डिसेंबर १५, २००८

माझ्या नाणेपुराण आणि नोटापुराणातील ज्ञानात थोडीशी भर टाकत आज मी ठाण्यातील ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या इंग्लिश मीडियम हायस्कूलमधे दुर्मिळ नाण्यांचं प्रदर्शन पाहण्यास गेलो होतो. तिथे दिसले की आपल्या तसेच दुसर्‍या देशांतील जुनी(काही सध्याचीही) नाणीही ठेवली आहेत. कधीतरी एखाद्या किल्ल्यात किंवा राजवाड्यात...

ऑक्टोबर ०६, २००८

काल पुन्हा आईच्या खोलीत पाणी पाणी झाले. वॉशिंग मशिनचा पाण्याचा पाईप सैल झाल्याने तिथून सगळे पाणी खोलीत पसरले. बरं, मशीन बाथरूमच्या दरवाज्याजवळच आहे. तर पाणी बाथरूममध्ये जाण्यापेक्षा नेमके उलट्या दिशेला खोलीभर पसरले. काय पण ते बांधकाम. स्वयंपाकघरात मोरी तुंबली की पाणी तिकडून दिवाणखान्यापर्यंत. अरे, काय चाललंय काय? असा वैताग येतो ना... २००२ मध्ये स्वयंपाकघर आणि हॉलचे नूतनीकरणाचे काम केले, तेव्हा करणारा कंत्राटदार म्हणाला होता, 'अगदी Zero Level ठेवू....

ऑक्टोबर ०४, २००८

ही माझी स्कूटर. वेस्पा १५०. जेव्हापासूनच्या गोष्टी आठवू शकतो, आठवतात त्यापैकी ही एक. लहानपणापासून ह्यावर फूटबोर्डवर उभा राहून, मागील सीट वर बसून बाबांसोबत फिरलो. वडिलांच्या बदलीमुळे ह्या स्कूटरनेही वेगवेगळ्या शहरात संचार केला. माझ्या वडिलांना मदत केली. नागपूर-भंडारा-ठाणे-भिवंडी-अंधेरी. वडिलांनी...

सप्टेंबर २८, २००८

प्रसिद्ध गायक महेंद्र कपूर ह्यांचे काल निधन झाले. माझ्या आवडत्या गायकांपैकी एक. गेले काही वर्षे त्यांच्याबद्दल जास्त काही ऐकण्यात येत नव्हते. मध्ये कधी तरी त्यांचा एक अल्बम आला होता, पण पंजाबी गाण्यांचा. आणि नुकताच त्यांना लता मंगेशकर पुरस्कार घोषित करण्यात आला होता. त्यांची मला जास्त आवडलेली गाणी: हिंदी- तुम अगर साथ देने का वादा करो.. बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी.. दिल की ये आरजू थी कोई.. तेरे प्यार का आसरा चाहता हूं.. किसी पत्थर की मूरत...

सप्टेंबर २१, २००८

'बॉम्बब्लास्ट' सिनेमा पाहताना त्यातील एक दृष्य. बॉम्बस्फोटानंतर जखमी/मृत व्यक्तीच्या देहांकडे पाहताना रोनित रॉयला उलटी होते. माझा एक मित्र म्हणाला,"खरं तर पोलिसांना हे नको व्हायला." त्यावर दुसरा मित्र म्हणाला,"का? तो ही माणूसच आहे." आधीचे आठवत नाही पण तेव्हापासून असले काही प्रसंग पाहिले/ऐकले की पोलिसांबद्दल,डॉक्टरांबद्दल विचार मनात येतात, 'असं सारखं सारखं बघून त्यांच्या संवेदनावर फरक तर नसेल ना पडत?' 'अब तक छप्पन' किंवा तत्सम सिनेमे पाहताना माझ्या...

सप्टेंबर ११, २००८

नुकत्याच सुरू झालेल्या ’कलर्स’ वाहिनीवर नवीन चित्रपट दाखविण्याची जाहिरात बघितली (त्यावर एक-दोन चित्रपटही पाहिले), तेव्हा खूप दिवसांपासून मनात असलेले विचार पुन्हा समोर आले. हिंदी चित्रपट दाखविल्याशिवाय कोणतीही वाहिनी बहुधा तग धरू शकत नाही. जसे आम्ही वसतीगृहात राहत असताना एक मित्र खानावळीबद्दल बोलला होता की, बटाटे नसते तर ह्या मेस वाल्यांचे काय झाले असते? ;) आपल्याला ही सवय दूरदर्शनवर (वाहिनी बरं का, आधी ती एकच वाहिनी होती) हिंदी सिनेमे दाखवत होते...

ऑगस्ट २७, २००८

'फूंक' चित्रपट थियेटर मध्ये एकट्याने बघणार्‍याला रामगोपाल वर्माने ५ लाख रूपये देण्याचे आव्हान दिले होते असे वाचण्यात आले. अशीच एक पैज एका इंग्रजी सिनेमाकरीता ठेवली होती असे लहानपणी ऐकले होते. तो कोणता सिनेमा त्याचे नाव आठवत नाही. त्यावेळीही सिनेमागृहाच्या बाहेर एक ऍम्बुलन्स ठेवली होती असेही सांगण्यात आले होते. आणखी एक चित्रपट, बहुधा 'The Exorcist'. ह्या सिनेमाबद्दलही असे ऐकले होते की हा सिनेमा बनवून झाल्यानंतर पाहताना ९ जण भीतीने मेलेत. त्यामुळे...

ऑगस्ट २५, २००८

निबंध लिहा: माझा आवडता प्राणी, शाळेचे आत्मचरित्र, वाचनाचे महत्व. शाळेत असा प्रश्न असायचा सहामाही व वार्षिक परिक्षेला. किंवा मग पत्रलेखन. गुण १० ते १५. त्यावेळेला नेमके काय लिहावे ते माहित नसायचेच. मित्रांसोबत जास्त वेळ शाळेतील अभ्यासाचेच जास्त बोलणे व्हायचे किंवा मग खेळ , दूरदर्शनवरील कार्यक्रम, सिनेमे ह्यांच्यावर चर्चा व्हायची. पण त्यावर लिहायला कधी कोणी नाही सांगितले. त्यामुळे निबंध लिहायला मदत व्हायची निबंधावरील पुस्तकाची किंवा मार्गदर्शकाची(हो,...

ऑगस्ट २३, २००८

पुन्हा महावितरणाने सांगितले की पुणे, ठाणे आणि नवी मुंबईत वीज भारनियमन अटळ आहे. ह्या वर्षाच्या सुरूवातीला त्यांनी सांगितले होते की 'पुणे पॅटर्न' मध्ये युनिटमागे जास्त पैसे दिल्यास पुणेकरांना भारनियमन सोसावे लागणार नाही. त्याला बहुतेकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे पुण्यात जास्त पैसे आकारून नियमित वीज देणे सुरू झाले(नक्की ना? चू. भू. द्या. घ्या.) हाच 'पॅटर्न' मग त्यांनी ठाणे, नवी मुंबईकरीता वापरला. त्यामुळे अखंडित वीज पुरवठा मिळेल असे वाटून जास्त कोणी...

ऑगस्ट ०६, २००८

रात्री घरी परत येत असताना घराजवळील एका रस्त्यावर एक लहान मुलगा रस्ता पार करत मस्त लकेर घ्यावी तसा आव आणून गात होता, "बिना दूध की चाय बना लो, शक्कर मत डालो... सबसे आगे होंगे हिंदुस्तानी" पुढे आणखी काही म्हणून मी ऐकत राहिलो पण काही ऐकायला नाही आले कारण तो मुलगा रस्ता ओलांडून पलिकडे गेला होता व मी ही पुढे निघून आलो होतो. मनात विचार आला की लहान मुले काय काय गात असतात. बहुधा ९५-९६ मध्ये माझा एक भाचा गात होता, "तू तू तू तू तारा, चलते का नऊ ते बारा" पुढे...

जुलै ३१, २००८

मी आतापर्यंत ऐकलेल्या हिंदी सिनेमाच्या नावांत ’मां’ हे सर्वांत लहान व ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ हे सर्वांत मोठे नाव आहे. यात ’मां’ नावाचे ३ सिनेमे येऊन गेले. ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ एकच( ह्या नावाचा सिनेमा पुन्हा बनविणार कोण आणि पाहणार कोण आज काल ;) ) नंतरही मोठ्या नावाचे सिनेमे येऊन गेले उदा. ’पाप को जलाकर राख कर दूंगा’, ’जुल्म को जला दुंगा’ वगैरे. ते काही जास्त चालले नाहीत. पण नंतर ’हम आपके हैं कौन’, ’दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे...

जुलै २७, २००८

शाहरूख खान शिक्षक असलेल्या ’क्या आप पांचवी पास से तेज हैं’ ची आज सांगता झाली. त्याची सुरूवात आणि शेवट दोन्ही, नाही हो, एकंदरीत पूर्ण कार्यक्रम मला तरी आवडला. सुरूवात ह्यासाठी की त्यांनी केलेला प्रचार किंवा जाहिरातबाजी, आणि मुख्यत्वे काहीतरी वेगळा व माहितीदर्शक कार्यक्रम.(नाहीतर काय, त्यातील किती प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत होती?) ह्या कार्यक्रमाआधी दररोज रात्री आठ वाजता शाळेची घंटी वाजवायचे. तसेच बहुतेक काय सर्वच कार्यक्रमाच्या मध्ये त्याची...

जुलै २१, २००८

गेले १५-२० दिवस चर्चेत असलेल्या श्री. मनमोहन सिंग ह्यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाची कृती आज सुरू झाली. आत्ता रात्रीचे ८ वाजत आले आहेत तरीही बहुतेक सर्व (?) पक्षाचे खासदार संसदेत उपस्थित राहून चर्चा करीत आहेत. जेव्हा स्वत:च्या भवितव्याची चिंता ग्रासू लागली तेव्हा हे सर्व लोक जमा आहेत. मग तसाच देशाच्या भवितव्याचा विचार करून जर दररोज त्यांची उपस्थिती राहिली व काही चांगले कार्य केले तर ह्या सर्व ठरावांची गरजच भासणार नाही असे वाटते. पण बहुधा आज...

जुलै १४, २००८

"अरे भैय्या, दुसरी नोट दो. यह नही चलेगी." "चल जायेगी साब, नही चली तो बाद में मुझे वापस कर देना." मुंबईच काय, भारतातील बहुतेक शहरात चालणारा संवाद. कारण काय तर नोट बहुतेक वेळा थोडी फाटलेली असते, किंवा जुनी झालेली असते. आणि काय करणार? आपल्यालाच धास्ती असते की ती नोट जर दुसर्‍या कोणी घेतली नाही तर तेवढ्या रूपयांचा फटका बसायचा. ह्या आणि अशा आणखी इतर प्रकारात आपल्याला नोटांचे हाताळणे का चांगले ठेवावे हे कळते :) काही वर्षांपूर्वी नागपूरात तर पूर्णपणे...

जुलै ०८, २००८

सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांची पौराणिक कथांवर मालिका दाखविण्याची स्पर्धा सुरू आहे असे दिसते. साईबाबा, वैष्णोदेवी, हनुमान, रामायण ह्या मालिका (आणि इतर भरपूर) सुरू आहेत. पुर्वी ह्या सर्व मालिकांची वेळ रविवार सकाळ असायची. त्याला पहिले कारण म्हणजे रविवारी सर्वांना सुट्टी असते आणि सकाळपासून लोक टीव्ही बघत असतात. तसेच दुसरे कारण म्हणजे आधी दाखविलेल्या रामायण, महाभारत, श्रीकृष्ण ह्या मालिकांचे यश असेल. असो, सध्या तरी त्या मालिका इतरवेळीही पुन्हा दाखविणे...

मे १९, २००८

नाही, हे कुसुमाग्रजांच्या लिखाणाचे किंवा त्यांच्या कवितांचे अवलोकन नाही, तर त्यांच्या कवितांवर जो एक संच काढला आहे त्याचे अवलोकन आहे. महाराष्ट्र टाईम्स व टाईम्स म्युझिक ह्यांनी सादर केलेला "’वि.वा’ कुसुमाग्रज" हा संच मी मागवला. विचार केला एरवी कविता वाचणे जास्त होत नाही. गाणी/कथा ऐकण्याची सवय आहे तर ह्याचा फायदा करून घ्यावा. नोंदणी करून ठेवली. ३० एप्रिलला मला दिल्लीहून फोन आला तुमची ऑर्डर नक्की करण्याकरीता हा फोन आहे. तुम्हाला २५०+२५ रू.द्यावे...

मे १४, २००८

२००५ च्या दिवाळीच्या नंतरचे दिवस. दक्षिण रेल्वेचा एक डबा. आमच्या समोर दरवाज्यापासून तिसर्‍या कंपार्टमेंट मध्ये ते ४ मित्र पत्ते कुटत, गाणी गात प्रवासाची मजा घेत चालले होते. बदाम सात, रमी, झब्बू जे आठवतील ते पत्त्यांचे खेळ चालले होते. आजूबाजूचे ही ३/४ जण त्यांना सामिल झाले. मस्त गट बनला होता त्यांचा. कार्यालयातील गंमतीजमती, विनोद सांगण्यात जो तो वरचढ व्हायच्या प्रयत्नात. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर उद्या पुन्हा कामावर रूजू व्हायचे म्हणून थोडा...

मे ११, २००८

नुकतेच मटामध्ये भारत सरकारच्या टांकसाळीची जाहिरात पाहिली की, "पहिल्या स्वातंत्र्य युद्धाची १५० वर्षे" च्या स्मृतीत १०० रू ची नाणी इच्छुकांना विकण्यासाठी नोंदणी सुरू आहे. त्यांच्या संकेतस्थळावरही अशीच काही १०० रुपयांची नाणी उपलब्ध आहेत. अर्थात ही नाणी चलनात नसतील हे ही त्यांनी नमूद केले आहे. मी ती नाणी घेण्याची शक्यता नाही. पण ते वाचून मी पाहिलेली वेगवेगळी नाणी व त्यांचे वापर डोळ्यासमोर येऊन गेले. नुकतेच चलनात आलेले नवीन नाणे म्हणजे ५ रू चे स्टीलचे...

एप्रिल २०, २००८

मला राजकारणातील जास्त कळत नाही. पण एक सामान्य नागरिक म्हणून जे काही माहीत आहे त्यावरून पुढील विवेचन..शेतकर्‍यांना भाव मिळत असताना महागाईचा बाऊ नको असे शरद पवार म्हणाले. (पहा बातमी)स्वत:ला काही करणे जमले नाही किंवा काही करायचे नसले तर अशी विधाने बाहेर निघतात का?त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शेतकर्‍याला खरंच भाव मिळत असल्याचे त्यांना दिसत आहे का? मला नाही तसे वाटत. शेतकर्‍यांना कमी भाव मिळतो. तो माल बाहेर ग्राहकापर्यंत येता येता त्याचा भाव खूप वाढतो असेच...

एप्रिल ११, २००८

गेल्या वर्षी एक चांगला विचार कुठल्याशा विपत्रातून (अर्थात ढकलपत्रातून) आला. एक माणूस आपल्या मुलीसोबत बाजारात गेलेला असतो. गर्दीत तो मुलीला म्हणतो, "तू माझे बोट किंवा हात पकडून ठेव, म्हणजे गर्दीत तू हरवणार नाहीस. माझ्या सोबतच राहशील." ह्यावर मुलगी म्हणते, "नको बाबा, त्यापेक्षा तुम्ही माझा हात पकडून ठेवा. गर्दीत माझा हात सुटू शकतो. तुम्ही पकडलेला हात नाही सुटणार." खरोखरच चांगला विचार. तेव्हाच हात धरण्यावरून मला हा विनोद आठवला, एकदा एक माणूस रस्त्यावरून...

एप्रिल ०६, २००८

ह्या आधीचे लेख इथे वाचावेत. सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये - २ खुशिया बांटने से बढती है, दुख बांटने से कम होता है. हेराफेरी मधील हे वाक्य. परेश रावल अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी ला सांगत असतो. नेहमीच्या जीवनात उपयोगी पडेल किंवा पडत आलेले असे हे. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, गोली गोली पे लिखा है मरने वाले का नाम जलजला (की झलझला?) ह्या सिनेमातील वाक्य डॅनीच्या तोंडी आहे. हा चित्रपट पहिल्यांदा...

मार्च २५, २००८

काल ऐकले होते,आज वृत्तपत्रात वाचले की, बोरिवली, घोडबंदर रोड, भांडुप, मुलुंड, घाटकोपर, नाहूर आदी परिसरातील सुमारे १०० एकर जमीन 'खासगी वनजमीन' म्हणून घोषित केली गेली आहे. त्यामुळे तिथे राहणायांच्या मनात घबराट निर्माण झाली आहे. खरेच आहे, गेले अनेक वर्षे स्वत:चे ,कर्जाचे पैसे घेऊन घर विकत घेतल्यावर ह्या निर्णयाने धक्का बसणारच.२ वर्षांपूर्वी दिल्लीमध्येही हेच झाले होते. महानगरपालिकेने रहिवाशी संकुलात (की परिसरात) दुकानांना परवानगी दिली मग न्यायालयाने...

मार्च २२, २००८

लहानपणी आम्ही ऐकलेले, गायलेले हे खेळगीत. आता त्यातील पूर्ण शब्द आठवत नाहीत. त्या जागा मी रिकाम्या ठेवल्या आहेत. कुणास आठवल्यास पूर्ण करण्यास मदत करावी. (नवीन काही असल्यासही चालेल. :) ) दुपारचा वाजला एक आईने केला केक केक खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला दुपारचे वाजले दोन बाबांचा आला फोन फोनवर बोलण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला दुपारचे वाजले तीन ताईची हरवली पिन पिन शोधण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला दुपारचे वाजले चार _ _ _...

जानेवारी १४, २००८

काही वर्षांपूर्वी टाटा मोटर्सने इंडिका बाजारात आणली. ती गाडी मारूती ८००, सँट्रो प्रमाणे तुफान चालली की नाही हे आठवत नाही. परंतु इंडिकाही भरपूर लोकांच्या पसंतीस पडली. मी काही जास्त गाड्या अनुभवल्या आहेत असे नाही परंतु मलाही इंडिकाच आवडतेय. कोणती गाडी घेणार विचारले तर मी प्रथम इंडिकाच म्हणतो. त्याच्या कामगिरीचा एक पैलू असाही आहे, की इंडीकाने जी इंडीकॅब आणली तिचा भाड्याने गाडी देणारे, आजकालच्या कंपन्यांमध्ये असलेली कॅब सर्विस, टॅक्सी सर्विस ह्यांनी...

जानेवारी ०८, २००८

वरील चित्रात जगभरातील व्यक्तींची चित्रे रेखाटली आहेत. किती ओळखता येतात ते पाहू?मी ओळखलेले:महात्मा गांधीचार्ली चॅपलीनबीथोवनहिटलरसद्दाम हुसैनबिल क्लिंटनब्रुसलीअल्बर्ट आईन्स्टाईनअब्राहम लिंकनयासर अराफातमेरीलीन मॉन्ऱोजॉर्ज बुशआणखी जमल्यास लिहीन पुढे...(चित्र आंतरजालावर कुठेतरी मिळाल...

इंडिब्लॉगर गुण

maajhianudini.blogspot.com
47/100

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

133,706

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया


On Sep 23 Anonymous commented on blog post_09
Kuf cha tras aahe... Kuf mile khokla hoto...mg to lvkr jat nahi .ky karave

On Jul 25 Anonymous commented on blog post_09
मला पण असाच त्रास होत असे मी पण खूप उपचार करून पाहिले पण थोडे दिवसच त्रास कमी होत असे नंतर मी...(more)

On May 13 Announced Marathi Images commented on blog post_25
Very nice

On Jul 23 Sachin Kinare commented on blog post
छान, खूप दिवसांनी शोधत होतो, ह्या ब्लॉग मूळे लगेच मिळाले

On Jul 02 Anonymous commented on blog post
Chhan

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter