"एक लहान मुलगा. आई सांगते, 'आज खेळणे बंद'. तो मुलगा दु:खी होऊन खिडकीबाहेर मित्रांना खेळताना पाहतो. हळूच एक वस्तू उचलून घराच्या बाहेर जातो. सर्वांपासून दूर जाऊन वडिलांना फोन लावतो. आणि सांगतो की, 'आई मला रागावली तुम्ही तिला रागवा.' ......."
ही जाहिरात बहुतेकांनी पाहिली असेलच. नसेल त्यांनी इथे पहावी.
इतक्या वर्षांत पाहिलेल्या लहान मुलांच्या जाहिरातींपैकी ही मला सर्वात जास्त आवडली. त्या लहान मुलाचा निरागस चेहरा, मित्रांना खेळताना पाहून चेहर्यावरचे दु:खी भाव, हळूच लपून बाहेर जाताना घेतलेली काळजी, तसेच आईने खेळायला जायची परवानगी दिल्यानंतर आईला बाबा रागावल्याचा वाटलेला आनंद आणि आपण केलेला फोन उपयोगी पडला ह्याचे आश्चर्य. सर्व वेगवेगळे भाव मला खूप आवडले. अरे हो, त्याचे पार्श्वसंगीतही छान आहे.
आणि सर्वात शेवटी सूत्रधाराचे वाक्य, 'आज एक विश्वास आहे की आपल्या लोकांपासून आपण दूर नाही.' जाहिरातीतून दाखवलेला मुलाचा विश्वास हेच सांगतो.
(पुढील वाक्य एअरटेलच्या नेटवर्क बद्दल सांगते, तो विश्वास कितपत खरा आहे तो वेगळ्या वादाचा विषय आहे ;) )
अर्थात एअरटेलच्या इतर जाहिराती ही चांगल्या होत्या. तसेच मुलांच्या इतर चांगल्या जाहिरातीही भरपूर आहेत. पण मला ही जाहिरात त्यातील आशय आणि त्या मुलामुळेच जास्त आवडली.

5 प्रतिक्रिया:
वा! काय झक्कास अॅड आहे... वा! मस्तच!
- भुंगा
Ya its true that advertisement is nice...
and you also not happy about network...
मलाही आवडते
ho, hi jahirat kharach khup chhan aahe. :)
to mulga vadilankade sangato ki "aai la ragava" ani phone thevato, tevhache expressions tar ekdumach mast aahet!
- Prabhas
http://my.opera.com/prabhas/blog
प्रतिक्रियेबद्दल सर्वांना धन्यवाद.
@Nagesh, एअरटेल नेटवर्क बद्दल सांगायचे तर माझा सध्या स्वतःचा काही अनुभव नाही. दोन वर्षापूर्वीपर्यंत चांगला अनुभव होता.
परंतु आता इतरांकडून ऐकले आहे त्याप्रमाणे आणि ढोबळमानाने तर सर्वच नेटवर्कचे हाल सारखेच आहे, म्हणून ते वाक्य लिहिले.
तसे तर 'दिव्याखाली अंधार' ह्याचीही प्रचिती मी मोबाईल नेटवर्क बद्दल घेतली आहे. :)
टिप्पणी पोस्ट करा