ही माझी स्कूटर. वेस्पा १५०.
जेव्हापासूनच्या गोष्टी आठवू शकतो, आठवतात त्यापैकी ही एक. लहानपणापासून ह्यावर फूटबोर्डवर उभा राहून, मागील सीट वर बसून बाबांसोबत फिरलो.
वडिलांच्या बदलीमुळे ह्या स्कूटरनेही वेगवेगळ्या शहरात संचार केला. माझ्या वडिलांना मदत केली. नागपूर-भंडारा-ठाणे-भिवंडी-अंधेरी. वडिलांनी मस्त वापर केला गाडीचा. पण त्यांच्या निधनानंतर बंदच पडून होती. नंतर एक वर्षांनी आम्ही ती चालण्याइतपत नीट करून घेतली.
१९९५ मध्ये मी ह्या स्कूटरवर पहिल्यांदा चालवण्याकरीता बसलो. त्यावेळी अंधेरीत राहताना तेथील मित्रांनी दुचाकी शिकण्यास मदत केली ती ह्याच स्कूटरवर. त्याआधी एका मित्राने त्याच्या कायनेटीक होंडा वर एक प्रात्यक्षिक दिले होते. पण ते जुजबी. फक्त एक दोन वेळा. बाकी सर्व ह्याच स्कूटरवर. तेव्हाच अभियांत्रिकीत प्रवेश घेतल्याने मग घरापासून दूर रहावे लागले होते. त्यामुळे नीट सराव नाही झाला. पण जेव्हा कधी घरी येईल तेव्हा स्कूटर बाहेर काढून शिकणे चालूच होते. १९९६ मध्ये आम्ही रहायला आलो ठाण्याला. पण तेव्हा ही सोबत आणली नव्हती. शेजारीच राहणार्या एका मित्राला आईने ह्या स्कूटरला रंगरंगोटी करावयास त्याच्या ओळखीच्या मेकॅनिककडे द्यायला सांगितले होते. त्यानंतर ती त्याच्याच कडे होती. शेवटी १९९७ मध्ये त्याच्याकडून आणली मस्त रंगवून डागडुजी केलेली गाडी. तोपर्यंत मी ही चालविणे शिकलो होतोच. मग शिकाऊ परवाना घेऊन तयारी चालू केली. परंतु पक्का परवाना काढायला जायला वेळच नाही मिळाला. त्यामुळे पहिला परवाना तर तसाच वाया गेला. मग दुसरा शिकाऊ परवाना काढला तेव्हा कार चालविणेही शिकत होतोच. मग दोन्ही पक्के परवाने एकत्रच घेतले. मग तर काय काहीही काम असले की स्कूटरवरूनच बाहेर जाणे होत होते. मित्राकडे, बाजारात, नुसते फिरणे :D
कॉलेजला होतो तेव्हा विचार केला होता की शेवटच्या वर्षी स्कूटर घेउन जाईन तिकडे. घरून परवानगीही घ्यायची होती. पण स्कूटरच्या कागदांचा गोंधळ होता. आणि ही गाडी नागपूरवरून इतर ठिकाणी नेल्यानंतर त्याची नोंदणीच नव्हती केली. मग १९९९ मध्ये माझ्या आतेभावाकडून नागपूरवरून त्या कागदपत्राची पूर्तता करून गाडी माझ्या नावावर करून घेतली व ती कागदे इकडे आल्यावर ठाण्यातील RTO मध्ये काय ती फी भरून सर्व गोंधळ संपविला. नंतर ह्या स्कूटरची अद्ययावत नोंदणी वही परत घेताना मी विचारले, ’आणखी काही करायचे आहे का?’ तेव्हा मला उत्तर मिळाले, ’आता इकडे यायची गरज नाही.’ मी ऐकले होते की काही तरी One Time Tax असतो गाड्यांचा. नोंदणी वहीत पाहिले तर तो ही भरला होता. त्यामुळे मग जास्त काही विचार नाही केला आणि बिनधास्त स्कूटरवर हुंदडणे चालू झाले. एवढे करूनही कॉलेजकडे गाडी नेणे जमले नाही. :(
तेव्हा तरी ठाण्यातच गाडी चालविणे होत होते. मग हळू हळू ठाण्याच्या परिघाच्या बाहेरही नेणे चालू झाले. इकडे मुलुंड, मग पवईच्या आयआयटी कॉलेजपर्यंत, तिकडे बेलापूरपर्यंत. नंतर कार्यालयात जायला लागल्यापासून दररोज सकाळी स्टेशन पर्यंत स्कूटरवर जाणे. तिकडे गाडी लावून मग लोकलने दादरला ऑफिस. संध्याकाळी परत आल्यानंतर बस-रिक्षाची कटकट नव्हती. मग एक दोन वेळा दादरपर्यंतही ही स्कूटर नेली.
तुम्ही म्हणाल, आता स्कूटरच आहे ती. एवढ्या ठिकाणांपर्यंत नेली तर एवढे काय? अहो, ह्यात मुद्दा आहे की ह्या गाडीकडे पाहून लोकांचा पहिला प्रश्न असतो, 'केव्हाची ही गाडी?' माझे उत्तर असते, '१९७१'. माझ्यापेक्षाही वयाने भरपूर मोठी आहे ही स्कूटर. त्यामुळेच कधीही कुठे ती न्यायची म्हटले तर भरपूर लोकांना प्रश्न पडतो की ही गाडी जाईल का? बाकी गाडीमध्ये काही अडचण नाही हो. (काय ते 'टचवूड' म्हणतात ते ही करतो आता ;) ) मध्ये २/३ वेळा रस्त्यातच बंद पडली होती तेव्हा तिकडे जवळच असलेल्या मेकॅनिककडे ठेवून मग घरी आलो होतो. पण अर्थात त्यात चुकी माझीच होती. नीट काळजी नाही घेतली तर असे त्रास होणारच. माझे वडील तर दर रविवारी स्कूटर उघडून साफ करायचे. पण मला काही ते जमत नाही. तरीही मेकॅनिकला सांगून दर ३/४ महिन्यांनी डागडुजी करून घेतो. बाकी वडील वापरायचे त्यापेक्षा मी गाडीची वाटच लावली आहे.:(
तर ह्याच सर्व परिस्थितीत म्हणजे लोक गाडीच्या चालण्यावरून शंका घेत असताना, मी गेल्या वर्षी ही स्कूटर पुण्याला नेण्याचे ठरविले. कागदपत्रांची पूर्तता बरोबर आहे की नाही हे कोणाला नीट माहित असेल असा प्रश्न आल्याने मग मी थेट रस्त्यावर चौकात उभे असलेल्या वाहतूक पोलिसांनाच त्याबद्दल विचारले. ते म्हणाले, RC बुक, PUC व विमा एवढेच पाहिजे, आणि काय तो कर भरलेला असला पाहिजे. महाराष्ट्रातच गाडी असल्याने ’ना हरकत प्रमाणपत्रा’ची भानगड नाही. मित्रांसोबत ह्याबाबत बोललो की मी नेतोय गाडी पुण्याला, ते ही स्वत: चालवत. तेव्हा एक मित्र बोललाही की 'स्वत: नको नेऊस म्हणून. घाटात पहिल्या गेअर मध्ये ही त्रास होऊ शकतो.' पण मी जिद्दीला पेटलो तेव्हा त्यानेच रस्त्याची नीट माहिती दिली व सांगितले की मध्ये गाडी घाटात चढली नाही तर काही Towing वाले असतात त्यांना सांगायचे, ते गाडी उचलून आणून देतील. त्याच्या दुसर्या दिवशी मी सकाळी ७ ते ११ असा ४ तास प्रवास करत माझी ही स्कूटर पुण्य़ापर्यंत पोहोचविली. घाटात पहिल्याच काय दुसर्या गेअर मध्येही नीट चालली. तेव्हा मग लक्षात आले, ह्या गाडी अजूनही पुढे मला साथ देईल. मग एक वर्ष पुण्याचीही रपेट ह्या स्कूटरवरून केली. तिथेही मित्रांचे म्हणणे होतेच, 'किती जुनी ही गाडी' :)
आता गेले २/३ महिने आणखी एक प्रश्न समोर आला, १५ वर्षांवरील गाडीची नोंदणी दर ५ वर्षानी पुन्हा करावी लागते. ह्याबाबत मला माहित नव्हते. २ आठवड्यांपुर्वी गाडीचे सर्व कागदपत्रे पुन्हा नीट जमा केली व क्षेत्रिय वाहतूक कार्यालयात जाऊन त्यांच्यासमोर कागदपत्रे ठेवली व विचारले की साहेब, ह्यात काय काय करावे लागेल. तेव्हा त्यांनी सांगितले की 'काही नाही. गाडी अधिकार्याकडून तपासून घ्या व १६० रू भरून पुनर्नोंदणी करून घ्या'. दुपारी त्यांनी सांगितलेल्या दुसर्या कार्यालयात गेलो. तेव्हा कळले की २ वाजता अर्ज व फी भरणे बंद होते. मला शनिवार शिवाय बाकी दिवस वेळ नसल्याने पुन्हा २ आठवडे थांबणे आले. दरम्यान कळले की गाडीची स्थितीही चांगली पाहिजे. त्यामुळे मग काल मेकॅनिककडे घेउन गेलो. त्याला सांगितले की 'असे असे आहे, बघ काही करायचे बाकी आहे का?' त्याकडून दिव्यांची डागडुजी करून घेतली. तो म्हणाला की 'बहुधा १६० रूपयांमध्ये होणार नाही. ७००/७५० रू जातील'. मी म्हटले, 'जेवढे आहेत तेवढे, बघुया.' :) सकाळी अर्जात वाचले की Chassis क्रमांक ही ते तपासतात. आता वाहन नोंदणी वहीत त्याची नोंद होती त्यामुळे अर्जात लिहायला त्रास नाही झाला. पण अधिकारी ते तपासणार म्हणजे? त्या मेकॅनिककडे गेलो. तो नव्हता. त्याच्याच दुकानातील दुसर्या व्यक्तीने सांगितले की एवढ्या जुन्या गाडीचा पत्रा सडल्याने तो क्रमांक आतापर्यत निघूनही गेला असेल. म्हटले आता आली का पंचाईत? शेवटी काय निकाल लागायचा तो लागू दे म्हणून गाडी घेउन गेलो. तिकडे अधिकार्यांकडे सांगायला गेलो की ,'साहेब, गाडीच्या नोंदणीचे नूतनीकरण करायचे आहे'. त्यांनी पहिला प्रश्न विचारला, 'chassis क्रमांक दिसतो का?' :( म्हणालो, 'नक्की माहित नाही.' ते म्हणाले, 'आधी ते पाहून ये'. गाडीकडे गेलो. शोधायचा प्रयत्न केला. त्या माझ्या ओळखीच्या मेकॅनिकला फोन केला. तो म्हणाला की, 'डीकीच्या खाली साफ करून बघ, तिथे असेल'. नाही मिळाला. तेव्हा मग तिकडच्या एका एजंटला मदत मागितली. त्याने सांगितले की 'हा इथे आहे, नीट साफ केला की दिसेल'. झाले काम. पुन्हा गेलो. अधिकारी म्हणाले फी भरून ये. फी भरली. एका अधिकार्याने पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे ३०+१००= १३० व दंडाचे १००. कारण १९९९ नंतर २००४ मध्ये मी नूतनीकरण करायचे होते ते नाही केले. ह्या गाडी तपासणार्या अधिकार्यांकडे गेलो ते म्हणाले, १३० नाही १६० रू. पुन्हा जादा ३० रू भरून आलो. मग पाहिले तर चेसिस क्रमांकाचा पेन्सिलीने ठसा अर्जावर उमटवायचा आहे. तो उमटविला. शेवटी त्यांनी पूर्ण तपासून स्कूटरच्या नोंदणीच्या नूतनीकरणावर सही व शिक्का मारला. हुश्श्श्श्श. आता पाच वर्षे चिंता नाही. फक्त गाडी नीट ठेवणे,चालविणे व PUC दर सहा महिन्यांनी करत रहायचे.
अजूनही भरपूर लोक, मित्र म्हणत असतात, ’विकून टाक ही स्कूटर आता.’ पण मी म्हणतो, ’चालू आहे नीट, २५ ते ३० चा एवरेज देते आणि मला कुठे लांब न्यायची आहे?’ आणि आज जे गाडीचे नूतनीकरण झाले त्यावरून तर मी हाच विचार करतोय जोपर्यंत ही माझी स्कूटर नीट चालतेय तोपर्यंत तरी चालवत रहायचे.
चल मेरी वेस्पा :)

0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा