मे ०४, २०१३

गेले काही वर्षे सुट्ट्या पैशांची अडचण पाहण्यात येते आहे. अर्थात ती खरी असेलही,  पण कितपत त्याचा अंदाज नाही.


काही वर्षांपूर्वी चार आण्यांची नाणी दुकानदारांनी घेणे/देणे स्वतःहून बंद केले होते. बसमध्येही वाहक प्रवाशांच्या नावाने शंख करतात की सुट्टे पैसे द्या म्हणून. पण त्यावेळी बेस्टचे वाहक ती नाणी नाकारत नव्हते. नंतर रिझर्व बँकेने २५ पैशांची नाणी अधिकृतरित्या चलनातून बंद केली आणि त्यांनी सांगितले की सर्व किंमती ५० पैशांच्या गुणांकात असावीत. पण तरीही अजूनही भरपूर गोष्टींच्या किंमती इतर पैशांमध्ये दर्शविलेल्या असतात. ह्यामुळे २५ रू. ३५ पैशाची गोष्ट २५.०० रूपये किंवा २६.०० रुपयांना विकली जाते. काही लोक रू. २५.५० ही घेत असतील. ह्यात नफा तोटा सोडून देऊ. जास्त कोणी लक्ष देत नाही. मूळ किंमतीवर विविध टक्केवारीत विविध प्रकारचे कर लागून एकूण किंमत ५० पैशांशिवाय इतर पैशांत येत असेल. असो.

भरपूर दुकानांत तर किंमतीचा आकडा सोपा करण्यासाठी दुकानदार देय किंमतीतून कराच्या टक्क्यांनी एखाद्या गोष्टीची मूळ किंमत आणि कर असे विभाजन करतात, आणि पावतीत लिहितात. हे ही ठीक आहे. ते होते अर्थात मोठ्या रकमेच्या गोष्टींसाठी.

पण एक प्रकार सुरू झाला आहे तो म्हणजे, ५० पैसे किंवा १ रू. परत द्यायच्या ऐवजी चॉकलेट, गोळ्या देणे. हा प्रकार तर एवढा वाढला आहे की काही हॉटेल, दुकानांत तर सुट्ट्या १ ते ५ रूपयांऐवजी चॉकलेट देतात आणि कारण सांगतात की सुट्टे नाहीत. मग आपल्याला प्रश्न पडतो की आपण १-२ रूपयांऐवजी चॉकलेट दिले तर तुम्ही घ्याल का? आम्हालाही तर सुट्ट्या पैशांची अडचण होत असते. :)

असेच वेगळे मागणीदार म्हणजे रिक्षा/टॅक्सी चालक. त्यांच्याकडेही हीच अडचण असते. अर्थात आधी म्हटल्याप्रमाणे ती खरी असतेही, पण कितपत तो एक मुद्दा आहे.

ह्या सर्वांवर शक्कल वापरून आता एअरटेल ने नवीन जाहिराती काढल्या आहेत. सुट्टा एक रूपया देण्याऐवजी मोबाईलवर व्हिडीओ/गाणी दाखवणे.
ती ग्राहकाच्या फायद्याची की दुकानदार/रिक्षा चालकांच्या, ते माहित नाही. मोबाईल कंपनीच्या फायद्याची नक्कीच.

पण दुकानदारांनी खरोखरच ही गोष्ट वापरात आणली नाही म्हणजे खूप झाले. ;)

मे ०३, २०१३

साधारणतः उत्पन्नावर मिळणारी करातील वजावट ही दोन प्रकारे असते.

१. पगारात दिलेले विशिष्ट भत्ते : वेगवेगळ्या कंपनी आपल्या नियमांनुसार, सोयीनुसार कर्मचार्‍यांना काही प्रकारचे भत्ते देत असतात. त्यातील काही भत्त्यांवर प्राप्तीकर नियमांनुसार थेट वजावट मिळते. पण ह्यातही कर्मचार्‍याने तो भत्ता त्या कारणाकरीता वापरला आहे ह्याचे पुरावे द्यावे लागतात.

उदा.
  • घरभाडे भत्ता - घर भाड्याची पावती आणि/किंवा भाडे करारनामा (Rent Agreement) सादर करावे लागते.
  • रजेच्या काळातील प्रवास भत्ता - केलेल्या प्रवासाची तिकिटे सादर केल्यानंतरच ह्या भत्त्यावर वजावट मिळते.


२. गुंतविलेल्या रक्कमेवर कर वजावट: एखाद्याने उत्पन्नातील काही रक्कम ठराविक प्रकारच्या साधनांमध्ये गुंतविल्यास त्या रकमेवर पूर्ण (किंवा ठराविक टक्क्यांनी) वजावट

उदा.
  • जीवन विम्याकरीता भरलेल्या हप्त्यावर मिळणारी वजावट
  • ५ वर्षांच्या मुदत ठेवींमध्ये गुंतविलेल्या रक्कमेवर मिळणारी वजावट.

ह्याचप्रकारे गुंतविलेल्या रक्कमेवर, आणि त्या गुंतवणूकीवर मिळणारे उत्पन्न ह्यावर कर सूट ही तीन प्रकारांत विभागलेली आहे.
बहुतेक वेळा तुम्ही EEE(Exempt-Exempt-Exempt) किंवा EET(Exempt-Exempt-Tax) हे शब्दप्रकार ऐकले असतील. ते ह्याच सवलतीबद्दल आहेत.

१. गुंतविलेल्या रक्कमेवर कर वजावट आहे की नाही. (पहिला E/T)
२. त्या गुंतवणूकीवर मिळणारे व्याज, किंवा इतर उत्पन्न ह्यावरील कर सूट (दुसरा E/T)
३. त्या गुंतवणूकीतील पैसे पूर्ण काढल्यावर (मध्येच बंद करून किंवा मुदत संपल्यावर) मिळणार्‍या रक्कमेवरील कर सूट (तिसरा E/T)

आपण करत असलेल्या गुंतवणूकी मुख्यत्वे खालील प्रकारात येतात
Exempt-Tax-Tax
Exempt-Exempt-Tax
Exempt-Exempt-Exempt
आणि
Tax-Exempt-Exempt (प्रथमतः गुंतवणूकीवर कर सवलत नसल्याने पुढील नफा करमुक्त असण्याची शक्यता कमी दिसते, पण त्याचीही काही उदाहरणे आपण पुढील भागांत पाहू)

(क्रमशः)

मे ०२, २०१३

सर्वात प्रथम आपण उत्पन्नाचे स्त्रोत आणि त्यावरील कर मोजणी पाहू.

१. पगारातून मिळणारे उत्पन्न.
२. घर मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न.

३. व्यवसाय वा उद्योगातून मिळणारे उत्पन्न
४. भांडवली नफा
५. अन्य स्रोतांपासून मिळालेले उत्पन्न 


आर्थिक वर्षात (Financial year) म्हणजेच १ एप्रिल ते ३१ मार्च ह्या काळातील वरील सर्व स्त्रोतांतून मिळालेल्या उत्पन्नाची बेरीज केल्यावर जी संख्या मिळते ते एखाद्या व्यक्तीचे त्या आर्थिक वर्षाचे एकूण उत्पन्न म्हणून मोजले जाते.

ह्यावरील कर 
मोजणी कशी असेल?
 

कर आकारणीकरीता आयकर विभागाने वयानुसार ३ गट ठेवले आहेत.
हा तक्ता आर्थिक वर्ष २०१३-१४ करीता आहे. 

१. वय ६० वर्षांपेक्षा कमी.
एकूण उत्पन्न (रू.)
कर (%)
शिक्षण अधिभार (%)
अधिभार(%)
कर सूट (रू.)
० - २,००,०००
०
३
०
२,००,००१ - ५,००,०००
१०
३
०
२,०००
५,००,००१ - १०,००,०००
२०
३
०
१०,००,००१ - १,००,००,०००
३०
३
०
१,००,००,००१ पेक्षा जास्त
३०
३
१०



२. वय ६० वर्ष किंवा जास्त पण ८० वर्षांपेक्षा कमी .
एकूण उत्पन्न (रू.)
कर (%)
शिक्षण अधिभार (%)
अधिभार(%)
कर सूट (रू.)
० - २,५०,०००
०
३
०
- 
२,५०,००१ - ५,००,०००
१०
३
०
२,०००
५,००,००१ - १०,००,०००
२०
३
०
- 
१०,००,००१ - १,००,००,०००
३०
३ 
०
- 
१,००,००,००१ पेक्षा जास्त
३०
३
१०

३. वय ८० वर्ष किंवा जास्त
एकूण उत्पन्न (रू.)
कर (%)
शिक्षण अधिभार(%)
अधिभार(%)
कर सूट (रू.)
० - २,००,०००
०
०
०
 -
२,००,००१ - ५,००,०००
०
०
०
-
५,००,००१ - १०,००,०००
२०
३
०
 -
१०,००,००१ - १,००,००,०००
३०
३
०
 -
१,००,००,००१ पेक्षा जास्त
३०
३
१०
 -


कर मोजणीची उदाहरणे:
१.
श्री. अजय - वय ४६ वर्षे.
उत्पन्न ४, ५०, ०००/-

तक्ता: १.

पहिले २ लाख - कर नाही.

बाकी उत्पन्नः ४,५०,००० - २,००,००० = २, ५०,०००.
ह्यातील सर्व उत्पन्नावर १०%  दराने कर आकारला जाईल. म्हणजेच कर = २५,०००.

एकूण कर = २५,०००/-

नवीन नियमानुसार ह्यांना २००० रू कर सूट दिली जाईल. म्हणून कराची रक्कम= २३,०००/-
शिक्षण अधिभार ३% = २३,००० x ३% = ६९०/-

भरावयाचा एकूण कर = २३,००० + ६९० = रू. २३,६९०/-

______________________________________________________________

२. श्री. अजय - वय ४६ वर्षे.
उत्पन्न ७, ५०, ०००/-

तक्ता: १.

पहिले २ लाख - कर नाही.

बाकी उत्पन्नः ७,५०,००० - २,००,००० = ५, ५०,०००.
ह्यातील ३,००,००० उत्पन्नावर १०%  दराने कर आकारला जाईल. म्हणजेच कर = ३०,०००.

बाकी उत्पन्नः ५,५०,००० - ३,००,००० = २,५०,०००.
ह्यावर २० % दराने कर आकारला जाईल. म्हणजेच कर = ५०,०००

एकूण कर = ३०,०००+५०,००० = ८०,०००/-

एकूण उत्पन्न ५ लाखांच्या वर असल्याने नवीन कलम नुसार ह्यांना २००० रू कर सूट दिली जाणार नाही.

शिक्षण अधिभार ३% = ८०,००० x ३% = २४००/-

भरावयाचा एकूण कर = ८०,००० + २४००= रू. ८२,४००/-

____________________________________________________________
१. श्री. विजय - वय ६६ वर्षे.
उत्पन्न ४, ५०, ०००/-

तक्ता: 
२. 

पहिले २ लाख - कर नाही. 

बाकी उत्पन्नः ४,५०,००० - २,५०,००० = २, ००,०००.
ह्यातील सर्व उत्पन्नावर १०%  दराने कर आकारला जाईल. म्हणजेच कर - २०,०००.

एकूण कर = २०,०००/-

नवीन नियमानुसार ह्यांना २००० रू कर जमा दिली जाईल. म्हणून कराची रक्कम= १८,०००/-

शिक्षण अधिभार ३% = १८,००० x ३% = ५४०/-

भरावयाचा एकूण कर = १८,००० + ५४० = रू. १८,५४०/-

__________________________________________________________
२. श्री. विजय - वय ६६ वर्षे.
उत्पन्न ७, ५०, ०००/-

तक्ता: 
२. 

पहिले २.५ लाख - कर नाही. 

बाकी उत्पन्नः ७,५०,००० - २,५०,००० = ५,००,०००.
ह्यातील २,५०,००० उत्पन्नावर १०%  दराने कर आकारला जाईल. म्हणजेच कर - २५,०००.

बाकी उत्पन्नः ५,००,००० - २,५०,००० = २,५०,०००.
ह्यावर २० % दराने कर आकारला जाईल. म्हणजेच कर - ५०,०००

एकूण कर = २५,०००+५०,००० = ७५,०००/-

एकूण उत्पन्न ५ लाखांच्या वर असल्याने नवीन नियमानुसार ह्यांना २००० रू कर सूट दिली जाणार नाही.

शिक्षण अधिभार ३% = ७५,००० x ३% = २२५०/-

भरावयाचा एकूण कर = ७५,००० + २२५०= रू. ७७,२५०/-

(क्रमशः)


मे ०१, २०१३



गेले दोन-तीन महिने अर्थसंकल्पाविषयी बातम्या वाचत/पाहत होतो. अर्थसंकल्प सादर व्हायच्या आधी अशाप्रकारच्या बातम्या की हे व्हायला पाहिजे, गेले कित्येक वर्षे ह्याची मर्यादा हीच आहे, ती वाढविली पाहिजे आणि अर्थसंकल्पानंतरच्या बातम्या की हे झाले नाही, असे करायला पाहिजे होते.

आता अर्थमंत्र्यांनी त्यांच्या विचारांनी अर्थसंकल्प पुढे आणला. त्याने किती फायदा/नुकसान झाले असेल तो माझा विषय नाही आहे. पण त्यानिमित्ताने साधारणतः कोणकोणत्या प्रकारची गुंतवणूक आपण करतो आणि त्यामागे काय करप्रणाली आहे ह्याचा बराच मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. मित्रांसोबत, कार्यालयातील सहकार्‍यांसोबत गप्पांमध्ये, आणि बातम्या, इतर कार्यक्रमांतून हे ही ध्यानात आले की आपण बहुतेक लोक काही ठराविक गुंतवणूकींवरच भर देतो, आणि त्याच्या कराबाबत आपणांस जास्त माहिती नसते. मी काही अर्थतज्ञ नाही किंवा व्यावसायिक कर/गुंतवणूक सल्लागार नाही. पण असा विचार केला की स्वतः गुंतवणूक करताना हीच सगळी गोळा केलेली माहिती आपण इतरांनाही देऊया. अर्थात आंतरजालावर शोधून पाहिजे ती माहिती शोधू शकतो. पण ती एकत्रित ठेवण्याच्या विचाराने मी ही लेखमाला लिहायचा विचार केला. कोणती गुंतवणूक चांगली किंवा तुम्ही कोणती वापरावी असा सल्ला मी देणार नाही. फक्त त्यातील मुख्य मुद्दे आणि त्याची कर आकारणी कशी असेल ही फक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे.


- ह्या लेख मालिकेत  
असलेल्या माहितीची जमेल तेवढी पडताळणी संबंधित विषयावरील संकेतस्थळांवरून, तसेच आयकर विभागाच्या संकेतस्थळावरूनही करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही, ह्या विषयाची व्याप्ती खूप मोठी असल्याने काही त्रूटी असण्याची किंवा माहिती अपुरी असण्याची शक्यता आहे. आपणांस काही त्रुटी आढळल्यास कळवावे. ती जमेल तेवढ्या लवकर दुरूस्त करून ती माहिती अद्ययावत करण्याचा प्रयत्न करीन. पण प्रत्यक्षात कोणतीही गुंतवणूक करताना किंवा कर आकारणी मोजताना आपल्या गुंतवणूक/कर सल्लागाराशी चर्चा करून घ्यावी.

- ह्यात जमतील तेवढे मराठीतील वापरात असलेले शब्द किंवा प्रतिशब्द वापरायचा प्रयत्न ठेवला आहे. परंतु तो शब्द क्लिष्ट वाटल्यास वापरात असलेला इंग्रजी शब्द/वाक्य तसेच्या तसे वापरले आहे.



एप्रिल ३०, २०१३


आज खूप दिवसांनी नवीन पट्टयावर Italian Leather असे कोरलेले वाचले आणि काहीसे जुने आठवले.

२००१ मध्ये मी आणि माझा मित्र मस्जिद येथे गेलो होतो, नोकरीच्या निमित्ताने. माझ्या मित्राला नवीन पट्टा विकत घ्यायचा होता. दुकानदाराने वेगवेगळ्या प्रकारचे पट्टे दाखवायला सुरूवात केली. बहुतेक सर्वांवर 'Genuine Leather' , 'Original Leather' असे लिहिले होते. मी विचारले, "हे खरोखरच चामड्याचे पट्टे आहेत का?" दुकानदार म्हणाला, " हो, छापलंय पहा." खरा चामड्याचा पट्टा किंवा पिशव्या बॅग ओळखणे तसे मला जमत नव्हते. कधी काळी कोणी सांगितले होते की खर्‍या चामड्याला एक वेगळा वास येत असतो त्यावरून ओळखावे. पण त्या गोष्टींचा वास कसा असतो ते तर माहित असावे. (तीच गोष्ट हापूस आंब्यांचीही. माहीतगार लोक सांगतात की हापूस आंबा वासावरून ओळखता येतो. पण खरा वास कुठे माहित आहे ;) ) त्यावरून तर ओळखता आले नाही. माझा मित्र म्हणाला, "त्याला चामड्याचा पट्टा नको आहे. ते चामडे वापरत नाहीत." दुकानदाराने काही पट्टे काढून दाखवले. पण त्यावरही 'Genuine Leather' लिहिलेले दिसले. त्याला विचारले तर म्हणाला, "तसे लिहून ठेवतात". मग पुढे बोलता बोलता तोच म्हणाला की कोणी चामड्याचा पट्टा मागितला तर त्याकरीता हे छापून ठेवले आहे की.

थोडक्यात त्या दुकानात कोणते चामड्याचे पट्टे होते आणि कोणते नव्हते ते कळले नाही. परंतु हे कळले की असे छापून ठेवून हातात काहीही सोपवले जाते.



आता आंतरजालावर चित्र शोधता शोधता हे एक संकेतस्थळ मिळाले, त्यावर "How do you know if a leather is genuine leather?" असा दुवा होता. पण त्यावरील माहितीही त्रोटक, अपुरी वाटली. नेमकं सांगायचं तर नेमकं काहीच कळलं नाही ;)

कोणी सांगू शकेल का की 'Genuine Leather' कसे ओळखणार?

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter