आज संध्याकाळी स्कूटरवरून घरी येत होतो. समोर एक बाई लहान मुलाला हात धरून घेऊन चालली होती. लहानसा रस्ता असल्याने आधीच रहदारीत एकदम हळू जावे लागते. त्यात लहान मुलगा समोर असल्याने नेहमीच्या सवयीप्रमाणे गाडी हळू नेत होतो. नेमका माझ्या स्कूटरच्या डाव्या बाजूला आल्यानंतर त्याने अशी हालचाल केली की मला त्या कमी वेगातही कचकन ब्रेक दाबावा लागला. अर्थात दोघांनीही एकमेकांना काही न बोलता आमची वाटचाल सुरू झाली. पण कित्येक दिवस मनात असलेला प्रश्न पुन्हा उफाळून आला.
रस्त्यावरून चालताना लोक लहान मुलांना हात पकडून रस्त्याच्या बाजूने ठेवून आपण आत राहत का चालतात?
फूटपाथ सोडून रस्त्यावरून लोक जात असतात हे काहीवेळा ग्राह्य आहे. पदपथावर लोक दुकाने मांडून ठेवतात, किंवा गर्दीही असते. त्यामुळे मुख्य रस्त्यावर लोक येतात तेव्हा वाहन चालक व पादचारी ह्यांच्यात थोडीशी खुन्नस असतेच. तरीही त्यात थोडी समंजसताही असते हो. लोक स्वत: रस्त्यावरील वाहनांपासून सांभाळत चालत असतात (काही नसतात तो भाग वेगळा). पण लहान मुले रस्त्याच्या बाजूला असताना ते स्वत:ला किती सांभाळणार हो? ते तर स्वत:च्याच मस्तीत असतात. त्यात मग धक्का लागला तर मुलगा कसा प्रतिसाद देईल तेही माहित नाही. पण त्याचे पालक लगेच वाहनचालकावर डाफरणार.
गेल्या वर्षी कार्यालयातील एका सहकार्याशी ह्याच बाबतीत बोलणे चालू होते. तो म्हणाला की बहुधा लहान मुलांना आपला चळवळ्या हात धरून ठेवलेला आवडत नाही. तसे केले तर ते उगाच आणखी चळवळ करतात. म्हणून डावा हात पकडून ठेवतात. उजवा हात मोकळा असतो.
अरे हो, ह्यात डावा/उजवा हाही प्रकार येतो का? माझ्या नेमके लक्षात नाही पण बहुतेक वेळा मुलगा उजव्या बाजूला असतो व त्याला नेणारा त्याचा डावा हात पकडून असतो (आणि जाणे रस्त्याच्या डाव्या बाजूने) , असेही आहे का?
लहान मुलांना रस्त्यावरून चालत नेणे हा प्रकार मी स्वत: जास्त अनुभवला नाही आहे. त्यामुळे ह्याचे उत्तर माझ्याकडे नाही.
आणि बहुधा त्यामुळेच लहान मुलांची आकलनशक्ती ह्यात मी हे टाकू शकलो नाही. ;)
तुमचा ह्या बाबतीत काय अनुभव आहे किंवा काय मत आहे?

1 प्रतिक्रिया:
So true, common sense is uncommon these days.
टिप्पणी पोस्ट करा