गेल्या महिन्यात मी घरच्या घरी झटपट तंदूरी चिकन बनविले ते बझ वर लिहिले तर बहुतेकांच्या शिव्या खाल्ल्या कारण नेमकी त्या दिवशी भारतात आषाढी एकादशी होती. मग नंतर काही दिवसांनी चिकन बिर्याणी (बिर्याणी म्हणण्यापेक्षा कोंबडी घातलेला मसाले भात ;) ) बनविण्याचा प्रयत्न केला. पण श्रावण सुरू झाल्याने त्याचे लिखाणही पुढे ढकलले. आज ते एकत्र पुन्हा लिहित आहे :)
घरच्या घरी झटपट तंदूरी चिकन.
साहित्य: कोंबडीची तंगडी, तिखट, हळद, मीठ आणि तेल.
कृती: तिखट, मीठ, हळद आणि तेलाची एकत्र पेस्ट करून कोंबडीच्या तंगडीवर लावा. ३५० डि.च्या वर ओवन लावून त्यात हे भाजायला ठेवा.
सर्व गोष्टींचे माप आपल्या मर्जीवर ;)
झटपट चिकन बिर्यानी(?)
साहित्य: वरीलच आणि आणखी थोडे.. कोंबडीची तंगडी, तिखट, मीठ, हळद, तेल, तांदूळ, कांदा, टोमॅटो, कापलेल्या भाज्या (इथे कापूनच मिळाल्यात स्टर फ्राय वेजिटेबल्स)
कृती: टोमॅटो, कांदा बारीक कापून घ्यावा. (मी जास्त बारीक कापला नाही).
कुकरमध्ये तेल गरम करण्यास ठेवावे. मग त्यात कापलेला कांदा पिवळसर होईपर्यंत तळून घ्यावा. मग तिखट, मीठ, हळद घालून एकत्र चमच्याने हलकेसे शिजेपर्यंत तळावे.
कोंबडीची तंगडी त्यात घालून पूर्ण मसाला त्यावर नीट लागेल असे तळून घ्यावे.
नंतर कापलेल्या भाज्या त्यात मिसळून आणखी थोडा वेळ ते मिश्रण चमच्याने हलवावे.
नंतर त्यात तांदळाच्या दुप्पट एवढे पाणी घालून.उकळी येईपर्यंत गरम करा. कुकरचे झाकण बंद करा. २ ते ३ शिट्ट्या होईपर्यंत भात शिजू द्यावा.
नंतर प्लेट मध्ये घालून गरम गरम चिकन बिर्याणी खाण्याची मजा घ्यावी. ;)
सप्टेंबर १०, २०१०
सप्टेंबर १०, २०१० १२:४६ PM
देवदत्त
3 प्रतिक्रिया
Related Posts:
२६ नोव्हें: श्रद्धांजली२६ नोव्हें २००८ ला हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली एवढेच मी म्हणू शकतो. इतर काही परवा लिहू नाही शकलो. खरं तर लिहावे असे वाटलेही नव्हते. पण तरी आताही मनात सारखे येते म्हणून लिहून टाकले. बाकी, हे का झाले, काय करायला हवे ह… Read More
आघाडीच्या पक्षांचा निषेधखरं तर निवडणूका संपल्यानंतर राजकारणावरील माझे विचार लिहायचे नाहीत असे मी ठरवले होते. पण सध्या जे काही चालले आहे त्यावर लिहावेसेच वाटते.२२ ऑक्टो. ०९ ला च काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी ला बहुमत मिळाल्याचे सिद्ध झाले. त्यांनी २ दिव… Read More
मतदान करावे की नाही?'जर तुम्ही मतदान केले नसेल तर तुम्हाला सरकारला काही बोलण्याचा हक्क नाही', अशा आशयाचे वाक्य सिनेमात/इतरत्र भरपूर वेळा ऐकले होते, पटतही होते. जरी गेले काही वर्षे मी मतदान करावेच ह्या मतावर होतो तरी सध्याच्या परिस्थितीत वाटत होत… Read More
...तरी सचिनने बिघडवले काय?लोकप्रभामधील राजू परूळेकरांचे 'अल्केमिस्ट्री' वाचले. नुकत्याच चाललेल्या 'मराठी/महाराष्ट्रीय आणि सचिन' वादात त्यांनीही आपले हात धुवून घेतल्यासारखे वाटले, तेही 'सचिन' हे चलनी नाणे वापरून. वास्तविक मला त्यांचे मुद्देच पटले … Read More
पृथ्वीकरीता एक तासगेले एक आठवड्यापासून 'अर्थ अवर' विषयी वाचत होतो. बहुतेकांनी ह्याला पाठिंबा दिलाच होता. मी ही विचार करत होतो करावे की नाही. आपल्या येथे वीज महामंडळ रोज ३-४ तास भारनियमन करत असतेच. पण त्याला कोणी "अर्थ ४ अवर्स" म्हटले नाही. ;)अ… Read More
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
3 प्रतिक्रिया:
- मस्त :) आणि एखाद्या मित्राला महेंद्र कुलकर्णी सारख्याला बोलावून खाऊ घालावी. अशा रितीने श्रावणाचे उद्यापन करावे :) म्हणजे देव प्रसन्न होतो ( प्रमोद देव नाही - खरोखरचा)
बाकी तुम्ही फारच कमी लिहिता हो इथे ब्लॉग वर?
आज हरतालिका अन् उद्या गणपति, विसरलां वाटतं ?
महेंद्र दादा, पुढील वेळि नक्की बोलावेन.
हो, लेखन कमी झाले आहे. गेले ३/४ महिने तर कामामुळे काहीच नाही. पण आता नियमित करायचा विचार आहे.
आशाजी, एक महिना थांबलो मी. नंतर काल ईद होती आणि गणपतीच्या आधी म्हणून लिहिले. नंतर आठवले हरतालिका ही आहे म्हणून :)
टिप्पणी पोस्ट करा