गेल्यावेळी लिहिल्याप्रमाणे जपानमध्ये रेल्वे प्रशासनाने विद्यार्थिनीच्या शिक्षणाची दखल घेत रेल्वे स्थानक सुरू ठेवण्याचे ठरवले. नेमका तसाच प्रकार तर नाही, पण इतरांची दखल घेण्याचे दुसरे उदाहरण भारतात दिसले.
आसाममध्ये एका गावातील सर्व रहिवाशांनी मिळून त्यांच्या भागातील हत्तींना सुरक्षित जागा मिळावी म्हणून त्यांचे पूर्ण गावच स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आणि ते अंमलात आणले. शिरीष कणेकरांच्या अमेरीकावारीच्या एका लेखात वाचले होते की, अमेरिकेमध्ये एका ठिकाणी पक्षांचा थवा ठराविक काळात स्थलांतर करत असतो. त्यांची जागा हिरावली जाऊ नये म्हणून तेथील प्रशासनाने त्या भागातील नवीन विमानतळाचा विचार रद्द केला. तेव्हा वाटले होते की आपल्याकडे असे होण्याची शक्यता वाटत नाही. पण आसाममधील गावकर्यांनी असे होते हे दाखवून दिले, हे कौतुकास्पद आहे.
सरकारी परवानगीचे महत्व किती?काल ऐकले होते,आज वृत्तपत्रात वाचले की, बोरिवली, घोडबंदर रोड, भांडुप, मुलुंड, घाटकोपर, नाहूर आदी परिसरातील सुमारे १०० एकर जमीन 'खासगी वनजमीन' म्हणून घोषित केली गेली आहे. त्यामुळे तिथे राहणायांच्या मनात घबराट निर्माण झाली आहे. …Read More
जगभरातील व्यक्तिमत्वे ओळखावरील चित्रात जगभरातील व्यक्तींची चित्रे रेखाटली आहेत. किती ओळखता येतात ते पाहू?मी ओळखलेले:महात्मा गांधीचार्ली चॅपलीनबीथोवनहिटलरसद्दाम हुसैनबिल क्लिंटनब्रुसलीअल्बर्ट आईन्स्टाईनअब्राहम लिंकनयासर अराफातमेरीलीन मॉन्ऱोजॉर्ज बुशआणख…Read More
दातातील माहिती...कार्यालयात दुपारी जेवताना बोलता बोलता विषय निघाला.माझा एक मित्र म्हणाला, 'अरे, जपान मध्ये डाटा सेव्ह करण्याकरीता काय काय केले आहे. आता ते लोक दातांमधेही माहिती साठवून ठेवू शकतात.'दुसरा मित्र म्हणाला ' आता पेपरमध्ये बातमी यायच…Read More
फक्त पृथ्वीच का?सविस्तर चर्चा/लेख मनोगत येथे वाचता येईल. दि : १३ मे २००५महाभारत, रामायण आणि इतर धार्मिक पुस्तकांमध्ये लिहिल्याप्रमाणे आणि आपण पाहिलेल्या ठिकाणांवरुन मी हे म्हणू शकेन की देव-देवतांनी पृथ्वीवर आपला वास केला होता.गीतेमध्ये लिहिल…Read More
शरद पवारांच्या आवाहनात तथ्य किती?मला राजकारणातील जास्त कळत नाही. पण एक सामान्य नागरिक म्हणून जे काही माहीत आहे त्यावरून पुढील विवेचन..शेतकर्यांना भाव मिळत असताना महागाईचा बाऊ नको असे शरद पवार म्हणाले. (पहा बातमी)स्वत:ला काही करणे जमले नाही किंवा काही करायचे…Read More
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा