शाहरूख खानने आय पी एल च्या खेळाडूंच्या लिलावानंतर पाकिस्तानी (म्हणत आहेत त्याप्रमाणे तर सर्वच देशांच्या) खेळाडूंना समर्थन दिले. शिवसेनेने त्याविरोधात दंड थोपटले आणि 'माय नेम इज खान' वर बहिष्कार टाकण्यास सांगितले. शाहरूख खान म्हणतो, " मला भारताबद्दल देशप्रेम आहेच. मी त्याविरोधात काही बोललो नाही." (नेमकी त्याची वाक्ये नाहीत पण आशय तोच).
गेले आठवडाभर हो नाही चालत, पुन्हा 'माय नेम इज खान' चा विरोध समोर आला. काँग्रेस सरकारने दुटप्पीपणा करत लगेच ह्या सिनेमाला सुरक्षा देण्याचे ठरवले. इतर वेळी ' सुरक्षा मागाल तर देऊ' ही भूमिका. शाहरूख खानने काही चर्चा करण्यास नकार दिला. आणि आता सिनेमाच्या प्रिमिअरकरिता थेट दुबईला गेलाय.
सर्व वादात शिवसेना, काँग्रेस, शाहरूख खान ह्यात कोण चूक, कोण बरोबर हे नेमके कोणालाच कळत नाही आहे. पण सध्या तरी शाहरूख खान ने एक चूक केली असे वाटते. त्याने म्हटलेल्या वाक्यावर रण माजले आहे. भले तो बरोबर असेल, पण त्याच्या सिनेमाच्या नावावर इथे सुरक्षेला धोका पोहोचत आहे आणि त्याची पर्वा न करता तो त्याच्या 'चाहत्यांना' अशा स्थितीत टाकून देशाबाहेर जाऊन बसलाय आणि सिनेमाची जाहिरात, प्रदर्शन करत आहे हे मला तरी पटत नाही. तो म्हटला त्याप्रमाणे हे देशप्रेम नाही.
फेब्रुवारी ११, २०१०
फेब्रुवारी ११, २०१० १२:५६ PM
देवदत्त
5 प्रतिक्रिया
Related Posts:
पाऊस आणि घरांतील वीज काल संध्याकाळी मुंबई-ठाण्यात पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी बाजारात जाताना काळे ढग दिसले. अंदाज आला पाऊस पडणार आज. पण एवढ्या लवकर पडेल असे वाटले नव्हते. दर पावसाळ्यात एक दृष्य नेहमी दिसते. काळे ढग, त्य… Read More
[गुंतवणूक आणि करप्रणाली] राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरीक बचत योजना मागील लेखनात भविष्य निर्वाह निधीबद्दल माहिती पाहिली. त्यातील गुंतवणूक ही प्राप्तीकर नियमाप्रमाणे करसवलतीस प्राप्त असते. पुढील काही लेखनात गुंतवणूकीचे असेच काही पर्याय पाहू ज्यात गुंतवणूकीवर अवलंबून करसवलत घेता येते. र… Read More
सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये आपण भरपूर चित्रपट पाहतो. त्यातील बहुतेक संवाद हे आपल्या लक्षात राहतात. बहुतेक वेळा ते संवाद किंवा ती एक एक वाक्ये लक्षात रहावीत अशाच प्रकारे लिहिलेली असतात. उदा. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधील 'राज, अगर यह तुझसे प्यार क… Read More
[गुंतवणूक आणि करप्रणाली] Equity Linked Savings Scheme (ELSS) आज आपण पाहूया, ईक्विटी लिन्क्ड् सेविंग स्किम अर्थात Equity Linked Savings Scheme (ELSS) बद्दल. ELSS हा म्युच्युअल फंड मधील गुंतवणूकीचा प्रकार असून ह्यावर करसवलतही दिली जाते. ह्यात गुंतवलेली रक्कम ही त्या फंडच्या व्यवस्था… Read More
सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये - २ ह्या आधीचा लेख इथे पहा. सिनेमातील मला लक्षात राहिलेली आणखी काही वाक्ये.... मेरे दो दो बाप...गोपी-किशन चित्रपटात दोन्ही सुनील शेट्टी एकत्र पाहिल्यावर सुनील शेट्टीचा (गोपी) मुलगा म्हणतो. त्या मुलाची हे बोलण्याची शैली एकदम वे… Read More
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
5 प्रतिक्रिया:
शाहरुख खान ची एक मोठी चूक झालीय, ती तू नमूद केली नाहीस आश्चर्य वाटले... त्याची स्वत:ची एक IPL Team आहे.. त्यामध्ये त्याला पाकिस्तानी खेळाडू घेता आले असते.. ते त्यानी घेतले नाहीत आणि नंतर का त्याला पुळका आला त्यांचा ? देव जाणे (कपिल देव नाही... ) आणि शाहरुख जाणे..
Abhijeet,
गेल्या आठवड्यात ह्या वादाबद्दल माझी पहिली प्रतिक्रिया तीच होती की त्याने स्वत: कोणाही पाकिस्तानी खेळाडूला घेतले नाही आणि दुसऱ्यांना सल्ले देत आहे. :)
पण नंतर कुठेतरी त्याची प्रतिक्रिया वाचली की त्याने एकाला घेण्याचे आधीच ठरवले होते, पण त्या खेळाडूला दुखापत झाली असल्याने रद्द केले. म्हणून तो मुद्दा नाही लिहिला.
मूर्ख चर्चेचा प्रस्ताव आहे. शाहरुखच्या फ्यान्सना सुरक्षा द्यायची जवाबदारी काय शाहरुखची आहे? तो काय त्यांचा बाप आहे? तो गेला दुबईला म्हणून त्याचे फ्यान काय उपाशी मरत आहेत?? लोक पण काय काय विचार करतात. हसून हसून बेजार झालो.
शहारुखचं जाउ द्या. ब्लॉग ला संवादिनी हा शब्द जास्त योग्य आहे. अनुदिनी जे रोज लिहितो ते. ब्लॉग रोज लिहित नाही आपण.
Follow sसाठी पाठलाग हा सोपा शब्द असताना तुम्ही अनुसरण हा काहीसा खटकणारा शब्द वापरलात.
@अनामित,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. :)
सुरक्षेची जवाबदारी शाहरुख ची नाही. पण ज्या लोकांनी सिनेमा पाहिल्याने त्याला डोक्यावर चढवण्यात आले त्यांनाच जर धोका असेल तर आणि तो म्हणेल की, मी आहे सुरक्षित तुम्ही सिनेमा पहा. तर काय?
त्याने इथे राहून चर्चा केली असती तर वेगळी गोष्ट.
@साधक,
भरपूर जण अनुदिनीबद्दल विचारत होते.
अनुदिनीबद्दल तुम्ही सांगितले ते बरोबरच आहे. मी ही रोज लिहिणार होतो. पण नाही जमत. आणि ते नाव ठेवले तेव्हा ब्लॉग करीता बहुतेक संकेतस्थळांवर 'अनुदिनी' हाच शब्द वापरला जात होता. आणि प्रभावळकरांच्या 'अनुदिनी' पुस्तकावरून मी हेच नाव नक्की केले.
आणि 'अनुसरण' करण्याबद्दल म्हणाल तर सध्या तरी मी गूगल ने दिलेला शब्द वापरत आहे. 'पाठलाग' हा शब्दही ह्या संदर्भात योग्यच आहे. ब्लॉगचे नाव बदलणे बहुधा जमणार नसले तरी तुमच्या अनुसरणाच्या सल्ल्याचा विचार पुढे 'template' बदलताना करीनच. :)
टिप्पणी पोस्ट करा