गेला महिनाभर निवडणूकीबद्दलचे SMS येत होते. "Save Thane","Vote for XXXXX","Don't vote for XXXXX" वगैरे वगैरे. वैताग आला होता त्या SMS चा. तसेच बाकीचे जाहिरातींचे SMS ही होतेच, ज्याला आपण टेलिमार्केटींग म्हणतो त्या प्रकारचे. Do Not Disturb मध्ये नंबर नोंदवूनही हे SMS येत असल्याने तक्रार करण्यास माझ्या मोबाईल कंपनीच्या ग्राहक केंद्राला संपर्क केला. ते म्हणाले, 'पहिल्यांदा तक्रार करताना तुम्हाला लेखी तक्रार द्यावी लागेल" त्यामुळे मला त्यांच्या कार्यालयात जाणे भाग होते. वेळेअभावी ते जमले नाही. आणि निवडणुकीचे SMS म्हटले, तर वाटले ह्याची तक्रार करूनही काही फायदा होणार नाही. आणि एवीतेवी ३० एप्रिल नंतर बंद होतीलच. टेलिमार्केटिंगचे आलेत तर पाहूच.
पण आज SMS आला, "You have voted & every vote will make India Strong................. Thank You"
सर्वांनाच हा SMS गेला असेल तर एक वेळ ठीक आहे. पण ह्या लोकांनी मतदारयादीतूनही मतदान केलेल्या लोकांची नावे घेउन तर नाही ना SMS पाठवले, अशी ही पुसट शंका येऊन गेली. :)
तुम्हाला कोणालाही असे संदेश आले आहेत का?

1 प्रतिक्रिया:
आज ठाण्यात अशा प्रकारचे फलक पाहिले की, ' तुम्ही मतदान केले त्याबद्दल धन्यवाद.' अर्थात तो संदेशही सर्वांनाच पाठवला असेल असे मी गृहीत धरतो.
टिप्पणी पोस्ट करा