अपेक्षेप्रमाणे 'शिक्षणाच्या आयचा घो' सिनेमाच्या नावावर वाद उठला. मराठा महासंघाने त्या नावावर आक्षेप घेतला आहे. गेल्या आठवड्यात उठलेला "झेंडा" सिनेमाचा वाद आणि आता हा. जमेल ते पक्ष , संघटना आता समोर येऊन आपली ताकद दाखवायचा प्रयत्न करत आहेत. ( मराठा महासंघाची पत्रकार परिषद सध्या चालू आहे त्यात तर त्यांचेच वाक्य आहे की सिनेमा प्रदर्शित झाला तर आम्ही आमची ताकद दाखवू.)
साध्या विचारांत तरी मला हे कळत नाही की नेमका सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधीच हे वाद का उठतात? (सिनेमाच्या पथ्यावर पाडण्यासाठीही असू शकतात हे तर भरपूर वेळा दिसतेच. पण इथे ती शक्यता आहे का?)
आता 'झेंडा' सिनेमाचे एक वेळ मानू शकतो की त्यातील दृश्यांवर किंवा त्या व्यक्तिरेखेवर त्यांचा आक्षेप आहे, ते सर्व सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच कळू शकतात, काही वेळा सिनेमाच्या प्रोमो मधूनही. पण सध्या तरी हा सिनेमा अजून प्रदर्शित झाला नाही आणि प्रोमोमध्ये तरी काही आक्षेपार्ह संवाद वगैरे दाखविले नाहीत. मग 'स्वाभिमान' ने सिनेमा न पाहताच त्यावर आक्षेप कसा नोंदवला?
आणि 'शिक्षणाच्या आयचा घो' ह्या सिनेमाबद्दल म्हणायचे, तर ह्या नावाचा सिनेमा येणार आहे हे ३ महिने आधीपासूनच आपल्याला माहीत होते. ते नाव वाचून मी तेव्हाच मित्रांना म्हणालो होतो की ह्यावर ही वाद उठणार. मग त्या मराठी महासंघाला ३ महिने काहीच माहीत नव्हते का? आधीच का नाही तक्रार आली?
आणि सरकारचे तर काय म्हणावे? नेहमीप्रमाणे बघ्याचीच भूमिका घेणार. कोणी कायदा हातात घेतला तर आम्ही पाहून घेऊ म्हणतात. त्याआधीच का नाही काही करत?
असो, आपण तर काय सिनेमा पहायला मिळेल त्यानंतरच ठरवू काय चांगले आणि काय वाईट ते.

5 प्रतिक्रिया:
"शिक्षणाच्या आयचा घो" नावावरून वाद उठेल ते ठीक आहे पण झेंडा चित्रपटाचे प्रदर्शन उगीचच पुढे ढकललं गेलं. आता सदा मालवणकराचे पात्र म्हणजे काही धुतल्या तांदळाचे उदाहरण नाही की ज्याला चित्रपटात वाईट दाखवलं गेलय. जर तुम्हाला आपली चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रतिमा बघायला आवडत नसेल तर प्रदर्शन रोखाण्यापेक्षा आपली प्रतिमा बदला. मोठे आले स्वाभिमानी.
सगळी दिखाउगिरी आहे असं मला तरी वाटतं. प्रसिद्धी मिळाल्या शिवाय चित्रपट चालत नाही. शेवटी बदनाम हूए तो क्या नाम तो हूआ
@सिद्धार्थ: मलाही तेच वाटले होते की त्यांना प्रसिद्धीचीच हाव दिसते, माध्यमांसमोर आपले नाव असले पाहिजे.
@हेरंब: सहमत आहे. कोणीही ते करत असेल, पण सध्या तरी आक्षेप घेणारे स्वत:ची प्रतिमा बिघडवून घेत आहेत असे दिसते.
खर्या ’सेंसर’ ची भिती कमी असेल पण हे राजकीय सेंसर अजब कारभाराचे असते...
@Anand: खरंय तुमचे म्हणणे. सेंसोर बोर्डाचा धसका फक्त सिने-निर्मात्यांना होता. ह्या नवीन सेंसॉरशिपचा धसका प्रेक्षकांनाही आहे. कारण वादग्रस्त सिनेमा पहायला गेलो तर उगाच त्यांच्याकडून नुकसान व्हायची भीती. आजकाल काही सांगता येत नाही.
टिप्पणी पोस्ट करा