धक्का बसला ना?
गेले काही महिने मटावरील बातम्यांव्यतिरिक्त इतर गोष्टींबद्दल चर्चा होत होत्या. नायिकांचे हॉट फोटो, मसालेदार बातम्या वगैरेंची रेलचेल असते अशा प्रकारे काही काही. आणि ते आहेच. मटाच्या पानावर गेले की रंगीबेरंगी चित्रे दिसतात, आणि भरपूर काही :)
पण आज आणखी काहीतरी जास्त दिसले (अमेरिकेतून पाहिले असताना). मटा वर ब्लू फिल्म ची जाहिरात. अर्थात मटा ने स्वतः ती टाकली नसेल. गूगल च्या अॅडसेन्सची कृपा ती. गूगलने कोणते निकष लावून ती जाहिरात दाखवली माहित नाही. पानावरील मजकूरावरून म्हणायचे तर मी होतो 'हसा लेको' पानावर. इतर पानांवर नाही. किंवा मग मटा ने काय प्राथामिक माहिती त्यांना दिली त्यांनाच माहिती. (गूगल अॅडसेन्स बद्दल माहिती असणार्यांनी प्रकाश टाकावा ही विनंती. :)
१ २ महिन्यांपूर्वीच गूगलने, जीमेल मध्ये ज्या जाहिराती दाखवल्या जातात त्यामध्ये सुधारणा केली असे सांगितले होते. आणि आधी माहित असल्याप्रमाणे गूगलने अजून तरी मराठी मजकूराकरीता अॅडसेन्स बनविला नव्हता. आता आला असेल तर त्यात भरपूर लोचा आहे ;) त्यामुळे माझ्या अनुदिनीकरीता तरी अॅडसेन्स दूरच राहील. (तसा त्याबद्दल विचारच नाही केला अजून)
असो. मटाची होत असलेली प्रगती आणि आता अशी जाहिरात (चुकून?) आली असली तरी मटावर तसा मजकूर येईल अशी आशा बाळगू नका. भारतातल्या नियमांप्रमाणे त्याला बंदी आहे. ;)

3 प्रतिक्रिया:
आज सकाळी पाहिल्याप्रमाणे इसकाळच्या संकेतस्थळावरही तशीच जाहिरात दिसली. म्हणजे हा गूगलचाच प्रताप आहे :)
मटा एक नावाजलेल वृत्तपत्र , पण मटा नेट मला अजिबात आवडत नाही , ती त्या वरील अश्लील फोटो व बातम्या (आता हा गुगलचा प्रताप वगळून ). मटा तरी आपलं वृत्तपत्र चालवायला याची गरज नसावी. इतर सादर चांगली असली तरी नेटमटा वाचावासा वाटत नाही. इतर नेट वृत्तपत्र मला अशी फुटकळ दिसत नाही. मटा ने जरा याचा विचार करायला हवा.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद मी मराठी.
मटा छापील वृत्तपत्रही आमच्या घरी येते. बाकी इतर मराठी वृत्तपत्र संकेतस्थळांपेक्षा इसकाळ आणि मटा लगेच बातमी देत असतात म्हणून पाहतो.
बाकी त्यांच्या त्या फोटो आणि बातम्या ह्या त्यांच्या मूळ संकेतस्थळ म्हणजेच Indiatimes च्या Framework मुळे दाखवाव्या लागत असतीलच. आणि Indiatimes किंवा Times Of India ह्यांनी तर त्या मर्यादा पाळणे बहुतेक आधीपासूनच बंद केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा