काल रात्री दरवाजा बंद करून झोपलो. सकाळी उशीरापर्यंत झोपायचे होते. पण दरवाजाचे कुलूप ठीक करायला येतील म्हणून ८:३० ला उठलो. ९:४५ पर्यंत वाट पाहिली. परंतु काही हालचाल नाही. तो पर्यंत बजेटला (कार वाले)फोन करून परिस्थिती सांगितली. त्यांनी सांगितले, "काही हरकत नाही. तुम्ही गाडी घेऊन या. कागदपत्रांची पूर्तता करा. आम्ही गाडी बदलून देऊ." म्हटले, "चला.एक काम तर सोपे झाले."
अपार्टमेंटच्या कार्यालयाला फोन केला. पण ते म्हणतात, "तुम्ही अपार्टमेंट क्रमांक आणि फोन क्रमांक देऊन ठेवा. आम्ही तुम्हाला फोन करू." थोड्या वेळाने त्यांचा फोन आला. तो म्हणाला, "तुमचे अपार्टमेंट आमच्या अखत्यारीत नाही येत. ज्यांच्याकडून भाड्याने घेतले आहे त्यांना संपर्क करा." तो क्रमांक मिळविला. आणि त्यांना फोन केला. आता तिथली बाई म्हणाली, " आज शनिवार असल्याने शक्यता कमी आहे. पुढील व्यावसायिक दिवसात आम्ही तुमचे काम करून देऊ." मी म्हटले," ही महत्त्वाची गोष्ट आहे. कॄपया प्रयत्न करा". ती म्हणाली," ठीक आहे. मी प्रयत्न करते."
आता गंमत बघा. कुलुप बंद होत नसेल तर मी घराच्या बाहेर नाही जाऊ शकत. जर बाहेर जाताना कसे तरी बंद केले तर पुन्हा आत जाण्याची खात्री नाही. अर्धा पाऊण तास वाट पाहिली तरी काही उत्तर नाही. पुन्हा फोन केला. ती म्हणाली, " आम्ही त्यांना संदेश देऊन ठेवला आहे. त्यांच्याकडून उत्तर आले नाही अजून." पुन्हा अर्ध्या तासाने फोन केला," तेव्हा ती म्हणाली, "त्यांचा माणूस दुसर्या एका जागी गेला आहे. तिकडचे काम संपल्यावर तो येईल. पण त्यात कमीत कमी १ २ तास जातील." आता काय करणार? वाटच पहावी लागेल.
पण १२ च्या आसपास (म्हणजे खूप लवकर) दरवाज्यावर ठकठक झाली. बाहेर एक माणूस उभा होता. "तुमच्या दरवाज्याच्या कुलुपामध्ये अडचण आहे का?", त्याने विचारले. मी म्हटले, "हो." तो आत आला. कुलुपाशी चाळे करून काय झाले ते पाहिले. स्क्रू ड्रायव्हर काढला. स्क्रू काढून पूर्ण कुलूप बाहेर काढले. म्हणाला, " मी थोड्या वेळात येतो." बाहेर गेला. थोड्या वेळात एक नवीन कुलुप घेऊन आला. त्याला विचारले, "नवीन लावणार का?" तो म्हणाला,"हो. ह्यात नवीनच लावावे लागेल." ५ मिनिटांत कुलूप लावले. एक चावी काढून घेऊन गेला. म्हणाला," आमच्या कार्यालयात एक ठेवावी लागते."
हुश्श. एक काम तर झाले. आता गाडीचे काम. दुसरे एक काम बाकी होते. ते करून मग बजेट कडे निघालो. त्याआधी चाकांचा फोटो घेऊन ठेवला :)
पुढचे चाक:

मागचे चाक:

त्यांनी सांगितल्याप्रमाणे जास्त वेग नाही म्हणून ११ मैल ३० च्या वेगाने गेलो. जिथे नेहमी ४०-४५ चा वेग असतो. हजार्ड/पार्किंग लाईट लावून गाडी नेत होतो. आता कमी वेगाने जायचे म्हणून एकदम उजव्या रांगेतून जात होतो. पण डावीकडे वळताना पूर्ण डावीकडे यावे लागेल. नेमकी आज रस्त्यावर जास्त गर्दी. पार्किंग लाईट मधून वळणाचा संकेत कळणार नाही म्हणून तात्पुरता तो बंद करायचो. परत चालू. :)
तिकडे पोहोचल्यावर जास्त काही करावे लागले नाही. कागदपत्रांची पूर्तता करून दुसरी गाडी घेतली आणि आरामात परत निघालो.
5 प्रतिक्रिया:
वा! हवा भरलेला टायर टमटमीत दिसतो आहे.
लय भारी!
तुझ्या अपरोक्ष तो माणूस तुझं घर उघडू शकतो ना?
मग काही चोरी होऊ शकते की...अशी कशी एक चावी त्याला दिली? :(
लय भारी...
सर्वांना प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
कांचन, कोणत्या टायर बद्दल म्हणताय? मागील? :)
देव काका, इकडचा तसा नियमच आहे त्यांचा. देखरेख आणि इतर मदतीकरीता एक चावी त्यांच्याकडे असते.
टिप्पणी पोस्ट करा