नोव्हेंबर ११, २०१०

त्रिमिती चित्रपटांशी माझी ओळख झाली १९८५ मध्ये, ’छोटा चेतन’ द्वारे.  आईस्क्रिम घेण्याकरीता हात पुढे करणे, इतर काही प्रसंगात दचकणे वगैरे अनुभव तेव्हाच मिळाले. त्यानंतर पाहिला ’शिवा का इन्साफ’. ’सामरी’ सिनेमा भुताचा असल्याने बहुधा वडिलांनी आम्हाला तेव्हा दाखवला नाही. :)


त्यानंतर नवीन चित्रपट आले नाहीत. पण काही वर्षांनी त्रिमिती चित्रांकित गोष्टीची पुस्तके (कॉमिक्स) आलेत. एका रद्दीच्या दुकानात आम्हाला ती पुस्तके दिसली. मग काय, जमतील तेवढी पुस्तके आणून वाचण्याचा कार्यक्रम झाला. नंतर आलेली ’छोटा चेतन’ची नवीन आवृत्ती हरीश आणि उर्मिला मातोंडकरला सोबत घेऊन. चित्रपटगृहात तर नाही पहायला मिळाली, नंतर एका दूरदर्शन वाहिनीवरच पाहिली. २००३ मध्ये आलेला ’छोटा जादूगर’ सिनेमा ही पुन्हा त्रिमितीच.


खूप वर्षांनी म्हणजे साधारण १८ वर्षांनी पाहिलेला. एवढ्या काळात तो अनुभव थोडाफार विसरून गेलो होतो. पण ह्या चित्रपटाने पुन्हा मजा आली. माझ्या निरिक्षणशक्तीने त्यातील फरक ओळखायचा प्रयत्न केला होताच. आधीचे त्रिमिती चष्मे हे निळ्या आणि लाल काचांचे (प्लॅस्टिक) चे बनविलेले होते. पण हे पूर्ण राखाडी रंगाचे होते. चित्रातही बदल होताच. नेमका काय बदल झाला तो तेव्हा शोधायचा प्रयत्न केला नाही, नंतर केला. पण ती माहिती मी येथे देत नाही. विकिपिडियावर फार चांगल्या रितीने दिले आहे ते. ;)


थोडे शास्त्र आणि तांत्रिक बाजू पाहताना मी वाचलेल्या ऐकलेल्या काही गोष्टी सांगतो. आपल्या दोन्ही डोळ्यांनी मिळून आपल्याला अंदाजे २०० अंशांपर्यंतचे दष्य दिसते आणि एका डोळ्याने फक्त १२० अंशांपर्यंत दिसते. अर्थात फक्त दृष्यविस्तार नव्हे तर दोन डोळ्यांमुळे त्रिमितीचा अनुभव ही येतो. एका डोळ्याने वस्तूची लांबी आणि रूंदी (किंवा उंची) दिसते तर दुसया डोळ्यामुळे त्या वस्तूची खोली किती आहे त्याचा अंदाज येतो. त्याचा फायदाच होतो. पण ह्यातच एक उलट गोष्ट आहे. सुईत दोरा टाकताना दोन डोळ्यांनी सुईतील छिद्राचा अंदाज येत नाही त्याकरिता आपल्याला एक डोळा बंद करून द्विमितीचा उपयोग करावा लागतो.


असो, शास्त्र बाजूला ठेवून इतर भाग. त्रिमिती चित्रपटांप्रमाणेच आणखी एक प्रकार फार पहायला मिळतो, तो म्हणजे होलोग्राम. एखादे चिन्ह किंवा चित्र त्रिमितीचा आभास निर्माण करून दाखवले जाते. हा प्रकार लहानपणी वापरलेल्या पट्ट्य़ांमध्ये ही पहायला मिळाला होता. पण मुख्यत्वे, एखादी वस्तू ओरिजिनल किंवा अस्सल आहे हे ओळखण्याकरीता उत्पादक आपल्या उत्पादनावर आपले मानकचिन्ह होलोग्राममध्ये बनवून चिकटवितात. आता जर नकली उत्पादकानेही तसाच होलोग्राम बनविला असेल तर त्यामध्ये अस्सल कोणते आणि नकली कोणते हे ओळखण्यात काही वेळा गल्लत होऊ शकते असे मला वाटते. :)


गेल्या वर्षी पुन्हा ३ त्रिमिती चित्रपट पाहिले. एक पूर्ण ऍनिमेशन (Ice Age 3), दुसरा मिश्र (G Force) आणि तिसरा संपूर्ण नेहमीसारखा (Final Destination 3D). ह्यातही दाखविले जाणारे चित्र तसेच चष्मा ह्यात बदल वाटला. तसेच भरपूर चित्रपट त्रिमितीमध्ये येत आहेत असे जाहिरातींत दिसले. एका मित्राने सांगितले की ते तंत्रज्ञान विकसित केल्याने त्रिमिती चित्रपट बनविणे थोडे सोपे झाले असल्याने धडाधड त्रिमित्री चित्रपट बनत आहेत. त्याचा फायदा आपल्यालाच.


त्यानंतर चर्चा वाढलीय त्रिमिती दूरदर्शन संचाची. एका संचासोबत १ ते २ त्रिमितीदर्शक चष्मे. कारण थेट त्रिमिती आभास तर मिळू शकत नाही. त्यामुळे चित्रपटगृहाचा अनुभव घरी एवढाच फरक असेल का? इतर देशांनंतर आपल्या देशात ह्याचे आगमन नेहमीपेक्षा लवकर झाले असे वाटतेय. ह्या दिवाळीत तर काय त्रिमित्री दूरदर्शन संच आणि LED संचांची भलतीच जास्त जाहिरात होत होती. आमचा घरचा दूरदर्शन संच बिघडण्याच्या मार्गावरच आहे. त्यामुळे एकाने सल्ला दिला, थोडे थांबून 3D संचच घे. पण मला तसे वाटत नाही. कारण एक तर त्याची किंमत भरपूर जास्त आहे. इतर देशांत तरी त्रिमिती वाहिन्या बनविणे चालू झाले आहे. पण भारतात तशा वाहिन्या बनण्याला बहुधा ३/४ वर्षे जातील असे मला वाटते. पण ज्याप्रकारे दूरदर्शन संच जरा जास्त वेगात भारतात आले त्याच वेगात वाहिन्याही आल्या तर काय सांगता येत नाही. असो. पण मी तरी सध्या त्रिमिती दूरदर्शन संचाच्या मागे नाही.


आता गेल्या महिन्यापासून त्रिमिती भ्रमणध्वनीची ही जाहिरात येत आहे. त्यात वापरायचा पडदा तसेच व्हिडियो त्रिमितीमध्ये दिसेल असा त्यांचा दावा आहे. मी तरी अजून तो भ्रमणध्वनी पाहिला नाही आहे. पण त्यात बिना चष्म्याने त्रिमितीचा अनुभव मिळणे कितपत शक्य आहे अशी शंका वाटते. अर्थात होलोग्रामप्रमाणे तर असेलच किंवा त्याहीपेक्षा भरपूर जास्त. पण तंत्रज्ञानाने आघाडी घेतली असेल तर चांगलेच आहे.


असो, आता एवढे त्रिमितीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाल्याने दर्शक आणि ग्राहक ह्यांना फायदा आहेच. आणखी काय काय पुढे येते ते पाहूच.

4 प्रतिक्रिया:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

टेक्नोलोजी एट इट्स बेस्ट ..आता थ्रीडी थियेटर्स येत आहेत मोठ्या प्रमाणात आणि खास चित्रपटपण जे फक्त तिथे दाखवले जातील..आपल्या नेहरू तारंगणातपण नवीन थ्रीडी प्रोजेक्टेर्स इनस्टॉल केले आहेत कधी वेळ मिळाला तर नक्की बघ जाउन :)

देवदत्त म्हणाले...

’टेक्नोलोजी एट इट्स बेस्ट’
हो ते तर आहेच. आणि भरपूर आहेच पुढे.

आता ३० ऒक्टोलाच जाऊन आलो नेहरू तारांगणात. पण त्रिमिती नाही दिसले. बाहेरच्या प्रदर्शनात होते का? आम्ही थेट मुख्य प्रेक्षागृहातच गेलो होतो.

अरे हो, ह्यावरून आठवले. ह्यात ४मिती चित्रपटांबद्दल लिहायचेच राहिले. अमेरिकेत पाहिले होते. भारतातही तसे चित्रपटगृह उघडले आहेत असे वाचले होते.

Suhas Diwakar Zele म्हणाले...

वरळीला आहे फोरडी थियेटर ... नेहरू तारंगणात आधी Carl Zeiss 3 Projector होता जो प्रेक्षकगृहाच्या बरोबर मध्ये असायचा आणि इमेजस दाखवायचा पण आता Digistar 3 हे नवीन प्रोजेक्टर्स आहेत जे डाइरेक्ट आरजीब्लू इमेज फोकस करतात अनेक प्रोजेक्टर्सच्या साहहायाने..तुलनेने कमी जागा घेणारे हे प्रोजेक्टर्स खूपच शक्तिशाली आहेत..

http://en.wikipedia.org/wiki/Digistar_3

देवदत्त म्हणाले...

धन्यवाद सुहास. जमेल तेव्हा ते ४डी ला ही भेट देईन :)

इंडिब्लॉगर गुण

maajhianudini.blogspot.com
47/100

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

133,732

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया


On Sep 23 Anonymous commented on blog post_09
Kuf cha tras aahe... Kuf mile khokla hoto...mg to lvkr jat nahi .ky karave

On Jul 25 Anonymous commented on blog post_09
मला पण असाच त्रास होत असे मी पण खूप उपचार करून पाहिले पण थोडे दिवसच त्रास कमी होत असे नंतर मी...(more)

On May 13 Announced Marathi Images commented on blog post_25
Very nice

On Jul 23 Sachin Kinare commented on blog post
छान, खूप दिवसांनी शोधत होतो, ह्या ब्लॉग मूळे लगेच मिळाले

On Jul 02 Anonymous commented on blog post
Chhan

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter