डिसेंबर २९, २०१०

"लता मंगेशकर ए आर रहमान करीता पहिल्यांदा गाणार." 
’दिल से’ चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधी त्या लोकांनी जाहिरात केली होती. मी आणि माझ्या मित्राची चर्चा चालू होती की लता मंगेशकर ने गाणे गायला सुरूवात केल्याच्या कितीतरी वर्षांनंतर हा संगीतकार आला. त्यात मग लता मंगेशकर ने त्याच्याकरीता गाणे गायले ह्यात एवढे काही खास नाही. (लता मंगेशकर ओ. पी. नय्यर कडे गायली नाही ही गोष्ट सोडा. ती गोष्ट घडली असती तरी बातमी झाली असती का माहित नाही.) पण चित्रपटसृष्टीत (आणि इतरत्र ही) असे पहिल्यांदा होणारी, खूप वर्षांनी होणारी गोष्ट प्रकाशझोतात आणली जाते. काही वेळा त्यात किती तथ्य असेल ते ही न पाहता. अनुराधा पौडवाल ने १९९८/९९ मध्ये कोणत्या तरी सिनेमात गाणे गायले होते तेव्हाही असेच काहीतरी म्हणत होते की अनुराधा पौडवाल १० वर्षांनी पुन्हा चित्रपटात गाणे गात आहे. पण त्या आधीच १९९७ मध्ये ’और प्यार हो गया’ चित्रपटात तिचे गाणे ऐकले होते. आता शोधले तर १९७६ ते २००८ मध्ये प्रत्येक वर्षी तिने गाणे गायलेले दिसते. त्यांना बहुधा ’टी सीरीज’च्या बाहेर १० वर्षांनंतर म्हणायचे असेल. आमिर खान आणि काजोलचा ’फना’ सिनेमा आला तेव्हा दोघे पहिल्यांदा एका चित्रपटात, एका फ्रेम मध्ये असे काही तरी चालले होते. पण त्या आधी दोघे ’इश्क’ चित्रपटात येऊन गेले होते हे ते लोक विसरले होते किंवा मग त्यांना हे दोघे नायक-नायिका जोडीत पहिल्यांदा आलेत असे म्हणायचे असेल.


असो. हे जुने झाले. आता नवीन ताजी बातमी आहे. मराठीतील दोन दिग्गज कलाकार/दिग्दर्शक पहिल्यांदा एकत्र येत आहेत, ’आयडियाची कल्पना’ ह्या नवीन चित्रपटात. ते दोघे आहेत महेश कोठारे आणि सचिन (पिळगांवकर). ही गोष्ट खरोखरच बातमीसारखी आहे असे मला तरी वाटते. गेले कित्येक वर्षे मी मराठी चित्रपटांबद्दल बोलतो तेव्हा ह्या दोघांचे नाव अर्थातच पुढे असते. त्यातच माझ्या निरीक्षणातील गोष्ट होती की महेश कोठारेच्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे नेहमी असायचा आणि सचिनच्या चित्रपटात अशोक सराफ. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ हे अनुक्रमे सचिन आणि महेश कोठारेंच्या चित्रपटात अधून मधून असत. पण सचिन आणि महेश कोठारे हे एकमेकांच्या चित्रपटात नव्हते. आता कित्येक वर्षांनंतर महेश कोठारे सचिनच्या दिग्दर्शनाखाली त्याच्या चित्रपटात काम करणार आहे. ही माझ्याकरीता बातमीच आहे. 

तसेच ह्या चित्रपटाद्वारे आणखी एक गोष्ट पहिल्यांदा होत आहेत. ते म्हणजे गायनानंतर आता सचिनचे संगीतकार म्हणून नवीन क्षेत्रात पदार्पण.

सचिन आणि महेश कोठारेचा विषय निघालाच आहे तर आणखी एक जाणवलेली गोष्ट. सचिनच्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेचे (आणि इतर सर्वजणांचेही) काम संतुलित वाटायचे. पण महेश कोठारेच्या चित्रपटात तो मोकाट सुटलेला दिसायचा. आणि बहुधा इतरही लोक. 

आता ह्या नवीन चित्रपटात पाहू कोणाचे काम कसे आहे ते आणि एकंदरीत पूर्ण चित्रपट कसा आहे ते.

(जाता जाता: आमिर खानचा पहिला चित्रपट ’कयामत से कयामत’ किंवा खरे तर ’यादों की बारात’ हा आहे. त्याच्या भावाचा, फैजल खानचा, पहिला चित्रपट कोणता? )

4 प्रतिक्रिया:

साधक म्हणाले...

>>गायनानंतर आता सचिनचे संगीतकार म्हणून नवीन क्षेत्रात पदार्पण.
म्हणजे काय हो भाऊ? गायन क्षेत्र गाजवून सोडले की का त्यांनी?
संगीत देणे हे काम आता कोणीही करु शकतो का?

देवदत्त म्हणाले...

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद साधक.
गायन क्षेत्र गाजवून सोडले असे नाही. पण ती म्हणायची पद्धत आहे आता. ’नच बलिये’ मध्ये एकदा जिंकल्यानंतर सचिन ’महागुरू’ बनण्याइतपत चांगला नर्तक होता असे नाही.
संगीत देणे हे काम कोणीही करू शकतो का तेही पाहू ह्या चित्रपटानंतर. :)

अनामित म्हणाले...

faisal khan cha pahila chitrapat "Madhosh "

देवदत्त म्हणाले...

धन्यवाद अनामित :)
हे उत्तर मिळण्याची अपेक्षा जास्त होती. पण त्याने त्याआधी 'कयामत से कयामत तक' मध्येही काम केलेले आहे. जंगलात जुही चावलाच्या मागे लागलेल्या गुंड मुलांमध्ये तो ही एक होता.

(आत्ता आंतरजालावर शोधले तर 'प्यार का मौसम' मध्ये लहान मुलगा फैझल खान होता ही माहिती मिळाली. :) )

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter