविला की नाही? "
२. रस्त्यावर माझी चूक असल्याने (मी सिग्नल तोडला किंवा नो पार्किंगला गाडी लावली तर) अर्थात मला वाहतूक पोलिस पकडतील. (नाही पकडले तर सुटलो). मग काय .. दंडाचे ४०० रू. देण्यापेक्षा त्यालाच ५० रू देऊन मामला निकालात काढायचा.
३. काहीतरी विकत घेऊन खाल्ले किंवा घरातीलच काही वस्तू खाण्यासाठी नेली. खाल्ल्यानंतर कचरा काय केला? तर रस्त्यावरच टाकला. लोकलमध्ये असेल तर खिडकीतून बाहेर टाकला. महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत ना साफ करायला.
परिणाम?
१. जर मी तिकीट मागितले नाही तर माझे १/२ रु. वाचले. पण मी दिलेले ३ रुपये कुठे जातील? अर्थात
वाहकाच्या खिशात. (त्याला मिळाले तर त्याचाच फायदा आहे ना? हे मला मिळालेले उत्तर) ते पैसे सरकार कडे जातात का? नाही.
२. मी ५० रू दिले. तेही गेले. अर्थात पोलिसाच्या खिशात. माझे ३५० रू वाचले.
३. जर नाही कचरा साफ झाला, किंवा पावसाळ्यात पाणी तुंबले, तर आपण त्यांना शिव्या देऊन मोकळे.
लोकांना त्याबद्दल सांगितले तर उत्तर काय? "सगळीकडे हे असेच चालते. मग आपण काय करणार? आपण आपला फायदा बघावा"
मी काय करतो?
१. मी तर स्वतः तिकीट मागून घेतो. जाऊ दे माझा एक रुपया जास्त. शेवटी तोच दर ठरविण्यात आला आहे ना? आणि जर तिकिट तपासनीसाने तिकीट विचारले तर काय? तो वाहक येणार आहे का सांगायला?
२. मी एकदा ४०० रू दिले तर मला एक धडा मिळेल ना? पुढे मी जे ५०/५० रू. त्याला देईन ते तर वाचतील ना?
३. मी काहीही रस्त्यावर फेकत नाही. स्वतःजवळील एका पिशवीत ते जमा करतो. मग कचऱ्याची पेटी दिसली तर त्यात फेकतो किंवा घरी कचऱ्याच्या डब्यात.
अशा भरपूर गोष्टी आहेत जिथे आपण फक्त आपला फायदा बघतो.
का आपण फक्त आपला फायदा बघावा? जर तुम्ही स्वतःच्या फायद्याकरीता समाजाची चाल बिघडवीत नाहीत का?
"आपण एकटे काय करणार ?" असे म्हणणे ही पळवाट नाही का?
मला सध्या दूरदर्शन वर दाखविण्यात येणारी एक जाहीरात खूप आवडली. एका गृहसंकुलात खूप कचरा जमा झालेला असतो. शेवटी तेथील लहान मुले पुढाकार घेऊन तो कचरा साफ करतात. तिथेही एका मुलापासून सुरुवात दाखविली आहे.
हे आपण प्रत्यक्षात नाही का करू शकत?
नोव्हेंबर ०४, २००७
नोव्हेंबर ०४, २००७ ११:५३ PM
देवदत्त
2 प्रतिक्रिया
Related Posts:
हम आपके हैं कौन?... हम आपके हैं कौन? आजपासून बरोबर २० वर्षांपूर्वी ५ ऑगस्ट १९९४ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला. सुरूवातील लग्नाच्या गाण्यांचे चित्रहार, साडे तीन तासांचा लांबलचक चित्रपट म्हणून टीका झाली. पण चांगला चित्रपट आहे आवडल… Read More
[असेच काहीतरी] छोटे वाहन, मोठे वाहन दररोज दुचाकीने ऑफिसला जाताना एक गोष्ट जाणवली. लहान (दुचाकी) गाड्या छोट्याशा जागेतून निघून पुढे जाऊ शकतात. ते लोक फुटपाथवरून जातात हा भाग सध्या सोडून द्या. पण कार, ट्रक, बस अशा मोठ्या गाड्या जेव्हा आपली गाडी जाऊ शकत … Read More
अर्थसंकल्पात 'अच्छे' बदल? नवीन सरकार आले आणि माध्यमांनी, विविध करविषयक संकेतस्थळांनी आपापली शक्कल लावून ह्यावेळी थेट करात ही सवलत मिळेल, ही मर्यादा वाढवून मिळेल असे लिहायला, दाखवायला सुरूवात केली आहे. अर्थात हे सगळे अंदाज आणि अपेक्षाच आहेत. मग … Read More
रेल्वे अर्थसंकल्प रेल्वे अर्थसंकल्प सादर व्हायच्या आधी लोकांच्या अपेक्षा होत्या की रेल्वेभाडे कमी व्हावे, नवीन गाड्या सुरू व्हाव्यात, बुलेट ट्रेन बद्दल काही निर्णय घेतला जाईल वगैरे वगैरे. मला ह्यातील गोष्टी सध्या नको होत्या. कारण भाडे वा… Read More
अर्थसंकल्पातील करामधील बदल नवीन सरकारचा बहुचर्चित आणि बहुअपेक्षित अर्थसंकल्प गुरूवारी जाहीर झाला. थेट कर आणि सवलतींच्या बाबतीत करतज्ञ, करसल्लागार आणि बहुतेक 'आम आदमी'च्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्या तरी खूप चांगला अर्थसंकल्प असे म्हटल… Read More
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2 प्रतिक्रिया:
Badhhiya re..
Mi pan asech tuzya sarakhe karto..
chaan !
mi haa lekh manogat var pan vaachala hota.. tevha hi aavadala hota va aataa hi :)
aapalya manasikatha badalyachi garaj aahe.. va tyaachi suravat school life madhunch hou shakte pan aaja kaalche guru.. dev hya deshala vaacho !
टिप्पणी पोस्ट करा