एप्रिल ०८, २०११

आज कार्यालयात धोक्याच्या वेळी (आग वगैरे) घंटा, सूचना कशा पाळायच्या ह्याची एक ओळख झाली. (फायर ड्रिल म्हणतात ते नव्हे) आग लागल्याची घंटा किती वेळा वाजणार, त्याबाबत सूचना स्पीकरवरून झाल्यावर काय करायचे वगैरे वगैरे. अर्थात ह्या गोष्टी बहुतेक सर्वच कार्यालयांत आजकाल होत असतीलच. त्याबाबत हे लेखन नाही. पण ह्यावरून दोन वर्षांपूर्वीची एक घटना आठवली.

२००९ मध्ये अमेरिकावारीत १ सप्टे. ला फायनल डेस्टिनेशन चा चौथा त्रिमितीय (३डी) भाग पाहिला. चित्रपट अर्थातच थरारक वाटला आणि आवडलाही. पण आधीच्या २/३ भागांत विमान, रोलर कोस्टर ह्यांतील अपघातातून वाचलेले मित्र, नंतर त्यांच्यावर नियतीचा घात ह्या गोष्टींनतर हा ३डी चित्रपट जरा जास्तच क्रूर वाटला होता.

त्यानंतर चारच दिवसांनी सहकार्‍यासोबत ३ दिवसांच्या सुट्टीत (५,६,७ सप्टें)  लास वेगस ला गेलो होतो. तिथे जगातील वेगवेगळ्या प्रसिद्ध वास्तूंच्या प्रतिकृती, उंच इमारती व त्यांचा दिव्यांचा झगमगाट आणि अर्थातच तिकडचे मुख्य आकर्षण, कॅसिनो ह्यांची भेट घेतलीच. पण तिकडचे आणखी आकर्षण होते स्ट्रॅटोस्फियर टॉवरवरील सफरी (राईड्स)



१०८ मजल्यांच्या वर ह्या सर्व सफरी. मी बसलो तीनही मध्ये. Insanity, X-Scream आणि Big Shot. मस्त एकदम. ह्यातील  x-scream मध्ये प्रत्येक रांगेत २ अशा ४ रांगांत लोकांना बसवितात. मग गच्चीवरून बाहेर मोकळे सोडून देतात, गुरुत्वाकर्षणाच्या भरवशावर. जसे काही आपण खालीच पडत आहोत. मग अचानक थांबवून पुन्हा मागे. आणि परत सोडून देतात.




माझा क्रमांक आल्यावर मी त्यात जाऊन बसलो. नेमकी एकदम समोरची जागा होती. म्हणजे खाली पडताना आपल्या समोर कोणी माणूस नाही, तर थेट १०८ मजले खालची जमीनच दिसणार. खेळ सुरु करणार तेवढ्यात आगीच्या धोक्याची घंटा वाजू लागली. लगेच यंत्र थांबविले व आम्हाला खाली उतरण्यास सांगितले. धोक्याची घंटा वाजतच होती. आता माझ्यासमोर ४ दिवस आधी पाहिलेला फायनल डेस्टिनेशन आठवला. समोर १०८ मजल्यावरचा कठडा, आत आगीची घंटा. म्हटले आपले फायनल डेस्टिनेशन आले जवळ :)



आम्हाला सर्वांना एका ठिकाणी जमा होण्यास सांगितले. ५-१० मिनिटांनंतर आतून घोषणा झाली, "आगीचे ठिकाण शोधण्यात आले आहे. १५ मिनिटांत सर्व ठीक करण्यात येईल."

१५ मिनिटांनी  सगळे ठीक असल्याचे सांगण्यात आले.  खबरदारी म्हणून कोणालाही न बसवता त्या यंत्राची चाचणी घेण्यात आली. पुन्हा आम्हाला त्या x-scream मध्ये बसण्याची परवानगी देण्यात आली. पण ह्यावेळी मला पहिल्या रांगेत जागा न मिळता दुसर्‍या रांगेत जागा मिळाली. पहिल्या रांगेची मजा बहुधा मला मिळाली नसेल पण ते x-scream ही थरारकच वाटले.


हा अनुभव मध्ये मध्ये आठवतच असतो, तसा एवढा गंभीरही नाही. पण आज ह्या धोक्याच्या घंटेने त्याबाबत लिहावयास प्रवृत्त केलेय असे म्हणता येईल.

2 प्रतिक्रिया:

आनंद पत्रे म्हणाले...

हाहा अश्यावेळी हमखास 'फायनल डेस्टीनेशन' आठवतं ;)

देवदत्त म्हणाले...

:) हमखास.

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter