ऑक्टोबर ०५, २०१०टुसान वरून शनिवारी (२ ऑक्टो) सकाळी ११:३६ ला निघालो. २ तास प्रवास, ३:३० तास डेन्वर विमानतळावर, मग ९ तास विमानातून फ्रँकफर्ट, पुन्हा २ तास विमानतळावर आणि ८ तासांत मुंबई. ४ ला पहाटे १२:४५ ला मुंबईला पोहोचलो(सर्व वेळा जवळपास चूभूद्याघा ;) ). ह्या वेळात ३ तारीख मी फक्त फ़्रॆंकफर्ट विमानतळावर पाहिली. त्यामुळे ३ तारीख ही माझ्याकरीता फक्त २ ते २:३० तासांची. थोडक्यात रविवार पाहिलाच नाही असे ही म्हणू शकतो. ह्यावरून मला हिंदीतील ’संडे’ सिनेमा आठवला आणि इंग्रजी 'हँगओव्हर'. अर्थात मला काही हँगओव्हर नव्हता. काय चालले आहे ते माहित होते ;)

मी तिकडे गेलो १० जुलै ला तेव्हा रात्री २:३० चे विमान. टूसॉनला पोहोचलो संध्याकाळी ७:०५ ला. तेव्हा तिकडच्या रात्री १२:३० पर्यंत जागा होतो. टुसॉनची वेळ भारतापेक्षा १२:३० तास मागे. एवढ्या पूर्ण वेळात १० जुलै हीच तारीख होती. त्यामुळे माझ्याकरीता १० जुलै हा दिवस एकूण ३६:३० तासांचा होता. हम्म्म... सर्वात मोठा दिवस :)

आता जेटलॅग चा त्रास अमेरिकेत तरी जाणवला नाही. गेल्यावर्षीही नव्हता जाणवला. दुसर्‍या दिवसापासूनच वेळ बरोबर जमत गेली. पण मागील वर्षी भारतात परत आल्यानंतर जेट लॅगचा त्रास जाणवत होता. आल्यानंतर ३ दिवस सुट्टी आणि मस्त झोप घेऊनही.

आता ह्यावेळीही पाहतो दिनक्रम किती दिवसांत पूर्वपदावर येतो ते :)
Reactions:

1 प्रतिक्रिया:

देवदत्त म्हणाले...

सध्या तरी एकाच आठवड्यात दिनक्रम नियमीत झाल्यासारखा वाटतोय.

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Subscribe

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter