जानेवारी २६, २०११

आज प्रजासत्ताक दिन. आज त्याचा आनंद आपण साजरा करणार.
पण काल एका दिवसभरातील ह्या बातम्या वाचल्या ऐकल्या तर वाटते काय चालले आहे देशात. खरंच प्रजेची सत्ता आहे का आपल्या देशात? तसे म्हणायला प्रजेचीच सत्ता आहे पण ती सामान्य प्रजा नाही तर फक्त ’त्यां’च्या मर्जीतील प्रजा. ते कोण सांगायची गरज वाटत नाही. सर्वांनाच माहित आहे.
ह्या एकाच दिवसात घडलेल्या गोष्टी आहेत. २५ जाने २०११. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी. वास्तविक त्या कधीही घडल्या असत्या तरी त्यांची तीव्रता तेवढीच राहीली असती. पण एक दिवस आधीच घडलेल्या असल्याने प्रजासत्ताकावर मोठे प्रश्नचिन्ह दिसतेय. पहिली गोष्ट तशी लहान वाटते, पण हळू हळू अशाच गोष्टींची शेवटच्या गोष्टीमध्ये परिणती व्हावयास वेळ लागणार नाही अशीच भीती वाटते. प्रश्न हा ही पडतो की जर अधिकार्‍यांवर हल्ले होऊ शकतात तर आपण सामान्य लोकांचे काय?

अजून एक घटना: आरूषीच्या वडिलांवर हल्ला

कोणत्याही गोष्टी बदलायच्या असतील तर लहान गोष्टींपासून सुरूवात करावी लागते. समजा लहान गोष्ट घेतली की रिक्षाचालकांच्या मनमानीचा आपण काही विरोध करायला गेलो तर त्यांच्यापुढेही एकदोघांचे काही चालत नाही. तिथे मोठा गट पाहिजे किंवा एकत्रित दबाव. पण इथेही आजकाल भीती वाढत चाललीय. काही महिन्यांपुर्वी कागदपत्रे मागणार्‍या एका वाहतूक पोलिसाला मारल्याची घटना घडली होती. त्यामुळे सामान्य माणूस ह्यातही विरोध करण्याआधी विचार करायला लागतो, मी त्या फंदात का पडू?

सरकारमध्ये असणारे नेते आणि मंत्री ह्यांबाबत तर आता काही बोलायलाच उरले नाही. काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणतात, "तुम्ही तिरंगा फडकवला आणि काही झाले तर आम्ही जबाबदार नाही".
कसाब आणि अफजल गुरू ह्यांबाबत अजून निर्णय घेण्यात वेळ लागतो. त्यांना काही कमी पडणार नाही ह्याची खात्री केली जाते.
प्रधानमंत्री, अर्थ मंत्री म्हणतात की काळा पैसा असणार्‍यांची नावे सांगणार नाही.
नारायण राणेंनी मोठ्या आवेशात सांगितले होते की "किती मंत्र्यांचे अतिरेक्यांशी संबंध आहेत ते मला माहित आहे आणि मी ती नावे उघड करेन" अजून ती नावे समोर आली नाहीत की कोणी त्याचा पाठपुरावा केला नाही.
२ वर्षांपूर्वी दिल्लीतील बलात्कार प्रकरणानंतर मुख्यमंत्री शीला दिक्षित म्हणाल्या होत्या की "मुलींनी/स्त्रियांनी रात्री बाहेर पडायला नाही पाहिजे"
सीबीआय तर काय एक एक प्रकरण पुरावे नसल्याच्या कारणाने बंदच करीत चालले आहेत.

ही काही ठळक उदाहरणे आहेत. हे असे जर मुख्य, जबाबदार नेते जर जबाबदारी झटकायला लागले तर वरील गोष्टी होतच राहणार आणि आपण फक्त प्रजासताक दिनाचे, स्वातंत्र्य दिवसाचे गुणगाण गायचे का?

मला इथे काय करावे हे सांगायचे नाही आहे. कारण ते सुचत नाहीच आहे आता. सध्या फक्त प्रश्नच आहेत. की हे कधीपर्यंत चालणार? आपण कसे ते थांबवायचे?

प्रजासताक दिनाबद्दल माहिती शोधताना काही लेख दिसले. विचार करण्यासारखे.

3 प्रतिक्रिया:

अनामित म्हणाले...

भस्मासुराची कथा प्रकर्षाने आठवत आहे.

प्रमोद देव म्हणाले...

देवदत्ता,प्रश्न अनुत्तरित करणारे असल्यामुळे तुझ्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार?
आता ह्यापुढे प्रश्न देखिल विचारता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होणार आहे.

देवदत्त म्हणाले...

राज, भस्मासुराला ही नाच करायला प्रवृत्त करून मग त्याला त्यात भस्म केले होते. पण इथे ते लोक अशा प्रलोभनाला बळी पडणे शक्यच नाही.

काका, तुम्ही म्हणता ते खरेच आहे. खरे तर आपण मोकळेपणाने मनातले विचार सांगू शकतो, असे जाहिर लिहू शकतो एवढाच फायदा लोकशाहीचा असे वाटतेय :(

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter