आपण दिवसभरात भरपूर गाणी ऐकत असतो. गुणगुणत असतो, गात असतो. बहुतेकांना तर सर्व गाणी तोंडपाठ असतात. पण ह्यातील अधिकाधिक गाणी फक्त आवडली म्हणून आपण लक्षात ठेवतो, गात असतो. तरीही काही वेळा असे होते की एखादे गाणे ऐकताना आपल्या आसपास/स्वत:सोबत काही घडत असेल तर त्यामुळे पुढे कधीही ते गाणे ऐकले की त्या गाण्याच्या वेळचा प्रसंग आठवतो. अशाच प्रकारची काही गाणी माझ्या आठवणीतील...
ख्वाब हो तुम या कोई हकीकत..
किशोर कुमार ने गायलेले हे गाणे. मला नक्की आठवत नाही...
डिसेंबर २९, २००७
डिसेंबर २९, २००७ २:५९ PM
देवदत्त
अनुभव
1 प्रतिक्रिया
ह्या आधीचा लेख इथे वाचावा.
जरी लहान मुलांना जवळपास सर्व वस्तू हव्या असतात तरी आपल्या वस्तू कोणाला द्याव्यात न द्याव्यात हेही त्यांना तितकेच चांगले कळते असे मला वाटते. समजा एखाद्या मुलाकडे एक खेळणे आहे, जर कोणी मोठा माणूस ते घ्यायचा प्रयत्न करेल तर तो त्याला घेऊ देईल. कारण त्याला माहीत आहे की हा काही हे घेऊन टाकणार नाही. पण तेच खेळणे जर त्याच्याच वयाच्या (किंवा थोडाफार लहानमोठ्या) मुलाने घेतले तर तो काही ते घेऊ देणार नाही. लगेच त्यांच्यात स्पर्धा...
डिसेंबर २६, २००७
डिसेंबर २६, २००७ १२:०४ AM
देवदत्त
वृत्तवाहिनी
2 प्रतिक्रिया
भरपूर वेळा, भरपूर ठिकाणी वृत्तपत्रांनी, वृत्तवाहिन्यांनी बातमीला मसाला लावून सांगणे, खोट्या प्रकारे एखाद्या गोष्टीला पुढे आणणे, किंवा एखाद्या गोष्टीचा त्यांच्या स्वार्थाकरीता फायदा कसा करून घेतला ह्याबाबत चर्चा होत असते. त्यांच्या वागण्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे असते. आता मी नेहमीच प्रसारमाध्यमांच्या विरोधात नाही. त्यांच्यामुळे बऱ्याच गोष्टींना वाचा फुटते. सामान्यांना फायदा होतोच. पण त्यांनी स्वत:ला काही मर्यादेत ठेवावे असे सर्वांचेच मत आहे.
हे...
डिसेंबर १७, २००७
डिसेंबर १७, २००७ ११:१९ PM
देवदत्त
अनुभव
2 प्रतिक्रिया
नेमेची येतो मग पावसाळा प्रमाणे, नेमेची येते नवीन वर्ष आणि नेमेची येतो नवीन वर्षाचा संकल्प.१५ दिवसांनी नवीन वर्ष सुरू होणार. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासोबतच बहुतेक जण प्रश्न विचारणार," मग नवीन वर्षाचा काय संकल्प केलास?"आता काय म्हणावे. दरवर्षीच सुरूवातीला ठरवतो की हे करणार, ते करणार. पण ते अमलात आणणे नीटसे जमत नाही. आहे, त्यात आळस हा भाग आहेच. परंतु काही वेळा वाटते, एवढे काय आपल्याला करायचे असते की जे इतके वर्ष आपण करावयाचे ठरवतो आणि मग करत...
डिसेंबर १५, २००७
डिसेंबर १५, २००७ १:१३ AM
देवदत्त
अनुभव
2 प्रतिक्रिया
आज सकाळी कार्यालयात जाण्याकरीता बसमध्ये बसलो होतो. माझा भ्रमणध्वनी वाजला. पाहिले तर बहिणीचा फोन. उचलला पण काही आवाज नाही आला. थोड्या वेळाने बहिणीने संदेश पाठवला की तिने फोन नाही केला. अनिकेत फोनशी खेळत होता. अनिकेत म्हणजे माझा भाचा. वय फक्त ९ महिने. मी बहिणीला संदेश पाठवला. "बरे आहे. त्याला कळते की फोन कसा लावावा. आता तो फक्त बोलणे जमण्याची वाट बघत असेल." :)
आता ह्यात अनिकेतला खरोखर किती कळते ते माहित नाही, पण नेहमीचाच विचार मनात आला, "आज काल...
डिसेंबर १०, २००७
ह्या आधीचा लेख इथे पहा.
सिनेमातील मला लक्षात राहिलेली आणखी काही वाक्ये....
मेरे दो दो बाप...गोपी-किशन चित्रपटात दोन्ही सुनील शेट्टी एकत्र पाहिल्यावर सुनील शेट्टीचा (गोपी) मुलगा म्हणतो. त्या मुलाची हे बोलण्याची शैली एकदम वेगळी.
आमच्या संगणक कार्यक्रमात (program) काही ड्यूप्लिकेट दिसले की हे वाक्य आठवते.
क्या करू संजना, ऐसा ही हूं मैं.... मत रहो ऐसे...पहिले वाक्य अजय देवगण चे दुसरे वाक्य काजोलचे. अजय देवगणच्या त्या वाक्यावर काजोल ज्या तऱ्हेने...
डिसेंबर ०९, २००७
आपण भरपूर चित्रपट पाहतो. त्यातील बहुतेक संवाद हे आपल्या लक्षात राहतात. बहुतेक वेळा ते संवाद किंवा ती एक एक वाक्ये लक्षात रहावीत अशाच प्रकारे लिहिलेली असतात.
उदा. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधील 'राज, अगर यह तुझसे प्यार करती है तो ये पलट के जरूर देखेगी... पलट... पलट' हे वाक्य. माझ्या मते हे वाक्य नेहमी वापरात यावे, लक्षात रहावे अशाच विचाराने लिहिले असेल. पण त्याच्या सादरीकरणावरही तेवढाच जोर दिला गेला.
आता असेच वाक्य शाहरूख खानच्याच राजू बन...
डिसेंबर ०२, २००७
डिसेंबर ०२, २००७ ११:३३ PM
देवदत्त
अनुभव, आठवणी
2 प्रतिक्रिया
अर्थव्यवस्था म्हटले की समोर येते शेअर बाजार, सेन्सेक्स,विदेशी गुंतवणूक, चलनाचे दर, कर्ज, भाववाढ वगैरे वगैरे. पण ह्यात मी ह्याबद्दल काही लिहिणार नाही. इथे आहेत ते फक्त मी एक कॉलेज विद्यार्थी म्हणून माझे अनुभव. आता त्यात पैसे कमावण्याचा संबंध फारच कमी लोकांचा येतो. असतो तो फक्त खर्च. आईवडिलांनी दिलेल्या पैशांचा. कधीतरी लिहिल्याप्रमाणे, आज काल जेव्हापासून नोकरी करतोय तेव्हापासून पैसे हातात असतात. स्वत:चा/घराचा खर्च करू शकतो. अर्थात त्यामुळे उगाच उधळणे...
नोव्हेंबर ३०, २००७
नोव्हेंबर ३०, २००७ ९:५० PM
देवदत्त
पुस्तक
1 प्रतिक्रिया
अनुदिनी लिहायचे तर सुचले , पण आता नक्की काय लिहावे?
थोड्या दिवसात पुन्हा नवीन शिकणे येईल, कामाचा जोर वाढेल मग तर इतरांचे वाचायलाही वेळ मिळणार नाही, लिहिणे तर दूरच. आणि मग त्यातल्या त्यात सुचले ही पाहिजे. वास्तविक अनुदिनी लिहिणे म्हणजे मनातील जे काही इतर सर्वांना सांगावेसे वाटेल ते लिहावे असे वाटले.
पण सध्या फक्त जुने अनुभवच लिहावेसे वाटताहेत. मग ते वसतीगृहातील असो, रस्त्यावरील काही असो किंवा मग मित्रासोबतचे संवाद किंवा घरातले, कार्यालयातील इतर....
नोव्हेंबर २५, २००७
नोव्हेंबर २५, २००७ ३:३४ PM
देवदत्त
अनुभव
2 प्रतिक्रिया
६४ कला कोणत्या आहेत हो? त्यात पत्ता शोधणे ही कला ही समाविष्ट आहे का? नसल्यास करता येईल का?
का? सांगतो.
सिनेमा चालबाज:
शक्ति कपूर पहिल्यांदा शहरात येतो. तो कादर खानला एक पत्ता (अनुपम खेरचा) विचारतो. कादर खान चाकू काढून त्याच्याकडील सामान लुटून घेतो. शक्ति कपूर विचारतो, " अरे, पत्ता तर सांग". कादर खान म्हणतो," ऐसा करो, यहाँ से आगे जाओ. चौक पे बायें मुड जाना. अगले चौक से बायें मुड जाना. तो फिर आगे एक और चौक आयेगा. वहा से फिर बायें मुडना. अंत में और...
नोव्हेंबर २२, २००७
नोव्हेंबर २२, २००७ १०:४२ PM
देवदत्त
जाहिरात
0 प्रतिक्रिया
जाहिरात विश्चातील काही बदल/विसंगती
१. ऐश्वर्या राय आणि आमिर खान ह्यांची एकत्र पहिली जाहिरात होती पेप्सी ह्या कंपनीसोबत. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी एकत्र काम केले ते कोक च्या जाहिरातीत.
२. रूबी भाटिया ही एकाच वेळी दोन टूथपेस्टच्या जाहिरातीत चमकत होती (वास्तविक दात चमकवत होती). एक होती कोलगेट आणि दुसरी होती क्लोज-अप. दोन्ही जाहिराती एकाच वेळी प्रदर्शित झाल्याने मला वाटले असे कसे होईल? पण नंतर कळले की वास्तविक तिची क्लोज-अप ची जाहिरात काही वर्षांपूर्वी...
नोव्हेंबर २०, २००७
नोव्हेंबर २०, २००७ ११:५३ PM
देवदत्त
अनुभव, आठवणी
0 प्रतिक्रिया
२५ एप्रिल १९९९.संध्याकाळी ६/७ च्या दरम्यान मी माझ्या संगणकावर DOS मध्ये विषाणूविरोधी संरक्षणाची संहिता चालवत होतो. का माहित नाही पण माझ्या संगणकावर विंडोजवर ते चालत नव्हते. त्यात त्याला C ड्राईव्ह मध्ये काही विषाणू मिळाले. ते मी काढून टाकले. पण D ड्राईव्ह तपासता आली नाही. कारण ती संकुचित होती(compressed). तेव्हा विषाणू मिळणे म्हणजे खास काही वाटत नव्हते.
२६ एप्रिल १९९९.मी सकाळी झोपलो होतो. ७:३० किंवा ८ च्या दरम्यान स्नेहांशू मला उठवायला आला....
नोव्हेंबर १९, २००७
नोव्हेंबर १९, २००७ १२:३६ AM
देवदत्त
चित्रपट
0 प्रतिक्रिया
काही वर्षांपुर्वी माझ्या बहिणीने मला एका इंग्रजी चित्रपटाची कथा सांगितली होती.एका शहरात मंदीचे वातावरण असते. लोक जास्त काही खरेदी करीत नसतात. काय चाललंय कोणाला काही कळत नसते. एक दिवस एक माणुस कार विक्रेत्याकडे जातो आणि म्हणतो की मला ती महागडी कार खरेदी करायची आहे. मी ख्रिसमसच्या दिवशी घेऊन जाईन. हा विक्रेता विचार करतो की कित्येक दिवस आपण घरात काही चांगल्या,वेगळ्या वस्तू विकत घेतल्या नाहीत. आता जर ही कार विकली गेली तर आपल्याला भरपूर पैसे मिळतील....
नोव्हेंबर १७, २००७
नोव्हेंबर १७, २००७ ९:२० PM
देवदत्त
2 प्रतिक्रिया
कार्यालयात दुपारी जेवताना बोलता बोलता विषय निघाला.माझा एक मित्र म्हणाला, 'अरे, जपान मध्ये डाटा सेव्ह करण्याकरीता काय काय केले आहे. आता ते लोक दातांमधेही माहिती साठवून ठेवू शकतात.'दुसरा मित्र म्हणाला ' आता पेपरमध्ये बातमी यायची. एका महिलेचा दात पळवून तिची माहिती चोरली.'प.मि.: ' किंवा महिलेचे सर्व दात पळवून लाखो रुपयांचा गंडा'.दु.मि. : 'ती महिला म्हणेल, मी कवळी फक्त धुण्यासाठी बाहेर काढून ठेवली होती.'मीः'किंवा असेही... महिलेला चाकूचा धाक दाखवून तिचे...
नोव्हेंबर ११, २००७
नोव्हेंबर ११, २००७ ११:४४ PM
देवदत्त
अनुभव
0 प्रतिक्रिया
शेवटी दिवाळी संपली...
नाही. दिवाळीशी माझा काही राग नाही. एक छान सण आहे. पण आजकाल कंटाळा येतो तो मोठ्या आवाजाच्या फटाक्यांचा. नुसते आपलं ढूम.. ढाम चालू असते. कानाचे बारा वाजतात. आणि ते ही रात्री ११/१२ पर्यंत.
तरी वाटते ह्यावेळी जास्त फटाके वाजविले गेले नाहीत. निदान काल आणि आज तरी.
त्या पत्रकांचा परिणाम का? ;)
लक्ष्मीपूजनाला होता जरा आवाज. पण सहन केला. :)
असे नाही की मी कधी फटाके वाजविले नाहीत. मी ही भरपूर फटाके उडविलेत. नंतर त्यातून बाहेर आलो....
नोव्हेंबर ०५, २००७
नोव्हेंबर ०५, २००७ १२:४१ AM
देवदत्त
अनुभव
0 प्रतिक्रिया
"अंकल,इसकॊ पढने के बाद ही फेंकना", एक लहान मुलगा मला म्हणत होता.
दुपारी बेल वाजल्यावर मी दरवाजा उघडला. समोर दोन ८/१० वर्षांची मुले एका पिशवीतून काही कागद काढत होते. त्यातील एक मुलगा मला म्हणाला "अंकल,इसकॊ पढने के बाद ही फेंकना". मला हसू आले. त्या मुलाचे वाक्य मार्मिक होते. मी तो कागद घेण्याकरीता वाट बघत होतो. पत्रक हिंदीत होते. "क्या पटाखे फोडना जरूरी है?" ह्या संबंधी.
मला त्या मुलाच्या वाक्यावरून पत्रके (किंवा जास्त करून जाहिराती) आणि ते ...
१२:४० AM
देवदत्त
0 प्रतिक्रिया
आतापर्यंत इतर ठिकाणी मी केलेले लेखन/चर्चा इथे चिकटवल्या. थोडक्यात म्हणजे माझ्या मनातील विचार.. ज्यात बहुधा प्रश्नच होते. ;) अनुभवकथन ही.आता बघुया, पुढे आणखी काय सुच...
१२:३५ AM
देवदत्त
1 प्रतिक्रिया
प्रसंग १: वेळ रात्री ८ च्या सुमारास.स्थळ: मी रिक्शातून रेल्वे स्टेशन वरून घरी येतोय.मोबाईल वाजतो. समोरून एका गॄहस्थाचा आवाज.गृ: नमस्कार. देवदत्त का?मी: हो.गॄ: मी xxxx बँकेतून बोलतोय.(फोन नं चेन्नईचा होता म्हणून मी संभाषण पुढे सरकू दिले)आपले जे हे क्रेडिट कार्ड आहे, त्याचे स्टेटमेंट वेळेवर येते का?मी: मागील स्टेटमेंट आले. ह्यावेळचे माहित नाही.गॄ: ठिक आहे. बँकेने आता तक्रार निवारणाकरता फोनवर नवीन सुविधा चालू केली आहे. तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता.मी:...
१२:०५ AM
देवदत्त
0 प्रतिक्रिया
सविस्तर चर्चा/लेख मनोगत येथे वाचता येईल. दि : १३ मे २००५महाभारत, रामायण आणि इतर धार्मिक पुस्तकांमध्ये लिहिल्याप्रमाणे आणि आपण पाहिलेल्या ठिकाणांवरुन मी हे म्हणू शकेन की देव-देवतांनी पृथ्वीवर आपला वास केला होता.गीतेमध्ये लिहिल्याप्रमाणे श्रीकृष्ण परमपुरूष आहे. पूर्ण ब्रम्हांड त्याच्या अधिपत्याखाली आहे. आपल्या सूर्यमालिकेतील बहुतेक सर्व ग्रह हे देव आहेत. आणखीही बरेच काही.....पण मग फक्त पृथ्वीवरच(आणि बहुधा भारतातच) सर्व काही का घडले? रामायण, महाभारत...
नोव्हेंबर ०४, २००७
नोव्हेंबर ०४, २००७ ११:५३ PM
देवदत्त
2 प्रतिक्रिया
सविस्तर चर्चा/लेख: मनोगत येथे वाचता येईल. दि: २४ मे २००५"सगळीकडे हे असेच चालते. मग आपण काय करणार?"हे वाक्य मी जवळपास सगळीकडे ऐकतो.लोकलमध्ये, मित्रांत बोलताना, कार्यालयात, सगळीकडे...काय होते?१."अरे यार, बसमधून येताना जर तिकिट मागितले नाही तर ४ ऐवजी ३ रुपयांत काम होते. १ रु. वाचविला की नाही? "२. रस्त्यावर माझी चूक असल्याने (मी सिग्नल तोडला किंवा नो पार्किंगला गाडी लावली तर) अर्थात मला वाहतूक पोलिस पकडतील. (नाही पकडले तर सुटलो). मग काय .. दंडाचे ४००...
१०:४३ PM
देवदत्त
0 प्रतिक्रिया
!-- document.write('.scripthide { display: none; } .scriptinline { display: inline; } .scriptblock { display: block; }'); //-->सविस्तर लेख/चर्चा: मनोगत येथे. दि: ७ जून २००५.चित्रपट आणि आपण१ जूनला वर्तमानपत्रात बातमी वाचली. १ ऑगस्ट पासून चित्रपट, धारावाहिकांमध्ये धुम्रपानास बंदी.जरा बरे वाटले, की सरकार धुम्रपानाविरुद्ध जागरुकता वाढवित आहे. पण वाटले की ह्याचा किती फायदा होईल? थोडा विचार केल्यानंतर जाणवले की चित्रपटांचा समाजावर परिणाम होतोच. तेव्हाच...
८:५७ PM
देवदत्त
0 प्रतिक्रिया
दोन वर्षांपूर्वी एका ईमेल मध्ये आलेले हे विचार. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम ह्यांचे. तेव्हा मी हे इथे टाकले होते.खूप आवडले. आचरणात आणण्याजोगे. स्वत: आणि इतरांनीही. मी तर आधीच सुरूवात केली होती. ह्या विचारांनंतर त्यास दुजोरा मिळाला.आपल्याजवळ दहा मिनिटे आहेत का?तुम्ही तुमच्या देशासाठी दहा मिनिटे देऊ शकता का? जर हे शक्य असेल, तर पुढील मजकूर वाचा : तुम्ही म्हणता की, आपले सरकार अकार्यक्षम आहे. तुम्ही म्हणता की, आपले कायदे फारच जुनेपुराणे,...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)