एप्रिल २६, २०११

२६ एप्रिल म्हटले की मला पहिले आठवते ते १९९९ साल. वसतीगृहात आमच्या संगणकाला बंद पाडणार्‍या विषाणूचा पहिल्यांदा सक्रिय होण्याचा दिवस. त्याने जो काही गोंधळ घातला त्यावरून तो दिवस तर लक्षात तर राहिलाच पण संगणकातील विषाणू काय काय करू शकतात ह्याची प्रचिती आली. त्यानंतर जवळपास ४-५ वर्षे तरी एक खबरदारी...

एप्रिल २४, २०११

वार्‍यावरची वरात - पु. ल. देशपांडेंचे हे नाटक कधीतरी दूरदर्शनवर पाहिल्याचे पुसटसे आठवते. पण त्यातील नेमके सर्व आठवत नव्हते. नंतर मग २००३ पासून पुलंच्या एक एक करत सर्व कथाकथनांच्या ध्वनीफीती संग्रहात वाढवत गेलो, त्यात ह्याचीही ध्वनीफीत होती. 'वार्‍यावरची वरात नाटकाची व्हीसीडी बाजारात उपलब्ध आहे...

एप्रिल १२, २०११

रामनवमी म्हटले की मला इतर गोष्टींपेक्षा जास्त आठवते ते गदिमांचे गीत रामायण, सुधीर फडकेंच्या आवाजात. १० ध्वनीफितींचा संच वडिलांनी घेऊन ठेवला होता. दरवर्षी रामनवमीला सकाळी गीत रामायण आमच्या घरी लागायचे. पण आता गेली काही वर्षे नेमाने ऐकणे कमी झाले आहे. त्यांतील सर्व गाणी तर नेमकी तर आठवत नाहीत पण गाणी लावली असली तर आठवतात त्या लयीमध्ये. आता ध्वनीफीती तर जास्त कोणी ऐकत नाही. बाजारात तर मिळणेही बंद झालेय बहुधा. सध्या चलती आहे ती ऑडियो सीडी आणि एमपी३...

एप्रिल ११, २०११

आता कोणत्यातरी वाहिनीवर 'प्यार के काबिल' हा चित्रपट सुरू असलेला पाहिला. लहानपणी हा चित्रपट कॅसेट आणून पाहिल्याचे आठवले. तेव्हा भरपूर चित्रपट पाहिलेत. हा चित्रपट पूर्णपणे आठवत नसला तरी त्याची कथा लक्षात होतीच इतके दिवस. नवरा बायको (ऋषी कपूर-पद्मिनी कोल्हापुरे) भांडणानंतर वेगळे राहतात. त्यांच्या...

एप्रिल १०, २०११

भरपूर रुग्णालयात पाहिले की डॉक्टर रुग्णाच्या खाटेजवळ जाऊन त्याची तपासणी करतात. पण ते त्यांचे दाखल केलेले रूग्ण असतात आणि त्यांची माहिती डॉक्टरांना असते. भरपूर दवाखान्यात, रूग्णालयात रुग्णाच्या नावाचा पुकारा झाला की रूग्ण त्या डॉक्टरच्या केबिनमध्ये जातात. आज वेगळ्या प्रकारचा दवाखाना, डॉक्टर पाहिले जिथे रूग्ण दवाखान्यात वेगवेगळ्या भागात आहेत. डॉक्टरांकडे त्यांच्या नावाची नोंदवही (जी रुग्णाला दिली जाते) जमा असते, रुग्णांच्या त्या दिवसाच्या...

शनिवारी एका कामाकरीता अंधेरी पश्चिमेला गेलो होतो. तिकडे गेलो ३-४ वर्षांनंतर. पण शाळेजवळ गेलो होतो साधारण १४ वर्षांनंतर. सर्व भाग पूर्ण बदललेला. नवीन इमारती, मेट्रोचे पूल वगैरे वगैरे. तिकडूनच मित्रांना फोन केला. दोन मित्र शाळेजवळच भेटले, एक त्याच्या घराजवळ. त्यांच्याशी गप्पा मारताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 'शाळा'  आणि 'दुनियादारी'तील काही भाग समोर आले. :) मित्रांची खबरबात ऐकताना खूप चांगले वाटत होते. हा इकडे काम करतो, तो तिकडे.....

एप्रिल ०८, २०११

आज कार्यालयात धोक्याच्या वेळी (आग वगैरे) घंटा, सूचना कशा पाळायच्या ह्याची एक ओळख झाली. (फायर ड्रिल म्हणतात ते नव्हे) आग लागल्याची घंटा किती वेळा वाजणार, त्याबाबत सूचना स्पीकरवरून झाल्यावर काय करायचे वगैरे वगैरे. अर्थात ह्या गोष्टी बहुतेक सर्वच कार्यालयांत आजकाल होत असतीलच. त्याबाबत हे लेखन नाही. पण...

एप्रिल ०७, २०११

आज संध्याकाळी कार्यालयात चर्चेचा विषय निघाला होता सॅमसंगच्या नवीन वातानूकूल यंत्राबद्दल. त्यांनी 'व्हायरस डॉक्टर' नावाखाली नवीन उत्पादन बाजारात आणले आहे. त्यात H1N1 विषाणूलाही रोखता येते असा दावा केला आहे. तसेच एक पाणी गाळणी यंत्र आले होते, १ करोड विषाणूंना मारण्याचा दावा करणारे. वाटते हे किती खरे...

एप्रिल ०६, २०११

वर्ष पाचवीचे. पहिल्या चाचणी परीक्षेच्या आधी इंग्रजीच्या टीचरनी आम्हाला सांगितले,"जो कोणी सर्वात जास्त गुण मिळवेल त्याला माझ्याकडून एक बक्षिस मिळेल." इंग्रजी शिकवण्यास सुरूवात झाली पाचवीपासून. मी त्या आधी थोडेफार इंग्रजी वाचायचा प्रयत्न करायचो. दुकानांवरील फलकांवरून. पण का माहित नाही आवडता विषय बनत...

एप्रिल ०४, २०११

सर्वजणांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना हे नवीन वर्ष सुख समृद्धीचे जावो. आता (एप्रिल महिन्यात) बहुतेक कार्यालयांत वार्षिक प्रगतीबद्दलच्या चर्चा, पगारवाढीकरिता, बढतीकरीता गुणांकन सुरु असेल. त्यातही सर्वांना खुश करेल असे गुणांकन मिळो (अर्थात पुढे होणारयाही)...

एप्रिल ०३, २०११

क्रिकेट विश्वचषक २०११ जिंकणाऱ्या भारतीय संघाचे आणि चाहत्यांचे अभिनंदन :...

एप्रिल ०२, २०११

गेल्या आठवड्यात सचिन महेश कोठारे आणि अशोक सराफ ह्यांचा आयडियाची कल्पना हा चित्रपट पाहिला. महेश कोठारे आणि सचिन ह्यांचा एकत्र चित्रपट आणि सचिन किंवा महेश कोठारे चे आधीचे चित्रपट बरे वाटायचे. म्हणून त्यांचा हा चित्रपट पहायचा होताच. पण चित्रपटगृहात जाण्याचा योग नाही जमला. मग व्हीसीडी विकत आणली. पण...

एप्रिल ०१, २०११

माझी बँक आज बहुधा एप्रिल फुल मूड मध्ये आहे.  सकाळी लघु संदेश आला की पगाराचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत. कार्यालयातून खात्यात पैसे आल्याचे पाहिले व दुसऱ्या बँकेत पाठवायचा प्रयत्न केला. पण नाही करू दिले.  संध्याकाळी एटीएम मधून पैसे काढायला गेलो तर माझी पैसे काढायची दिवसभराची मर्यादा ओलांडली...

एवढी सारी विपत्र खाती, सामाजीकरण संकेतस्थळे, बँक खाते, आणि इतर संकेतस्थळे. प्रत्येकाची वेगवेगळी सदस्यनामे आणि परवलीचे शब्द. परवलीचे शब्द ठराविक काळानंतर बदलावे लागतात. मग एखादा विसरला की त्रास. शेवटी सोपा, गावठी उपाय केला. एक्सेल शीट मध्ये सर्व अद्ययावत करून ठेवले आणि त्याला एका परवलीच्या शब्दाने...

इंडिब्लॉगर गुण

maajhianudini.blogspot.com
47/100

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

133,704

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया


On Sep 23 Anonymous commented on blog post_09
Kuf cha tras aahe... Kuf mile khokla hoto...mg to lvkr jat nahi .ky karave

On Jul 25 Anonymous commented on blog post_09
मला पण असाच त्रास होत असे मी पण खूप उपचार करून पाहिले पण थोडे दिवसच त्रास कमी होत असे नंतर मी...(more)

On May 13 Announced Marathi Images commented on blog post_25
Very nice

On Jul 23 Sachin Kinare commented on blog post
छान, खूप दिवसांनी शोधत होतो, ह्या ब्लॉग मूळे लगेच मिळाले

On Jul 02 Anonymous commented on blog post
Chhan

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter