गेल्या आठवड्यात नागपूरला जाण्याचा योग आला. साधारण ६ १/२ वर्षांनंतर फेरी होत होती, मे २००४ नंतर. स्वत:च्या कामाकरीता मामेभावासोबत त्याच्या दुचाकीवरच तिकडे भटकंती(ढोबळ मानाने) करता आली. त्याबद्दल थोडेसे.
मी तिकडे पोहोचलो बुधवारी रात्री. ठाणे- मुंबईत तापमान २० च्या खाली जाऊन थंडी वाढली तेव्हा तिकडचे तापमान १० च्या खाली आहे असे बातम्यांमध्ये ऐकत होतो. त्यामुळे त्या तयारीनेच गेलो होतो. पण विमानातून उतरतानाच त्यांनी घोषणा केली बाहेरचे तापमान २१.५ आहे. बाहेर भाऊ भेटला, तो म्हणाला आज थंडी नेहमीपेक्षा खूप कमी आहे. माझ्या पूर्ण सहलीत तापमान वाढलेलेचे होते. आता थंडी कमी म्हणून आनंद मानावा की नागपूरची थंडी अनुभवता येणार नाही ह्याची खंत? ;)
२००१/२ मध्येच पाहिल्याप्रमाणे, ठाणे शहरानंतर तिकडे गेलेल्या टी. चंद्रशेखर ह्यांनी नागपूर शहराचा कायापालट केला होता. रस्ता रुंदीकरण ही त्यातली मोठी गोष्ट. सगळीकडे फिरताना मोठे मोठे रस्ते दिसत होते. त्यामानाने तर ह्यावेळी भरपूर बदल दिसला होता. रस्ते तर काय शहराचाच विस्तार दिसत होता.
ह्याच विस्ताराकरीता कारणीभूत असणारे एक आहे नागपूर सुधार प्रन्यास किंवा Nagpur Improvement Trust (NIT).
पण सुधारणांच्या प्रशंसेसोबतच त्यांना टीकेलाही सामोरे जावे लागते. कारण नागपूर महानगर पालिकेसोबतच लोकांना मालमत्तेच्या कामाकरीता ह्यांचे वेगळे नियम ही पाळावे लागतात आणि त्यांना वेगळे कर वगैरे देणेही.
तसेच पाहिलेले (NITचेच) Krazy Castle Aqua Park. पाण्यातील खेळांचे उद्यान. आतून तर नाही पाहिले, पण त्याच्यासमोरून फिरताना जमेल तसे चित्र घेण्याचा प्रयत्न केला.
ही आहे रिझर्व बँकेची इमारत.
नागपूर शहर भारताच्या केंद्रस्थानी आहे हे माहित होते. पण त्याचे एक शून्य मैलाचे स्थान आहे व तिकडे काही वास्तूही उभारली आहे हे माहित नव्हते. ह्या भटकंतीत हे ही पाहून घेतले.
ह्या शून्य मैलाच्या दगडाशेजारी आधी एक पेट्रोलपंप होते, जे ह्या चित्रात स्तंभाच्या मागे आहे. (ह्या चित्राचे स्त्रोतः विकिपिडिया)

पण ह्या जागेचे वेगळे महत्व असल्याने त्यांना ती जागा रिकामी करायला सांगून दुसर्या एका मोक्याच्या ठिकाणी त्या पेट्रोलपंपाला जागा देण्यात आली. आता ती मोकळी जागा अशी आहे.
ह्या भटकंतीत एवढेच.
अरे हो राहिलेच.
हा पहा नागपूरचा सांताक्लॉज. अजुन एक पाहिला होता, लाल ऐवजी पूर्ण राखाडी/चंदेरी रंगाचे कपडे घालून. पण त्याचे छायाचित्र नाही घेता आले.
येताना नागपूरची प्रसिद्ध हल्दीरामची संत्र्याची बर्फी आणली आहे.

रविवारपर्यंत संपर्क केल्यास (आणि उरली असल्यास) मिळण्याची शक्यता सांगू शकतो ;)

3 प्रतिक्रिया:
संत्रा बर्फ़ी...मजा आहे.....रविवार पर्यंत शिल्लक राहिल का याची शंका वाटते आहे... :) :)
mastach hotee agadee barffee :) Thanks :)
Yogesh आणि Shrinivas प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तरी एक आठवडा संत्र्याची बर्फी ठेवली मी. नंतर संपली. :)
टिप्पणी पोस्ट करा