मार्च २३, २०१२


त्या अनोळखी झाडाला चैत्रपालवी फुटली होती. कुणीही आपल्याकडे पाहत नाही हे ठाऊक असूनही चैत्र आल्याची वार्ता सांगत ते झाड उभं होतं. माझ्याखेरीज त्या उभ्या आणि वाहत्या गर्दीतली एकही मान उंचावली नव्हती. तरीही हे झाड नवी पालवी दाखवत सांगत होतं, अरे, नवं वर्ष म्हणजे नवी पालवी! नवी पालवी म्हणजे नव्या आशा. नव्या वर्षाचं स्वागत म्हणजे नव्या आशांचं स्वागत. साखर स्वस्त होणार, मुलांना हव्या त्या शाळेत सक्तीच्या देणगीशिवाय प्रवेश मिळणार, आपल्या चाळीतील सगळ्या उपवर मुलींची लग्नं बिनहुंड्यात जमणार, वरळी सी फेसवर फ्लॅट देणारे चिक्कार सासरे भेटणार; अशा वैयक्तिक आशांपासून ते सत्तेवरच्या पक्षाचं राज्य कोसळून आपल्या पक्षाचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही; ह्या पराभूत पक्षांना युगानुयुगं पडणाऱ्या चिरंजीव भ्रमाचं स्वागत. आजचा दिवस हा असल्या नाना प्रकारच्या स्वप्नांच्या स्वागताचा आहे. नव्या वर्षाचं नवंपण ह्या असल्या जुन्या गळून गेलेल्या पानांच्या जागी नवी पालवी फुटणाऱ्या दृढ विश्वासात आहे. मनाच्या काचेवर गेल्या वर्षातल्या निराशांची धरलेली काजळी नव्या वर्षाच्या पाडव्याच्या दिवशी पुसून टाकली पाहिजे. दिवस दिवसांसारखेच असतात, पण एकाच स्त्रीनं आज हे नेसावं, उद्या ते नेसावं, आज ही फुलं माळावीत, उद्या ती फुलं माळावीत आणि कालच्यापेक्षा आज आपलं आपल्यालाच निराळं वाटून घ्यावं; तसंच दिवसांनाही आज पाडवा म्हणून नटवावं, उद्या दसरा म्हणून, परवा दिवाळी म्हणून. आपण आपल्या त्याच खोलीतली खाट एकदा इकडे आणि एकदा तिकडे ठेवून खोली निराळी करतो, तसं तेचतेच दिवस निराळे करणं आपल्या हातात आहे. फक्त झाडांना फुटते, तशी नवी पालवी  मनाला फुटली पाहिजे.
- गाठोडं (पु. ल. देशपांडे)

सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Related Posts:

  • गुरुदेव? मांस, मछली अण्डा छोडो, शाकाहार से नाता जोडो - जय गुरूदेवदररोज बसमधून जाताना पूर्व दृतगती महामार्गावरून अंधेरी-पवईकडे वळल्यावर भिंती रंगवलेल्या दिसतात अशाप्रकारच्या मजकुरांनी. जवळपास सगळ्याच भिंतीवर हा मजकूर आहे. … Read More
  • अनधिकृत बांधकाम, बंद आणि प्रश्न कडकडीत ठाणे बंदला हिंसक वळण अनधिकृत बांधकाम कारवाई विरोधात ठाणे बंदठाणेकर वेठीला! शिळफाट्याला इमारत कोसळल्यानंतर अनधिकृत असलेल्या इमारतींवर कारवाई करण्याचे ठाणे महानगर पालिकेने ठरविले. त्याला सुरूवातीला राष्ट्रवादी काँग्र… Read More
  • (असेच काहीतरी) सारेगम ते X Factor सारेगम, अंताक्षरी सारखे सुंदर कार्यक्रम कधी काळी चालू होते. (आधीचे आठवत नाहीत ;) ) नंतर आले इंडियन आयडॉल. इंडियन आयडॉलचा पहिला भाग थोडासा बघितला होता. चांगले गायक येत होते. नंतर अनु मलिक, फराह खान आणि सोनू निगम यांनी … Read More
  • घरच्या घरी 3D नाही, यूट्युब वर उपलब्ध असलेल्या ३डी चित्रफीती बनविण्याच्या कृतीबद्दल म्हणणे नाही हे. तर घरी बसून त्रिमिती (3D) चित्रपटाचा आनंद घेता येईल त्याबद्दल. :) हो, आणि महागडा 3D दूरदर्शन संच ही घ्यायची गरज नाही. त्रिमिती चित्रपट प… Read More
  • अनुभव पासपोर्ट सेवा केंद्रातील गेल्या वर्षी मा़झ्या पारपत्राचे  (पासपोर्ट हो) नवीनीकरण केले. ह्याआधी माझे व घरातील इतरांचे पासपोर्ट बनविले तेव्हा अर्ज भरून थेट पासपोर्ट कार्यालयात जमा केला होता. पण गेल्यावर्षी तिथे थेट जाण्याआधी त्यांच्या संकेत… Read More

2 प्रतिक्रिया:

तृप्ती म्हणाले...

अगदी समर्पक उतारा आहे :) लक्षात ठेवून आजच्या दिवशी पोस्ट केल्याबद्दल तुला धन्यवाद. नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा !!!

देवदत्त म्हणाले...

:)
अगदी वेळेवर हे पुस्तक हातात आले असे म्हणता येईल. वाचतानाच ठरवले होते की हा उतारा ब्लॉग वर टाकायचा.

इंडिब्लॉगर गुण

maajhianudini.blogspot.com
47/100

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

134,510

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया


On Sep 23 Anonymous commented on blog post_09
Kuf cha tras aahe... Kuf mile khokla hoto...mg to lvkr jat nahi .ky karave

On Jul 25 Anonymous commented on blog post_09
मला पण असाच त्रास होत असे मी पण खूप उपचार करून पाहिले पण थोडे दिवसच त्रास कमी होत असे नंतर मी...(more)

On May 13 Announced Marathi Images commented on blog post_25
Very nice

On Jul 23 Sachin Kinare commented on blog post
छान, खूप दिवसांनी शोधत होतो, ह्या ब्लॉग मूळे लगेच मिळाले

On Jul 02 Anonymous commented on blog post
Chhan

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter