गेल्या महिन्यात मी घरच्या घरी झटपट तंदूरी चिकन बनविले ते बझ वर लिहिले तर बहुतेकांच्या शिव्या खाल्ल्या कारण नेमकी त्या दिवशी भारतात आषाढी एकादशी होती. मग नंतर काही दिवसांनी चिकन बिर्याणी (बिर्याणी म्हणण्यापेक्षा कोंबडी घातलेला मसाले भात ;) ) बनविण्याचा प्रयत्न केला. पण श्रावण सुरू झाल्याने त्याचे लिखाणही पुढे ढकलले. आज ते एकत्र पुन्हा लिहित आहे :)
घरच्या घरी झटपट तंदूरी चिकन.
साहित्य: कोंबडीची तंगडी, तिखट, हळद, मीठ आणि तेल.
कृती: तिखट, मीठ, हळद आणि तेलाची एकत्र पेस्ट करून कोंबडीच्या तंगडीवर लावा. ३५० डि.च्या वर ओवन लावून त्यात हे भाजायला ठेवा.
सर्व गोष्टींचे माप आपल्या मर्जीवर ;)
झटपट चिकन बिर्यानी(?)
साहित्य: वरीलच आणि आणखी थोडे.. कोंबडीची तंगडी, तिखट, मीठ, हळद, तेल, तांदूळ, कांदा, टोमॅटो, कापलेल्या भाज्या (इथे कापूनच मिळाल्यात स्टर फ्राय वेजिटेबल्स)
कृती: टोमॅटो, कांदा बारीक कापून घ्यावा. (मी जास्त बारीक कापला नाही).
कुकरमध्ये तेल गरम करण्यास ठेवावे. मग त्यात कापलेला कांदा पिवळसर होईपर्यंत तळून घ्यावा. मग तिखट, मीठ, हळद घालून एकत्र चमच्याने हलकेसे शिजेपर्यंत तळावे.
कोंबडीची तंगडी त्यात घालून पूर्ण मसाला त्यावर नीट लागेल असे तळून घ्यावे.
नंतर कापलेल्या भाज्या त्यात मिसळून आणखी थोडा वेळ ते मिश्रण चमच्याने हलवावे.
नंतर त्यात तांदळाच्या दुप्पट एवढे पाणी घालून.उकळी येईपर्यंत गरम करा. कुकरचे झाकण बंद करा. २ ते ३ शिट्ट्या होईपर्यंत भात शिजू द्यावा.
नंतर प्लेट मध्ये घालून गरम गरम चिकन बिर्याणी खाण्याची मजा घ्यावी. ;)
सप्टेंबर १०, २०१०
सप्टेंबर १०, २०१० १२:४६ PM
देवदत्त
3 प्रतिक्रिया
Related Posts:
अर्थ अवर (Earth Hour) - भारतात फज्जा? दरवर्षीप्रमाणे पुन्हा 'पृथ्वीकरिता एक तास' अर्थात 'अर्थ अवर' ची चाहूल लागली आहे. १९ मार्च रोजी रात्री ८:३० ते ९:३० दरम्यान आपण वीजेची उपकरणे बंद करून वीज वाचवावी जी पृथ्वीकरीता उपयोगी पडेल असा त्यामागील हेतू आहे. २००९ मी … Read More
अर्थसंकल्प २०१६-१७ ह्यावर्षीचा अर्थसंकल्प तुम्हाला कसा वाटला? मी अर्थसंकल्पाचे भाषण पाहत होतो तेव्हा सुरुवातीला चांगले वाटले. पुढील मुद्दे ऐकून सकारात्मक वाटले. २०२२ पर्यंत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करणे प्रधानमंत्री ग्राम सडक … Read More
पीपीएफ व किसान विकास पत्रावरील व्याजदरात कपात ईपीएफ वर कर लादण्याच्या असफल प्रयत्नानंतर कनिष्ठ व मध्यमवर्गीय लोकांना आर्थिक जाच देण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसलेली आहे असे दिसते. फेब्रुवारीमध्ये त्यांनी पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधीवरील व्याज वाढविले ते बहुधा हाच… Read More
भविष्य निर्वाह निधीवरील करः मूर्खपणा आणि जाचक काही महिन्यांपूर्वी काही मित्र मला विचारत होते की 'तू व्हीपीएफ किंवा पीपीएफ मध्ये गुंतवणूक करतो/करणार का?' मी म्हटले, 'पीएफ ही एक तर सरकारी योजना आहे. त्यामुळे त्यातील पैसे काढताना खरोखरच ते किती सुलभतेने मिळतील ह्याची हमी… Read More
भविष्य निर्वाह निधीवरील करप्रस्ताव रद्द सरतेशेवटी अर्थमंत्र्यांनी ईपीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील कर लावण्याचा प्रस्ताव मागे घेतला. चांगले झाले. त्यांनी तो निर्णय घ्यायलाच हवा होता. मध्यमवर्गीयांना करसवलत न देता आणखी कराचा बोजा टाकला तर ते त्यांना… Read More
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
3 प्रतिक्रिया:
- मस्त :) आणि एखाद्या मित्राला महेंद्र कुलकर्णी सारख्याला बोलावून खाऊ घालावी. अशा रितीने श्रावणाचे उद्यापन करावे :) म्हणजे देव प्रसन्न होतो ( प्रमोद देव नाही - खरोखरचा)
बाकी तुम्ही फारच कमी लिहिता हो इथे ब्लॉग वर?
आज हरतालिका अन् उद्या गणपति, विसरलां वाटतं ?
महेंद्र दादा, पुढील वेळि नक्की बोलावेन.
हो, लेखन कमी झाले आहे. गेले ३/४ महिने तर कामामुळे काहीच नाही. पण आता नियमित करायचा विचार आहे.
आशाजी, एक महिना थांबलो मी. नंतर काल ईद होती आणि गणपतीच्या आधी म्हणून लिहिले. नंतर आठवले हरतालिका ही आहे म्हणून :)
टिप्पणी पोस्ट करा