डिसेंबर ०७, २०११



गेल्या आठवड्यात मित्रासोबत 'पिझ्झा हट्' मध्ये खाण्यास गेलो होतो. (साधारणत: चायनीज आणि पिझ्झा मध्ये एक अनुभवतो की खाताना पोट भरल्यासारखे वाटते पण एक दीड तासातच भूक लागते. :) ) असो. तर तिथे बिल मागितल्यावर पाहिले तर खालील प्रमाणे होते.



पदार्थः रू. ३२२.००
सेवा (१०%): रू. ३२.२०
कर (१२.५० %)  : रू १४.०९
कर (२०.० %) : रू. २८.९०
एकूण : रू. ३९७

ह्यात एकतर त्यांनी सेवा मूल्य, मूल्यवर्धित कर आणि नुसताच एक कर असे मिळून ३ प्रकारे जादा पैसे लावले होते. मी त्याबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की सरकारकडून हे कर घेण्यास सांगितले आहे. पण त्याबाबत काही सबळ माहिती त्यांच्याकडे नव्हती. अर्थात ते कमी करणार नाहीतच, आणि माझ्याकडेही जास्त वेळ नव्हता, म्हणून तेवढे पैसे देऊन निघून आलो.

प्रथमदर्शनी ते १०+१२.५+२० = ४२.५% वाटत होते. म्हटले ४०/५० टक्के छुपा अधिभार? चला वॅट काढला, तरी ३०%. म्हणजे लूटालूटच.

आता पुन्हा नीट पाहिले असता, एकूण ४२ टक्के जास्त नाहीत. २३% होतात
तरी त्यांचे गणित मला कळले नाही. कोणी समजावून सांगेल का?

१४.०९ हे ह्यात कशाचे १२.५% होतात?
२८.९० हे ह्यात कशाचे २०% होतात?
आणि सर्वात मोठे गणित..
अशा खाद्यपदार्थांवर नेमके किती टक्के कर द्यायचा असतो आणि ह्यात काय काय ग्राह्य धरावे?
(बोर्नविटा वाले शास्त्रात आणि पिझ्झा हट् वाले गणितात गोंधळवत आहेत.)

Related Posts:

  • निधर्मी राज्य म्हणजे काय? आजकाल प्रत्येक ठिकाणी निधर्मी राज्य वगैरे शब्द भरपूर वेळा ऐकायला मिळते. खरं तर त्याचा अर्थ राजकारणी लोक आणि वृत्तमाध्यमं ह्यांनी जात-धर्म ह्यावर अवलंबून ठेवला आहे. मी सहज मोल्सवर्थच्या मराठी-इंग्रजी शब्दकोषात अर्थ&n… Read More
  • रक्तदान... रक्तदान जीवनदान. आपण दिलेले रक्त कोणाला तरी उपयोगी पडते आणि आपल्याला काहीच नुकसान होत नाही, कारण २० ते ५० दिवसांत दिलेले रक्त भरून येते. लहानपणापासून ही माहिती होती. पण स्वतः रक्त कधी दिले नाही. आधीही २/३ वेळा कार्यालय… Read More
  • दहीहंडी आणि पाण्याचा अपव्यय आज गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा उत्सव. दहीहंडी फोडणार्‍या गोविंदांवर पाणी ओतण्याची प्रथा वर्षांपासून चालत आहे. पण गेले काही वर्षे तर पाण्याचे टँकर मागवून त्यातून ह्या लोकांवर पाणी टाकणे अशी नवीन प्रथा मोठ्या लोकांनी सुरू क… Read More
  • [कैच्याकै] कॅल्शियम (रस्सी)खेच? तुम्ही बोर्नविटाची नवीन जाहिरात पाहिली आहे का? दूधातून कॅल्शियम खेचण्याकरीता 'ड जीवनसत्व' लागते, जे बोर्नविटा मध्ये आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. http://www.cadburyindia.com/in/en/Brands/Pages/videoplayer.aspx?vid=1… Read More
  • धन्य... काल कोपिणेश्वर मंदिराच्या जवळ एका संस्थेचा देवी महोत्सव संपला, त्यानंतर देवीला घेऊन जाताना जे संगीत लावले होते त्याने छातीही धडकत होती. सुतळी बाँबपेक्षाही जास्त आवाज, म्हणजे किमान १३० डेसिबल्सच्यावरती आवाज असेल. ह्या कार्यक्… Read More

9 प्रतिक्रिया:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

चालायचंच ;-)

हे वाचा देगा :)

http://wp.me/pq3x8-1Q4

देवदत्त म्हणाले...

धन्यवाद सुहास.
महेंद्र ह्यांना गेल्या वर्षी तर फक्त सर्व्हिस टॅक्स आणि वॅट द्यावा लागला होता. आता तर त्यांनी आणखी एक कर लावण्यास सुरूवात केलेली दिसतेय. :)

(मी इतरत्र वाचन भरपूर वाढवले पाहिजे असे वाटते, म्हणजे हे प्रश्न भरपूर आधीपासून आहेत हे कळेल ;) )

देवदत्त म्हणाले...

हो तृप्ती...
अजून भरपूर गोष्टी होत असतील आता :O करीता :)

निनाद गायकवाड म्हणाले...

मी सुद्धा माझ्या घरा जवळ च्या मुलुंड पिझ्झा हट मध्ये गेलेलो.. आम्हाला पण अश्याच प्रकारे अतिशय जास्तीचे बिल दाखवून लुटण्यात आले !

Panchtarankit म्हणाले...

चंगळवादी व भांडवल शाही संस्कृतीचे अनेक फायदे आहेत तसे तोटे सुद्धा
आपण अश्याच एका तोट्या संबंधी सांगितले आहे.
नफा केंद्रस्थानी ठेवून ग्राहकाचा मामा करणे

देवदत्त म्हणाले...

निनाद,
हो. हे ही मुलुंडचेच होते. :)

ninad,
बरोबर आहे.
चंगळवादी आणि भांडवलशाही, ह्यात आता चंगळवादी संस्कृती फोफावत चालली आहे आणि त्यातही फसवणूक आहे हे लोक लक्षात घेत नाहीत.

Kedar म्हणाले...

हटच्या नावाखाली ग्राहकांचे पैसे कट करण्याच्या धंदा आहे यांचा !!!

Kedar म्हणाले...

हटच्या नावाखाली ग्राहकांचे पैसे कट करण्याच्या धंदा आहे यांचा !!!

देवदत्त म्हणाले...

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद केदार.
पैसे कट करून नंतर हट् करायचे हाच प्रकार.

इंडिब्लॉगर गुण

maajhianudini.blogspot.com
47/100

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

135,653

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया


On Sep 23 Anonymous commented on blog post_09
Kuf cha tras aahe... Kuf mile khokla hoto...mg to lvkr jat nahi .ky karave

On Jul 25 Anonymous commented on blog post_09
मला पण असाच त्रास होत असे मी पण खूप उपचार करून पाहिले पण थोडे दिवसच त्रास कमी होत असे नंतर मी...(more)

On May 13 Announced Marathi Images commented on blog post_25
Very nice

On Jul 23 Sachin Kinare commented on blog post
छान, खूप दिवसांनी शोधत होतो, ह्या ब्लॉग मूळे लगेच मिळाले

On Jul 02 Anonymous commented on blog post
Chhan

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter