डिसेंबर १४, २००९

लोकप्रभामधील अल्केमिस्ट्री सदरात राजू परूळेकरांनी "सचिन (ग्लॅडिएटर) तेंडुलकर" नावाचा लेख लिहिला आणि (त्यांच्या अपेक्षेप्रमाणे) वादळ उठले. त्या लेखाच्या विरोधात भरपूर प्रतिक्रिया उमटल्या. माझीही एक त्यातलीच होती. माझ्या (आणि बहुतेकांच्या) अपेक्षेप्रमाणे, त्यांनी १८ डिसें २००९ च्या लोकप्रभामध्ये पुन्हा त्यावर लेख लिहिला.

ह्या लेखात त्यांनी त्यांच्या विरोधातील दोन प्रातिनिधीक लेखांना उत्तरे लिहिली आहेत. आता त्यावर पुन्हा किती प्रतिक्रिया उठतील माहित नाही. मी गेल्यावेळी थेट त्यांना किंवा लोकप्रभाला पत्र न पाठवता माझ्या अनुदिनीवरच लिहिले होते, म्हणून आजही पुन्हा इथेच लिहित आहे. मला काही त्यांच्याशी वाद घालायचा नाही आहे, पण हा नवीन लेख आणि संदर्भ दिलेला जुना लेख(पुन्हा) वाचला, त्यावरून जे काही वाटले तेच लिहित आहे. :)

 ह्या लेखाच्या (आतापासून 'तो' म्हणजे जुना आणि 'हा' म्हणजे नवीन लेख) सुरुवातीलाच त्यांनी म्हटले आहे की, "मुळात माझा लेख हा महाराष्ट्र धर्मावरचा नव्हता, सचिनचं मूल्यमापन करणारा नव्हता, कोणत्याही प्रकारचा राग, लोभ, प्रेम, द्वेष यापासून अलिप्त राहून राज्य संस्था आणि समाज यांच्या शोकान्त शेवटाअगोदर वेगवेगळ्या रूपात ग्लॅडिएटर्सचं अवतीर्ण होणं व सत्ताधारी व धनिकवर्गाने मूळ समस्या, समाजाच्या मानवी व प्राकृतिक आनंद व दु:खापासून दूर नेऊन बहुजनवर्गाला गंडवण्यासाठी अशा ‘खेळ्या’ ग्लॅडिएटर्सची प्रतिमा ‘लार्जर दॅन लाइफ’ करणं, ही इतिहासाची पुनरावृत्ती असते. हाच माझ्या लेखाचा विषय होता." जर तो लेख  सचिनचे मूल्यमापन करणारा नव्हता तर लेखाचे नावच चुकीचे होते असे मला वाटते. त्यावरून तर सचिनबद्दलच लिहिले आहे असेच समजले जात होते.

परूळेकरांचे "माणसं: भेटलेली, न भेटलेली" पुस्तक मी वाचले आहे. त्यांच्या 'संवाद' कार्यक्रमाचे खूप भाग मीही पाहिले आहेत. दोन्ही प्रकार मला आवडले. तरीही मला तेव्हा त्याबाबत नाही लिहावेसे वाटले. कारण तो लेख वाचताना हेच प्रतित होत होते की त्यांना मुळात सचिनला मिळणार्‍या अवास्तव प्रसिद्धीबद्दल लिहायचे होते. तर मग तो लेख सचिनच्या नावावर का खपविला? त्यात त्यांना लाज वाटते की "मराठीतल्या अनेक लेखक, कलावंत, गायक, राजकीय नेते वगैरेंनी सचिनसोबतच्या आपल्या तऱ्हेतऱ्हेच्या आठवणी लिहिलेल्या आहेत" अहो, त्यांना सचिनबद्दल लिहावेसे वाटले म्हणून त्यांनी लिहिले. "कमिशनर का कुत्ता मिला",""बिल्ली छत पर चढी" सारख्या ब्रेकिंग न्यूज देणार्‍या वाहिन्यांनी सचिनला अवास्तव प्रसिद्धी दिली ह्यात सचिनचा काय दोष?  तुम्हाला एखाद्याबद्दल चांगले वाटले ते तुम्ही लिहिता, आम्ही वाचतो. 'सचिनच्या पत्नी काय खातात काय नाही', किंवा 'सचिन चड्डीत होता तेव्हा काचा कशा फोडत होता' हे वाचणे/ऐकणे म्हणजे हुतात्म्यांचा अपमान करणे असे परूळेकरांना वाटते. पण हे सचिनने नाही कोणाला सांगितले की तुम्ही लिहा. त्यापेक्षा त्यांनी आजकालच्या माध्यमांना ह्याबाबत सांगावे की नका लिहू म्हणून. ’भगतसिंग, राजगुरू वगैरे लोक फासावर गेले ते ह्याचकरीता का?’ असे विचारताना स्वातंत्र्याचा संग्राम आणि क्रिकेट हा खेळ ह्यांची उगाच तुलना केली आहे असे वाटले. त्यापेक्षा आजकालची माध्यमे, त्या इतके लोकांचे प्राण घेणार्‍या कसाबच्या हागल्या-मुतल्याची बातमी देत असतात, कसाबला साध्या माणसापेक्षा जास्त सुविधा पुरविल्या जातात, ह्याची परूळेकरांना का लाज वाटत नाही? ह्यावरून "मग त्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांनी का उगाच आपले प्राण दिले?" हा प्रश्न रास्त ठरला असता.

सचिनने मुंबईच्या प्रश्नावर त्याला वाटले ते उत्तर दिले. आता तो त्याचा प्रश्न आहे. वाहिन्यांचे पत्रकार तर अशा विधानांच्याच शोधात असतात. (खूप कमी वाहिन्यांवर असा मसाला नसतो). कालच एका वाहिनीवर अभिषेक बच्चनलाही 'राज ठाकरे', 'मराठी माणूस' वर प्रश्न विचारत होते. पण अभिषेक बच्चनने त्याला उत्तर देणे टाळले. त्याच प्रकारे सचिननेही तेव्हा उत्तर टाळले असते तर बरे झाले असते असे वाटून गेले.

परूळेकरांनी सचिनच्या विरोधात जे काही ह्या लेखात लिहिले ते एक वेळ विचार करण्यासारखे आहे. पण त्यांना उगाच(?) लोकांच्या (त्यांच्या अपेक्षेप्रमाणे) वादळाला सामोरे जावे लागले. हेच जर त्यांनी पहिल्या लेखात लिहिले असते तर ते फक्त त्यांचे मत म्हणून लोकांनी जास्त प्रतिक्रिया दिल्या नसत्या. पण ते लिहिताना त्यांनी असेही म्हटले आहे की 'त्यांच्या विरोधात लिहिलेल्यांची मस्ती त्यांनी मनमोकळेपणाने वाचली'. हे म्हणजे ’आपला तो बाळ्या, दुसर्‍याचे ते कार्टे’ हा न्याय झाला. अर्थात  सचिनबद्दल 'आय माय मायसेल्फ’ प्रवृत्ती वाटत असेल तर हे त्यांचे मत आहे. त्याबद्दल मला काही नाही म्हणायचे. पण त्यांना वाटले त्याप्रमाणे जर सचिनचे एखादे वाक्य गंभीरतेने घेण्यासारखे नव्हते आणि त्यांनी गंभीरतेने घेतलेही नव्हते, मग त्याबाबत लिहावेच का? ज्याबाबत आधीच लागलेली आग विझत आहे त्यात उगाच तेल का घालावे? आणि दुसर्‍याने त्याबाबत काहीच लिहू नये असे त्यांना वाटते? :)

असो, मी काही क्रिकेटचा एवढा चाहता नाही आहे. सचिन एक चांगला खेळाडू म्हणून आवडतो. त्याने पुढे चांगले खेळत रहावे. आणि परूळेकरांनीही चांगल्या व्यक्तींबाबत लिहित रहावे/मुलाखत घेत राहावे. आम्हीही ते वाचू/पाहू. दोघांबद्दलही (सचिन तेंडुलकर आणि राजू परूळेकर) चांगले वाटल्यास सकारात्मक दाद देऊ/ न पटल्यास आपुलकीने टीका करू :)

Related Posts:

  • भविष्य निर्वाह निधीवरील करप्रस्ताव रद्द सरतेशेवटी अर्थमंत्र्यांनी ईपीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील कर लावण्याचा प्रस्ताव मागे घेतला. चांगले झाले. त्यांनी तो निर्णय घ्यायलाच हवा होता. मध्यमवर्गीयांना करसवलत न देता आणखी कराचा बोजा टाकला तर ते त्यांना… Read More
  • पीपीएफ व किसान विकास पत्रावरील व्याजदरात कपात ईपीएफ वर कर लादण्याच्या असफल प्रयत्नानंतर कनिष्ठ व मध्यमवर्गीय लोकांना आर्थिक जाच देण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसलेली आहे असे दिसते. फेब्रुवारीमध्ये त्यांनी पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधीवरील व्याज वाढविले ते बहुधा हाच… Read More
  • अर्थ अवर (Earth Hour) - भारतात फज्जा? दरवर्षीप्रमाणे पुन्हा 'पृथ्वीकरिता एक तास' अर्थात 'अर्थ अवर' ची चाहूल लागली आहे. १९ मार्च रोजी रात्री ८:३० ते ९:३० दरम्यान आपण वीजेची उपकरणे बंद करून वीज वाचवावी जी पृथ्वीकरीता उपयोगी पडेल असा त्यामागील हेतू आहे. २००९ मी … Read More
  • भविष्य निर्वाह निधीवरील करः मूर्खपणा आणि जाचक काही महिन्यांपूर्वी काही मित्र मला विचारत होते की 'तू व्हीपीएफ किंवा पीपीएफ मध्ये गुंतवणूक करतो/करणार का?' मी म्हटले, 'पीएफ ही एक तर सरकारी योजना आहे. त्यामुळे त्यातील पैसे काढताना खरोखरच ते किती सुलभतेने मिळतील ह्याची हमी… Read More
  • मोबाईलधारक बसचालक आज सकाळी दुचाकीने ऑफिसला जात होतो. पवईतील पिझ्झा हट् च्या सिग्नलजवळ पोहोचलो तेव्हा पाहिले ४ सेकंद बाकी होते, म्हणून गाडी न थांबवता सरळ गेलो. मी उजव्या बाजूला होतो. डाव्या बाजूला जी एकेरी मार्गिका आहे तिकडून… Read More

5 प्रतिक्रिया:

अनामित म्हणाले...

या जळाऊ लाकडामागे इतका वेळ खर्च करण्याची काय आवश्यकता आहे?

अनामित म्हणाले...

मी आपल्या मताशी सहमत आहे. मला वाटते राजू परूळेकर हे फार वाहवत गेले आहेत.

E TV वरील त्यांच्या मुलाखती मलाही आवडल्या आहेत. अजून देखील मी त्यांनी घेतलेल्या मुलाखती पाहतो. त्यांनी प्रकाश आमटेंची भामरागडला जाऊन घेतलेली मुलाखत (४ भाग ) मला फार आवडली.

पण आता ते तोल सुटल्यासारखे वाटतात.

राज जैन म्हणाले...

कशाला त्यांच्याकडे लक्ष देता ;)

देवदत्त म्हणाले...

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद :)
मलाही असेच वाटत होते की पुन्हा काही लिहायची गरज नव्हती. परंतु ते लेख पुन्हा वाचल्यानंतर काही मुद्दे खटकत होते, म्हणून राहवले नाही.

Abhishek म्हणाले...

मला वाटत वेळे वेळे नुसार प्रतिक्रिया बदलल्या आहेत ... Gladiator लोकांना आणि नंतर परुळेकाराना प्रतिक्रिया पचवण जड गेलेल असणार...
मला मात्र मुल विषय आणि त्यावर झालेल सर्वच डिस्कशन पटलय... देगा मी आभारी आहे कि हा लेख सगळ्यांच्या माहितीत आणून दिलात..
परुळेकरांनी सचिन ला माध्यम म्हणून वापरलं... बाकी सुज्ञ सुज्ञ आहेत!
चारही लेख वाचून आता मला जड जड झालंय... काहीतरी हलक फुलक येउद्यात! :)

इंडिब्लॉगर गुण

maajhianudini.blogspot.com
47/100

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

133,793

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया


On Sep 23 Anonymous commented on blog post_09
Kuf cha tras aahe... Kuf mile khokla hoto...mg to lvkr jat nahi .ky karave

On Jul 25 Anonymous commented on blog post_09
मला पण असाच त्रास होत असे मी पण खूप उपचार करून पाहिले पण थोडे दिवसच त्रास कमी होत असे नंतर मी...(more)

On May 13 Announced Marathi Images commented on blog post_25
Very nice

On Jul 23 Sachin Kinare commented on blog post
छान, खूप दिवसांनी शोधत होतो, ह्या ब्लॉग मूळे लगेच मिळाले

On Jul 02 Anonymous commented on blog post
Chhan

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter