असेच विचार मनात येत असताना, मराठीब्लॉग्स.नेट वर त्याच संबंधी लेख वाचले. त्यातील काही.
- राजू परूळेकर, सचिन तेंडुलकर आणि मराठी माणूस (sudhirnikharge)
- अल्केमिस्ट्री (प्रवीण)
- परूळेकरांना पत्र (sudhirnikharge)
- अल्केमिस्ट् उवाच.. बदनाम हुए तो क्या नाम तो हुआ !! (हेरंब ओक)
फक्त मला आणखी एक प्रश्न विचारावासा वाटतो.
परूळेकरांनी इतर दाखले देऊन सचिनने काय केले हा प्रश्न केलाय. पण त्यांनी स्वत:च्या अल्केमिस्ट्री ह्या लेखात फक्त राजकीय नेत्यांबद्दल (व एखाद दोन इतर लोक) लिहिलेय. दाखले दिलेल्या लोकांबद्दल त्यांनी स्वतः लिहिले असते तर आम्हालाही विचार करता आला असता.
पण त्यांनी माध्यमांच्या लोकांना ज्याप्रकारे दोष दिलेत त्याप्रमाणे स्वत:ही प्रसिद्ध नेत्यांवर लिहिण्यात पाने खर्च केलीत. जे इतर भरपूर ठिकाणी वाचायला मिळते त्यांच्याबद्दलच लिहून त्यांनी महाराष्ट्राकरीता काय केले? :)
2 प्रतिक्रिया:
नमस्कार देवदत्त, माझ्या blog वरील पोस्टच्या उल्लेखाबद्दल धन्यवाद.. मला स्वतःला प्रवीण यांचा अल्केमिस्ट्री खूप आवडला. आमच्या दोघांच्याही पोस्ट्स मधले बरेच मुद्दे सारखे आहेत. परंतु प्रवीण यांचा लेख खूप च मुद्देसूद आणि आखीव झाला आहे आणि माझा बराच विस्कळीत. :) .. परुळेकरांची अल्केमिस्त्री वाचल्यावर डोक फिरलं आणि तिरीमिरीतच त्यांना इ-पत्र पाठवलं. त्यामुळे असेल कदाचित :) .. असो.. उल्लेखाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद..
धन्यवाद हेरंब,
प्रवीण ह्यांचा लेख अर्थातच मुद्देसूद आहे, आणि आपल्यापेक्षा भरपूर जास्त मुद्दे मांडलेत, तरीही बहुधा तुमच्या लेखातील मुद्दे हेच लिहिताना माझ्या समोर होते, म्हणून :)
टिप्पणी पोस्ट करा